⁠  ⁠

एनएसजी सदस्यत्वासाठी रशियाचे भारताला समर्थन

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 1 Min Read
1 Min Read

मॉस्कोमध्ये रशिया आणि चीनची विविध विषयांवर एक बैठक सुरू आहे. त्या बैठकीदरम्यान रशियानं एनएसजी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शवल्यानं चीन आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. एनएसजी ग्रुप आंतरराष्ट्रीय स्तरावर आण्विक व्यापाराला नियंत्रित करतो. गेल्या अनेक वर्षांपासून एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 48 सदस्य असलेल्या एनएसजी ग्रुपच्या विस्तारासाठी एक परीक्षा निवडण्यात यावी. त्यानंतरच मेरिटच्या आधारावर एखाद्या देशाला सदस्यत्व देण्यात यावं, अशी एक अट चीननं ठेवली आहे. या संघटनेच्या नियमांनुसार नवा सदस्य म्हणून भारताला प्रवेश देण्यासाठी चीनची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. अण्वस्र प्रसार बंदी करारावर (एनपीटी) सही न केलेल्या देशास एनएसजीचे सदस्यत्व देण्यास आपला विरोध कायम असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनाइंग यांनी सांगितले होते. भारताने एनएसजी सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केल्यानंतर पाकिस्ताननेही चीनच्या पाठिंब्यावर एनएसजीच्या सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला होता. भारताच्या एनएसजीमधील प्रवेशाला अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. मात्र चीनने अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर सह्या केल्याशिवाय कुठल्याही नव्या देशाला सदस्यत्व देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. भारताने अणवस्त्र प्रसारबंदी (एनपीटी) करारावर अद्याप सही केलेली नाही.

Share This Article