मनिलामध्ये ASEAN चे उद्घाटन;  रामायणाचे सादरीकरण

0
Manila_ASEAN

फिलिपाइन्सची राजधानी मनिलामध्ये सोमवारी ASEAN चे उद्घाटन झाले. आसियानच्या इनॉगरल सेरेमनीमध्ये रामायणाचे सादरीकरण झाले. याला विशेष महत्त्व असण्याचे कारण म्हणजे, एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रथमच रामायण सादर करण्यात आले. थाईलंड, कंबोडिया, फिलिपाइन्ससह अनेक दक्षिण-पूर्व देशांमध्ये रामायण त्यांच्या पद्धतीने सादर केले जाते.

यात नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्पसह अनेक दक्षिण-पूर्व एशियन देशांच्या राष्ट्राध्यक्षांचाही समावेश होता. त्यानंतत मोदींनी मनिलाच्या इंटरनॅशनल राइस रिसर्च इन्स्टीट्यूटचा दौरा केला. येथे त्यांच्या नावावर तयार केलेल्या श्री नरेंद्र मोदी रेजिलिएंट राइस फिल्ड लॅबोरेटरीचे त्यांनी उद्घाटन केले. याठिकाणी त्यांनी शेतीचे कामही केले. फिलिपाइन्समध्ये होत असलेल्या 31st ASEAN परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे पंतप्रधान केकियांग, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेद्वेदेव, मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझ्झाकही पोहोचले आहेत.

– ASEAN चा फुल फॉर्म (Association of Southeast Asian Nations) असा आहे. यात अमेरिका, रशिया, भारत, चीन, जपान आणि नॉर्थ कोरियासह एशिया रीजनल फोरम (एआरएफ) चे 23 सदस्य आहेत. ही संस्था 8 ऑगस्ट 1969 ला थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये स्थापन करण्यात आली होती. थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स आणि सिंगापूर याचे फाऊंडर मेंबर होते. 1994 मध्ये आसियान ने एआरएफ स्थापन केले. त्याचा उद्देश सुरक्षेला प्राधान्य देणे हे होते.

Comments

प्रतिक्रिया

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here