⁠  ⁠

दर्जीतर्फे टॉपर्स विद्यार्थ्यांशी चर्चासत्र व अनुभव कथनाचे आयोजन

Mission MPSC
By Mission MPSC 3 Min Read
3 Min Read

जळगाव येथील दर्जी फाऊंडेशनतर्फे युपीएससी, एमपीएससी या परीक्षांमध्ये टॉपर्स ठरलेल्या यशस्वीतांच्या चर्चासत्र व अनुभव कथनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. नुकतेच 10 वी व 12 वी च्या विद्यार्थी व पालकांना तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 10 वी 12 वी ची परीक्षा देवून सध्या सुटीचा कालावधी असला तरी जागृत पालक व विद्यार्थी उज्ज्वल भविष्यासाठी करीअर कोणते निवडावे या दृष्टीने चिंतीत आहेत. पालकांची ही समस्या दूर व्हावी व त्यांच्या पाल्याला करीअरची योग्य दिशा मिळावी यासाठी युपीएससी व एमपीएससी परीक्षांमध्ये अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण ठरलेल्या यशस्वीतांना या मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आलेले आहे. मार्गदर्शनाचा कार्यक्रम निःशुल्क असून दिनांक 23 एप्रिल 2017 रविवार रोजी सकाळी 9.30 वाजता जळगाव शहरातील ‘कांताई’ सभागृहात घेण्यात येणार आहे. युपीएससी परीक्षेसह एमपीएससीच्या राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, एएसओ व यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनाही हा कार्यक्रम खुप मोलाचा ठरणार आहे.

शैक्षणिक गुणवत्तेत आपला मुलगा नेहमी अग्रेसर रहावा या दृष्टीने पालक आपल्या मुलाला शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतू सध्या शिक्षणाची अनेक द्वारे खुली असली तरीही शाश्वत व कायमस्वरुपी रोजगार मिळेल अशा क्षेत्राच्या निवडीसाठी पालक व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे असते. योग्य माहिती मिळाल्यास या विद्यार्थ्यांना चांगला व प्रशासकिय रोजगार मिळू शकतो. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये आपण कोणत्या प्रकारे शिक्षण घेतले, मेहनत कशी घेतली, संदर्भ ग्रंथांची निवड, मार्गदर्शकांची निवड आपल्या यशाच्या मार्गवर कोणती भुमिका निभवतात याबाबतीत संपूर्ण व विस्तृत मार्गदर्शनासाठी या चर्चासत्र व अनुभव कथनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून युपीएससीची असिस्टंट कमांडंट परीक्षा ऑल इंडिया रँक-32 ने उत्तीर्ण केलेले अभ्युदय साळुंखे हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह एमपीएससीची आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पदाची परीक्षा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले सुदर्शन नगरे, एसटीआयची परीक्षा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यशस्वी झालेले प्रसन्नजित चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी अर्थात सीडीपीओ परीक्षेत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने येऊन निवड झालेले वैशाली दाभाडे यांच्यासह इतर यशस्वीतांच्या मार्गदर्शनाचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आलेले आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून जळगांव शहर महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, माजी न्यायाधिश बी.के. शिंदे, उद्योजक श्रीराम पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रशासकीय क्षेत्रात आपण कसे यशस्वी झालोत यासोबतच चर्चासत्रात पालक व विद्यार्थ्यांच्या शंकाचेही निरसण करणार आहेत तरी करीअरच्या बाबतीत जागृत असणार्या पालकांसह विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोपाल दर्जी यांनी केले आहे.

विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

Share This Article