⁠  ⁠

चालू घडामोडी : १२ ऑक्टोबर २०१९

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अलींना शांततेचे नोबेल

इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांना २०१९ या वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार दिला जाईल.
इरिट्रिया या शेजारी देशाशी सीमेशी संबंधित वादात २० वर्षांपासून सुरू असलेले अडथळे दूर करणे आणि त्यांची सुधारणावादी दूरदृष्टी या बाबी लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्यासाठी केलेले प्रयत्न आणि शेजारी देश इरिट्रियासोबतचा सीमावाद सोडवण्यासाठी घेतलेल्या पुढाकारासाठी अबी अहमद अली यांना हा पुरस्कार दिला जाईल. इथिओपिया आणि इरिट्रिया यांच्यादरम्यान २२ वर्षे जुने युद्ध संपवण्यात अबी अहमद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे जुलै २०१८ मध्ये दोन्ही देशांत शांतता करार झाला होता.

मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत, अदानी दुसऱ्या स्थानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ३.६५ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह (नेटवर्थ) सलग १२ व्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत.
फोर्ब्ज इंडियाच्या २०१९ च्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी (१.११ लाख कोटी रुपये) तब्बल आठ स्थानांची प्रगती करत भारतातील दुसरे श्रीमंत ठरले आहेत.
फोर्ब्सच्या या यादीतील आकडेवारी पाहता या वर्षी भारतातील श्रीमंतांची एकूण संपत्ती ८% नी घटली आहे.

पृथ्वी आणि अंतराळातील सीमेचा शोध घेण्यासाठी नासाचा आयकाॅन उपग्रह लाँच

नासाने आयनमंडळाबाबत (पृथ्वीपासून सुमारे ४८ किमीनंतरचे वायुमंडळ) जास्त माहिती मिळवण्यासाठी एक उपग्रह प्रक्षेपित केला. त्याचे नाव आयकाॅन असे आहे. जेथे पृथ्वीचे वातावरण संपते आणि अंतराळाची सुरुवात होते ती ही रहस्यमय जागा आहे. प्रक्षेपणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच फ्लोरिडा किनाऱ्याजवळ अटलांटिकच्या वर एका विमानाद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. प्रक्षेपणाच्या पाच सेकंदांनंतर त्याच्याशी जोडलेले पेगासस राॅकेट प्रज्वलित झाले. त्यानंतर ‘आयकाॅन’ पुढे गेला.
जेथे पृथ्वीचे वातावरण अंतराळाशी जोडले जाते त्या जागेचा डेटा हा उपग्रह मिळवेल. तसेच सौर वादळांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो; अंतराळवीर, रेडिओ संचार आणि जीपीएस नेव्हिगेशन सिस्टीमला कसा प्रभावित करतो याचे विश्लेषण करणे सोपे होईल. आयनमंडळ हा इलेक्ट्राॅन, आवेशित परमाणू आणि अणूंचा उतार-चढावांचा स्तर आहे.
हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४८ किमी आणि अंतराळाच्या सीमेपासून ९६५ किमी अंतरावरील भाग आहे. नासाच्या मते, आयकाॅन उपग्रहाद्वारे मिळणारा डेटा वैज्ञानिकांना रहस्यमय आयनमंडळाबाबत आणखी जास्त माहिती मिळवून देण्यास मदत करेल

‘द डॉन’ पुरस्कार मिळणारी अॅश्ले बार्टी पहिली महिला टेनिसपटू

महिला टेनिसपटू अॅश्ले बार्टीला स्पोर्ट््स ऑस्ट्रेलिया हाल ऑफ फेममध्ये alt147द डॉन’ पुरस्कार देण्यात आला.
ती ऑस्ट्रेलियातील हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारी पहिली महिला टेनिसपटू ठरली. क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमनच्या नावे १९९८ पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. नंबर वन महिला टेनिसपटू बार्टीने या वर्षी फ्रेंच ओपन किताब जिंकला. तिने ४६ वर्षंानंतर ग्रँड स्लॅम जिंकणारी ऑस्ट्रेलियाची पहिली खेळाडू बनली.

बास्केटबॉल : वॉशिंग्टन मिस्टिक्सकडे पहिल्यांदा महिला एनबीएचे विजेतेेपद

मिस्टिक्सने कनेक्टिकट सनला ३-२ ने हरवले. मिस्टिक्सने बेस्ट ऑफ फाइव्ह गेमच्या मालिकेत अखेरचा सामना ८९-७८ ने जिंकला.
कनेक्टिकटची टीम तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत झाली. ते कधीच किताब जिंकू शकले नाहीत. दुसरीकडे मिस्टिक्स टीम गेल्या वर्षी फायनलमध्ये पराभूत झाली होती.
मिस्टिक्सकडून एमा मेसेमेनने २२ आणि एलेना डेले डोनेने २१ गुणांची कमाई केली. दुसरीकडे कनेक्टिकटकडून जोनक्वेल जोनेसने सर्वाधिक २५ गुण बनवले. एमा फायनलमध्ये सर्वाधिक महत्त्वपूर्ण खेळाडू ठरली.

Share This Article