मुंबईतील झोपडपट्टीत राहणारा तरुण बनला इस्त्रोत शास्त्रज्ञ

0
110
Pratamesh-hirve-isro

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी प्रमाणिकपणे मेहनत घेतल्यास यश मिळतेच मात्र या परीक्षांची तयारी करतांना अन्य परीक्षांमध्ये यश मिळवता येत असते. यूनियन पब्लिक सर्विस कमीशनच्या(णझडउ) परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश न मिळालेल्या एका तरुणाने इंडियन स्पेस रिसर्च आर्गेनायजेशनची (इस्रो) परीक्षा दिली. त्यात तो उत्तीर्णही झाला. १६ हजार विद्यार्थ्यांतून केवळ ९ तरूणांची निवड झाली. यात प्रथमेश नावाच्या मराठमोळ्या तरुणाचाही समावेश आहे. प्रथमेश हा मुंबईतील झोपडपट्टीत राहणारा सर्वसामान्य तरुण आज इस्त्रोत शास्त्रज्ञ बनला आहे.

पवईतील झोपडपट्टीत राहणार्‍या २५ वर्षीय प्रथमेश हिरवेचा इस्रोपर्यंत जाण्याचा दहा वर्षांचा प्रवास प्रचंड संघर्षपूर्ण राहिला. मूळचा सातारा जिल्ह्यातील राहणार्‍या प्रथमेशचे पिता एका प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहे. आई फक्त ८ वीपर्यंत शिकलेली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब झोपडीपट्टीतील १० बाय १० च्या छोट्या खोलीत राहते. गरिबीत वाढलेल्या प्रथमेशने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. प्रथमेशचे आई-वडिल त्याला एक इंजिनियर बनवू इच्छित होते. मात्र, खूप प्रयत्न करूनही त्याला इंजिनियरिंगला प्रवेश मिळू शकला नाही. यानंतरही प्रथमेशने हिंमत हारली नाही आणि भागुभाई मफतलाल पॉलिटेक्निक कॉलेजमधून इलेक्ट्रिक इंजिनियरिंगचा डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतला. प्रथमेशला आपल्या आयुष्यात अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. यात एक होती इंग्रजी भाषा. प्रथमेशने मराठी माध्यमातून शिक्षण घेतले होते. डिप्लोमाची पहिली दोन वर्षे त्याला भाषेचा खूप त्रास सहन करावा लागला. इंग्रजी भाषा अडचणीची ठरू लागल्याचे लक्षात येताच त्याने बाजारातून डिक्शनरी आणली. त्याद्वारे त्याने प्रथम इंग्रजी सुधारण्यावर भर दिला. आज तो उत्तम इंग्रजी बोलतो. डिप्लोमा पूर्ण करताच प्रथमेशने इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून २०१४ मध्ये इंजिनियरिंगची डिग्री घेतली. यानंतर त्याने यूनियन पब्लिक सर्विस कमीशन(णझडउ) साठी प्रयत्न केला. मात्र, यशही मिळाले नाही आणि त्याने वेगळे काहीतरी करण्याचा विचार केला. यानंतर प्रथमेशने इस्रोत अर्ज केला. मात्र, सुरूवातीला यश आले नाही. नंतर तो एका कंपनीत इंजिनियर म्हणून रूजू झाला. मात्र, इस्रोसाठी प्रयत्नच करत राहिला. अखेर यंदा इस्रोच्या संशोधकासाठी झालेल्या परीक्षेतून १६ हजार विद्यार्थ्यांतून केवळ ९ तरूणांचे सिलेक्शन झाले. यात प्रथमेशचा समावेश होता. इस्रोमध्ये सिलेक्ट होण्यासाठी प्रथमेश मागील १० वर्षापासून करत असलेल्या एकत्रित अभ्यासाचे फळ असल्याचे मानतो. सध्या तो चंडीगडमध्ये इस्त्रोच्या शाखेत पोस्टिंगवर आहे.

Advertisement
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here