Current Affairs 11 January 2018

0
cabinet-nod-to-100-fdi-in-single-brand-retail

1) बीडमध्ये एकाच वेळी तब्बल ३०६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा

बेटी बचाओ, बेटी पढाओ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत बीडमध्ये बुधवारी एकाच वेळी तब्बल ३०६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात राजयोग फाउंडेशन व कुटे ग्रुप फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे ३०१ मुलींची नावनोंदणी झालेली असताना ऐनवेळी एकूण ३०६ मुलींचे नामकरण झाले. १५ ऑक्टोबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत या मुलींचा जन्म झालेला आहे. एकेकाळी बीड जिल्ह्यात १ हजार मुलांमागे ७०० मुली इतका जन्मदर खालावला होता. त्यातच स्त्री भ्रूणहत्या उघड झाल्या होत्या. तथापि, शासन व सामाजिक संस्थांच्या उपक्रमांमुळे स्त्री जन्मदरात सुधारणा झाली. आता जिल्ह्यात एक हजार मुलांमागे सध्या ९२७ इतका मुलींचा जन्मदर आहे. महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर २०१५ च्या ९०७ च्या तुलनेत २०१६ मध्ये ८९९ पर्यंत घसरला होता.

2) रॉकेट स्पेशलिस्ट के.सिवन इस्त्रो नवे चेअरमन

Advertisement

रॉकेट स्पेशलिस्ट के.सिवन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) नवे चेअरमन असतील. भारताने विक्रमी 104 सॅटेलाइटचे यशस्वी लाँचिंग केले होते त्यात के.सिवन यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांची कामगिरी आणि त्यांच्या इस्त्रोतील योगदानामुळेच ते चेअरमन पदापर्यंत पोहोचले आहेत. विद्यमान चेअरमन ए.एस. किरण कुमार यांचा कालावधी 14 जानेवारीला संपुष्टात येत आहे. त्यांनी 12 जानेवारी 2015 मध्ये पदभार स्वीकारला होता. इस्त्रोच्या नवीन चेअरमनची घोषणा ही अशा वेळेस होत आहे जेव्हा इस्त्रो त्यांचे 100 वे सॅटेलाइट अंतराळात सोडणार आहे. या मिशनमध्ये एकूण 31 सॅटेलाइट सोडले जाणार असून त्यातील 28 दुसऱ्या देशांचे आहे. पर्सनल मिनिस्ट्रीकडून जारी ऑर्डरनुसार, मिनिस्ट्रीच्या अपॉइंटमेंट कमिटीने स्पेस डिपार्टमेंटचे सेक्रेटरी आणि चेअरमन पदी सिवन यांच्या निवडीला मंजूरी दिली आहे. त्याचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी असेल. सिवन हे सध्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे डायरेक्टर आहेत.

3) सिंगल ब्रँड रिटेलमध्ये 100% एफडीआय

सिंगल ब्रँड रिटेलमध्ये १००% एफडीआयला (थेट विदेशी गुंतवणूक) मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने यासोबत परदेशी गुंतवणूक धोरणात आणखी काही बदल केले आहेत. यामुळे सिंगल ब्रँड रिटेल स्टोअर उघडणाऱ्या परदेशी कंपन्यांना देशी बाजारातून ३०% सुटे भाग खरेदीची अट शिथिल झाली आहे. सिंगल ब्रँड रिटेल म्हणजे एखाद्या दुकानात एकाच ब्रँडच्या वस्तू विकल्या जातील. आतापर्यंत यात ऑटोमॅटिक रूटने ४९% आणि अॅप्रूव्हल रूटने १००% एफडीआयची परवानगी होती. अॅप्रूव्हल रूटमध्ये कंपन्यांना अगोदर सरकारकडे अर्जाने मागणी करतात. मंजुरीनंतरच त्यांना स्टोअर उघडता येत होते. ऑटोमॅटिक रूटमध्ये कंपन्यांना फक्त रिझर्व्ह बँकेला गुंतवणुकीची माहिती द्यावी लागेल. या निर्णयामुळे रोजगार आणि उत्पन्नही वाढेल, असा सरकारचा दावा आहे. एफडीआय धोरणात मोदी सरकारने केलेला हा दुसरा मोठा बदल आहे. जून २०१६ मध्ये अशा बदलामुळे देशात ६० अब्ज डॉलर्स एवढी विक्रमी गुंतवणूक झाली होती.

4) स्कीइंगमध्ये भारताला पहिले मेडल

हिमाचलचीन 21 वर्षीय आंचल ठाकुरने स्कीइंगमध्ये भारताला पहिले मेडल मिळवून देवून इतिहास रचला आहे. मनाली येथील राहणारी आंचल ठाकूनने भारतकडून मंगळवारी इंटरनॅशनल लेवलच्या स्कीइंग कॉम्पिटीशनमध्ये ब्रॉन्झ मेडल आपल्या नावावर केले आहे. इंटरनॅशनल स्कीइंग कॉम्पिटीशनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिने एल्पाइन एज्डेर 3200 कपमध्ये ब्रॉन्ज मेडल आपल्या नावावर केले आहे. एल्पाइन अज्डेर 3200 कप चे आयोजन इंटरनॅशनल फेडरेशन (FIS) करत असते. आंचलने या मेडल स्लालम रेस कॅटॅगरीत जिंकले आहे. आपल्या विजयासंबंधी आंचलने ट्विटरवर शेअर करत लिहिले आहे की, शेवटी असे काही झाले आहे, ज्याची अपेक्षा नव्हती. माझे पहिले इंटरनॅशनल मेडल. नुकत्याच झालेल्या तूर्कीमधीव स्पर्धेत मी उत्तम कामगीरी केली.

5) आधार कार्डधारकांच्या सुरक्षेसाठी आता व्हर्च्युअल आयडी

आधार कार्डच्या डेटाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) द्विस्तरीय सुरक्षा पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आभासी ओळख व मर्यादित केवायसीच्या माध्यमातून वैयक्तिक गोपनीयता राखली जाईल. हा व्हर्च्युअल आयडी पर्यायी असेल. एखाद्या युजरला व्हेरिफिकेशनसाठी १२ अंकी क्रमांक देण्याची इच्छा नसेल तर तो १६ अंकी व्हर्च्युअल आयडी देऊ शकेल. यामुळे सिम व इतर सुविधांसाठी आधार क्रमांक देण्याची गरज नसेल. दुसरीकडे, मर्यादित केवायसी सुविधा ही आधारधारक नव्हे तर सरकारी संस्थांसाठी आहे. काही दिवसांपूर्वी आधारच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. १ मार्चपासून हि सुविधा सुरू होणार असून सर्व कंपन्यांना १ जूनपासून ती स्वीकारणे सक्तीचे राहील.

MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Comments

प्रतिक्रिया

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here