⁠  ⁠

राष्ट्रपतींचे निवासस्थान सामान्यांसाठी 4 दिवस खुले

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 1 Min Read
1 Min Read

भारताचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींचे निवासस्थान अर्थात राष्ट्रपती भवन सर्वसामान्य जनतेसाठी आता आठवड्यातून चार दिवस खुले राहणार आहे. राष्ट्रपती सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे.आता या निर्णयानुसार गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चार दिवशी सर्वसामान्य जनतेला राष्ट्रपती भवनाला भेट देता येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भवन खुले राहणार आहे. राजपथवरील गेट क्र. २, हुक्मीमाई मार्गावरील गेट क्र. ३७ आणि चर्च रोडवरील गेट क्र. ३८ या ठिकाणांहून राष्ट्रपती भवनाला भेटीसाठी आलेल्यांना प्रवेश तसेच बाहेर पडता येणार आहे. आगामी काळात वेबसाईटवरून ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमांतून राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी बुकिंगही करता येणार आहे. भवन पाहण्यासाठी प्रति व्यक्ती ५० रुपये इतके शुल्क आकारले जाते. ८ वर्षांखालील बालकांना येथे प्रवेश विनामुल्य आहे. भारतीय नागरिकांना राष्ट्रपती भवनातील प्रवेशासाठी आपले छायाचित्र असलेले ओळखपत्र तर परदेशी नागरिकांना आपला मुळ पासपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे.

Share This Article