एमपीएससी : गट ‘क’ सेवा पूर्वपरीक्षा

0
2127

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रश्नांचे स्वरूप व व्याप्ती समजून घेऊन अभ्यासक्रमाच्या चौकटीमध्ये अभ्यास करणे आवश्यक असते. त्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण खूप महत्त्वाचे ठरते. पण गट क सेवांच्या संयुक्त पूर्वपरीक्षेचे हे दुसरे वर्ष आहे. म्हणजे विश्लेषणासाठी २०१८चा एकच पेपर उपलब्ध, अशी अवस्था. तरीही या पेपरच्या विश्लेषणातून किमान प्रश्नांचे स्वरूप, काठीण्य पातळी आणि अभ्यासाची दिशा कशी असावी याचा अंदाज नक्कीच बांधता येईल. भूगोल घटकाच्या तयारीच्या दृष्टीने सन २०१८च्या पेपरचे विश्लेषण या लेखामध्ये करण्यात येत आहे.

सन २०१८ च्या पेपरमध्ये भूगोल घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न

Advertisement

पुढीलप्रमाणे

 • प्रश्न १. खालीलपकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे?

१) भूमीखंडाचा विस्तृत भाग

२) भारताच्या तिन्ही बाजूंनी असणारा समुद्र

३) ३०० ते ४०० अक्षांशाच्या पटय़ात जेट वायूचे अस्तित्व

४) वरील सर्व

 • प्रश्न २. सिमेंट उद्योग केंद्रांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा.

१) चित्तौडगढ, सवाई माधोपूर, खेतडी, दालमिया दाद्री

२) दालमिया दाद्री, सवाई माधोपूर, चित्तौडगढ, खेतडी

३) सवाई माधोपूर, चित्तौडगढ, खेतडी, दालमिया दाद्री

४) दालमिया दाद्री, खेतडी, सवाई माधोपूर, चित्तौडगढ

 • प्रश्न ३. खालील विधानांची सत्यता तपासा.

विधान अ – महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे.

विधान ब – महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनाने झालेली आहे.

१) विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत.

२) विधान अ सत्य असून आणि विधान ब असत्य आहे.

३) विधान ब सत्य असून आणि विधान अ असत्य आहे.

४) विधान अ आणि ब दोन्ही असत्य आहेत.

 • प्रश्न ४. खालील विधानांची सत्यता तपासा.

विधान अ – एखाद्या प्रदेशात उपलब्ध नसíगक साधन सामुग्रीचे प्रमाण भरपूर असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात.

विधान ब – एखाद्या प्रदेशात उपलब्ध नसíगक साधन सामुग्रीचे प्रमाण कमी असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर अशा लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या म्हणतात.

१) विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत.

२) विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे.

३) विधान ब सत्य असून विधान अ असत्य आहे.

४) विधान अ आणि ब दोन्ही असत्य आहेत.

 • प्रश्न ५. रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन ————- या पिकासाठी उत्कृष्ट आहे.

१) रबर २) कॉफी

३) ताग ४) कापूस

वरील प्रश्नांच्या आधारे पुढील बाबी समजून घेणे आवश्यक आहे

 • सर्व प्रश्नांचे स्वरूप हे थेट व पारंपरिक स्वरूपाचे आहे.
 • संपूर्ण पेपरमधील बहुविधानी प्रश्नांचे स्वरूप हे विधानांची सत्यता तपासणारे किंवा योग्य-अयोग्य / चूक-बरोबर ठरविणारे असे आहे. याचा अर्थ मूलभूत अभ्यास चांगला झाला असेल तर असे प्रश्न हे पारंपरिक प्रश्नांच्याच काठीण्य पातळीचे ठरतात.
 • भूगोलाच्या बहुविधानी प्रश्नांची संख्या जास्त असली तरी हे प्रश्न विश्लेषणात्मक नाहीत. पायाभूत अभ्यास झाला असेल तर कॉमन सेन्सच्या आधारे त्यांची उत्तरे सहज मिळून जातात.
 • नकाशावर आधारित प्रश्न विचारलेले नसले तरी नकाशावर आधारित अभ्यासाचा फायदा होईल असे प्रश्न विचारलेले आहेत.
 • तथ्यात्मक प्रश्नांवरही भर दिलेला दिसून येतो. त्यामुळे सारणी पद्धतीत अभ्यासाची टिप्पणे काढून तयारी करणे ऐनवेळच्या उजळणीसाठी उपयुक्त ठरेल.
 • भूगोलाच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक उपघटकावर प्रश्न विचारण्यात आला आहे.
 • सन २०१८मध्ये आíथक आणि प्राकृतिक भूगोलावर जास्त भर होता. म्हणजेच कोणत्या तरी ठरावीक उपघटकावर भर देऊन प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक उपघटकाच्या मूलभूत व संकल्पनात्मक बाबी समजून घ्यायलाच हव्यात.
 • लोकसंख्या उपघटकावर जास्त सखोल प्रश्न विचारलेले आहेत. त्यांचा समावेश भूगोल व अर्थव्यवस्था अशा दोन्ही घटकांमध्ये केलेला आहे. त्यामुळे या घटकाचा संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक अशा दोन्ही बाजूंनी बारकाईने अभ्यास केलेला असेल तर किमान दोन ते चार गुण खात्रीने मिळवता येतील.

वरील विश्लेषणाच्या आधारे या घटकाची तयारी नेमकी कशी करता येईल याबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.

 • रोहिणी शहा
  सदर लेख हा दैनिक लोकसत्तामधील आहे
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here