⁠  ⁠

चालू घडामोडी : १५ ऑक्टोबर २०१९

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातलं नोबेल जाहीर

अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिजित बॅनर्जी, इस्थर डफलो, मायकल क्रेमर अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
याआधी अर्थशास्त्रातला नोबेल देऊन अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना देण्यात आला होता. त्यांच्यानंतर प्रदीर्घ काळाने भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे.रविंद्रनाथ टागोर, सी. व्ही. रामन, मदर तेरेसा, अमर्त्य सेन आणि कैलाश सत्यर्थी या पाचजणानंतर नोबेल पुरस्कार जिंकणारे अभिजित बॅनर्जी हे सहावे भारतीय आहेत. तर अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातले नोबेल मिळवणारे अभिजित बॅनर्जी हे दुसरे भारतीय ठरले आहेत.
रविंद्रनाथ टागोर यांना साहित्यातील योगदानासाठी, सी. व्ही. रामन यांना भौतिकशास्त्रातील योगदानासाठी, मदर तेरेसा यांना शांततेचा, अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठी, कैलाश सत्यर्थी यांना शांततेचा तर आता अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठीचा नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे.

चीनकडून नेपाळला 56 अब्ज रुपयांची मदत

नेपाळच्या विकास कार्यक्रमांना मदत करण्यासाठी चीन येत्या दोन वर्षांत नेपाळला 56 अब्ज नेपाळी रुपयांची मदत करेल, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी रविवारी 20 करार केले.
शी जिनपिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दोन दिवसीय अनौपचारिक शिखर परिषदेनंतर शनिवारी येथे दाखल झाले. त्यानंतर जिनपिंग यांनी शनिवारी नेपाळच्या अध्यक्षा विद्या देवी भंडारी यांच्याशी चर्चा केली. रविवारी जिनपिंग यांनी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेतली आणि शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली.

BCCI च्या अध्यक्षपदी सौरभ गांगुलीची निवड

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ‘सौरभ गांगुली’ या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी निवड झाली आहे. सौरभ गांगुली 2020 पर्यंत आपल्या पदावर कार्यरत असणार आहे. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती.

Share This Article