विश्वास नांगरे-पाटील यांचे काही प्रेरणादायी व्हिडीओ

3
1429

पुणे येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या टिप्स् दिल्या. एकूण ४ व्हिडीओ आहेत. नक्की पहा. यानंतर आपल्या प्रतिक्रिया आवश्य नोंदवा. Inspiring Speech by Vishwas Nangare-Patil

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

Advertisement

विश्वास नांगरे-पाटील यांच्या तरुणाईसाठीच्या काही टिप्स

 • छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचाच. त्यातून सतत तुमच्यातील नवचेतना जागेल.
 • आयुष्याचे ध्येय वयाच्या पंधराव्या वर्षीच ठरवा.
 • जीवन ही एक शर्यत आहे आणि परमेश्वर या शर्यतीचा “रायडर‘ आहे. चटके, फटके, वेदना सहन करा आणि या शर्यतीत जिंकण्याचा वज्रनिर्धार करा.
 • स्वतःची बलस्थानं, दुर्बलस्थानं ओळखा आणि संधीसह त्यासमोरील आव्हानांचा सर्वांगीण अभ्यास करा. झपाटून कामाला लागा. Inspiring Video by Vishwas Nangare-Patil
 • योग्य वेळ आणि परफेक्ट प्लॅनिंगच्या जोरावर यशाची लढाई नक्कीच जिंकता येते.
 • प्लॅनिंग म्हणजे फार काही वेगळं नसतं. काय, कुठे, कसे आणि केव्हा मिळवायचे, याचे ऍडव्हान्समध्ये नियोजन करा आणि त्याचा ध्यास घ्या.
 • शांततेच्या काळात जास्त घाम गाळाल, तर प्रत्यक्ष युद्धात कमी रक्‍त सांडते. महाविद्यालयीन जीवनाच्या शांततेच्या काळात अधिक कष्ट करा. त्यामुळे प्रत्यक्ष करिअरच्या यशोशिखरावर जाताना कमी कष्ट घ्यावे लागतील.
 • स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. प्रसंगी काही नियम तोडा. अपयशाला तर अजिबातच घाबरू नका. पण यशोशिखरावर गेल्यानंतर देशासाठी, समाजासाठीच आपले जीवितकार्य माना. vishwas nangare patil speech
 • केवळ स्वप्नं पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते. स्वप्नं प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस मोठा असतो. vishwas nangare patil poem in marathi
 • यश शेवटचं नसतं आणि अपयश कधी संपवणारं नसतं. महत्त्वाचा असतो तो आपला आत्मविश्वास.
 • जे निवडाल ते स्वतःच्या हिमतीनं निवडा. थांबलात तर मग दुसऱ्या कुणाला जमलं नाही ते “शिळं-पाकं‘ तुमच्या पदरात पडेल.
 • कितीही अपयश आलं तरी गांगरून जाऊ नका. पुन्हा पेटून उठा; अन्यथा आयुष्यभर सपाटून मार खाल.
 • “प्रेम, मदत आणि सेवा‘ ही त्रिसूत्रीच तुम्हाला कुठल्याही धर्मग्रंथातून मिळेल.

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

[quote font_size=”22″ arrow=”yes”]व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आवश्य कळवा. अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC[/quote]

Advertisement

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here