राज्यसेवा पूर्वपरीक्षा : अर्थशास्त्र

0
1206
mpsc-economics

विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना सामान्य अध्ययन पेपर- एक मध्ये अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुळात इतिहास, भूगोल, पंचायत राज, सामान्य विज्ञान हे विषय आपण शाळेच्या प्राथमिक स्तरापासून अभ्यासत आलेलो आहोत. त्यामुळे त्या विषयांची भाषा समजून घेणे आपल्याला सोपे जाते; परंतु अर्थशास्त्राची भाषा मात्र तुलनात्मकदृष्टय़ा कठीण वाटते. परंतु एकदा का अर्थशास्त्रीय संकल्पना समजल्या की आपोआपच या संकल्पनांची दैनंदिन जीवनातील घटनांशी सांगड घालायला जमू लागते आणि अर्थशास्त्र या विषयात गोडी वाटू लागते. येत्या १० एप्रिलला होणाऱ्या परीक्षेसाठी अर्थशास्त्राचा अभ्यासाचे नियोजन कसे करावे, त्यातील कोणत्या घटकांवर अधिक भर द्यावा, अभ्यासपद्धती कशी असावी याविषयी आपण या लेखात चर्चा करू या.

1अभ्यासाची रणनीती

अभ्यासाची रणनीती ठरवताना जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावर अधिक भर देणे क्रमप्राप्त आहे. यानुसार दरवर्षी पूर्वपरीक्षेमध्ये साधारणपणे १० ते १५ प्रश्न अर्थशास्त्राशी संबंधित असल्याचे दिसून येते. या प्रश्नांमध्ये अर्थशास्त्रीय संकल्पना, त्यांचा चालू घडामोडींशी संबंध, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व्यापार आणि त्याचे इतर आयाम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाची उद्दिष्टय़े, सहकारी संस्था आणि त्यांचे कार्य, दारिद्रय़, दारिद्रय़ाच्या संकल्पना, दारिद्रय़ रेषा, दारिद्रय़ कमी करण्यासाठीच्या विविध उपाययोजना, त्यासाठी नेमलेल्या समित्या व त्यांच्या शिफारशी, विविध सरकारी योजना त्यांचा उद्देश, लाभार्थी, योजनेचे मूल्यमापन, राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी वित्तनिर्मितीच्या पद्धती, नियोजन आयोग, नीती आयोग, पंचवार्षकि योजना, भूअधिकार सुधारणा धोरण, आंतरराष्ट्रीय परिषदा व त्यांचे मूल्यमापन, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, महिला सक्षमीकरण धोरण, २०११ ची जनगणना, आसियान, संयुक्त राष्ट्र संघटना, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, नाटो, अशा संघटना व त्यांची कामे, दारिद्रय़ निर्देशांक, मानव विकास अहवाल, लिंग असमानता निर्देशांक, त्यांची मानके, भारतीय रिझर्व्ह बँक आणि तिचे कार्य, भांडवल बाजार, नाणे बाजार या घटकांचा समावेश होतो. या प्रमुख घटकांना मध्यवर्ती ठेवून आपल्या अभ्यासाची रणनीती ठरविल्यास अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे तारू पलतीराला घेऊन जाणे निश्चितच शक्य आहे.

Back

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here