⁠  ⁠

मिशन राज्यसेवा २०१६ – पूर्व परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 2 Min Read
2 Min Read

राज्यसेवा २०१६ परीक्षेचे तुमचे टार्गेट नक्की झालेय आता प्रत्यक्षात पूर्वपरीक्षेच्या स्वरूपाकडे आपण वळूयात…

राज्यसेवा पूर्व ही परीक्षा ४०० गुणांसाठी आहे.

एकूण प्रश्न संख्या २०० इतकी आहे.

पेपर १ – २०० गुण.

पेपर २ – २०० गुण.

यासाठी प्रत्येकी १२० मिनिटे (२ तास) इतका वेळ उपलब्ध आसतो.

प्रत्येक १ बरोबर उत्तरासाठी २ गुण…
तर चुकीच्या उत्तरासाठी (-१/३) या प्रमाणे -२/३ गुण वजा होतात… अशी गुणपद्धत आहे.

ही प्राथमिक माहिती आपणा सर्वांना आहेच. पण परीक्षेला सामोरे जाण्याआधी नेमके परीक्षेत कोणत्या विषयावर कसे प्रश्न विचारले जातात याचा आपला अभ्यास असावा. या मुळे अभ्यास करताना नेमके परीक्षेच्या दृष्टीने आपण अभ्यास करतोय का? हे लक्षात येऊ शकले. यावरून आपण काय अधिक वाचावे? यापैकी आपल्याला किती समजत आहे? याचे Analysis आपणास कळू शकतील.

मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रीकांचे Analysis आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरेल. अर्थात या Analysis मधून किती प्रश्न कोणत्या विषयाचे व कोणत्या Subtopic वर विचारण्यात आले आहेत याचा देखील थोडक्यात मागोवा जरूर घ्या. पण याविषयी या परीक्षेला इतकेच प्रश्न विचारतील हे मात्र अनिश्चित असते.

आपण Analysis स्वतः करावे. आणखी काही अडचणी असल्यास किंवा तशी गरज भासल्यास मी संक्षिप्तपणे यावर लिहिल…

याच प्रमाणे कोणत्या विषयाचा काय Syllabus आहे तो खाली details मध्ये देत आहे.

###(तो कृपया पाठ करावा) ###

[gview file=”https://missionmpsc.com/wp-content/uploads/2015/11/State-Services-PreliminaryExamination-syllabus.pdf”]

राज्यसेवा २०१६ परीक्षेचा सविस्तर नवीन अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा. या मुळे आपणास अभ्यास करतांना, चर्चा करतांना आणि पेपर वाचतांना आपल्या अभ्यासाशी तो मुद्दा नेमकेपणाने जोडता येतो.

विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

TAGGED:
Share This Article