स्पर्धा परीक्षांमध्ये अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग

0
19
devendra-fadnavis-mpsc-Special category for orphans in competition examinations

राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा विशेष प्रवर्ग तयार करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.

मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले कि, काही दिवसांपूर्वी एक मुलगी मला भेटायला आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ती उत्तीर्ण झाली असली तरी खुल्या वर्गात नोकरी मिळण्याकरिता तिला एकच गुण कमी पडला. जातीचे किंवा अन्य कोणतेही प्रमाणपत्रही नसल्याने तिला नोकरी मिळाली नाही. तिल्या खुल्या प्रवर्गात स्थान द्यायचे की अनुसूचित जाती आणि जमातीअंतर्गत नोकरी द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. अनाथ मुलांना त्यांच्या आई-वडिलांची माहिती नसल्याने त्यांच्यासाठी विशेष प्रवर्गाची आवश्यकता असल्याचे मला वाटत होते. मी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग तयार करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. कुटुंबाचा आधार नसलेला आणि कायमच संघर्ष पाचवीला पूजलेला अशा स्थितीत असणारी अनाथ मुलंही एमपीएससीच्या परीक्षेसाठी दिवस-रात्र एक करत असतात. त्यामुळे अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग तयार झाल्यास, त्यांच्या या संघर्षाला काहीसा आधार मिळेल. ज्या विद्यार्थिनीची संधी हुकली तिने, पुढील वर्षी चांगला अभ्यास करून अधिक चांगल्या गुणांनी आपण उत्तीर्ण होऊ, असे सांगितले. तसेच अनाथांसाठी वेगळा प्रवर्ग सुरू करण्यात येणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारच्य स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना जाती- जमातींसाठी राखीव असलेल्या प्रवर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अनाथ विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Advertisement

होतकरू अनाथ मुलांना हि सुविधा जाहीर केल्याबद्दल टीम Mission MPSC तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार.

नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here