⁠  ⁠

विक्रीकर निरीक्षक परीक्षेचे स्वरूप – १

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read

information-about-sales-tax-inspector-examination-1राज्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा विभाग अशी विक्रीकर विभागाची ओळख सर्वश्रुत आहे. राज्य लोकसेवा आयोगाद्वारे विक्रीकर विभागातील कर सहाय्यक (गट ‘क’), विक्रीकर निरीक्षक (गट ‘ब’ अराजपत्रित) आणि सहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट ‘अ’ राजपत्रित) या तीन पदांकरता या परीक्षेद्वारे निवड केली जाते. त्यापकी कर सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षक पदांसाठी स्वतंत्र परीक्षेद्वारे तर सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी राज्यसेवा परीक्षेद्वारे निवडप्रक्रिया राबवली जाते. आयोगातर्फे २०१५ साली आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानुसार विक्रीकर निरीक्षक २०१४ ही परीक्षा पार पडली आहे. विक्रीकर निरीक्षक २०१५ परीक्षा शासनाच्या मागणीपत्रकाअभावी वेळापत्रकानुसार होऊ शकली नाही. अलीकडेच आयोगाने २०१६ साली होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. उमेदवारांनी अभ्यासाचे नियोजन या वेळापत्रकाच्या आधारे करावे.

या लेखाद्वारे विक्रीकर निरीक्षक परीक्षेची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. विक्रीकर निरीक्षक परीक्षेचे टप्पे पुढील प्रमाणे-

ही परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते-
१. पूर्व परीक्षा (१०० गुण)
२. मुख्य परीक्षा (२०० गुण)
अंतिम निवडीच्या वेळी पूर्व परीक्षेचे गुण ग्राह्य धरीत नाही.

पहिला टप्पा – पूर्व परीक्षा
विक्रीकर निरीक्षक परीक्षेच्या पेपरचा पारंपरिक बाज सोडून नव्या आकृतीबंधानुसार २०१४ सालची परीक्षा पार पडली. खुल्या प्रवर्गातून मुख्य परीक्षेकरता निवडल्या गेलेल्या शेवटच्या उमेदवाराला पूर्व परीक्षेत १०० पकी ३२ गुण मिळाले होते. इतर संवर्गातील उमेदवारांचे गुण कमी-अधिक फरकाने असेच होते. यावरून पूर्व परीक्षेचे बदललेले स्वरूप आणि काठीण्यपातळीचा आपण अंदाज बांधू शकतो. पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा तपशील खालील रकान्यात मांडलेला आहे-

पूर्व परीक्षेच्या डिटेल अभ्यासक्रमासाठी येथे क्लिक करा

sales-tax-inspector-examination-question paper details
टीप: प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता १/४ निगेटिव्ह मार्किंग आहे.

दुसरा टप्पा – मुख्य परीक्षा
पूर्व परीक्षेद्वारे यशस्वी उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेकरता केली जाते. मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा तपशील खालील रकान्यात मांडलेला आहे-

sales-tax-inspector-examination-question paper details
टीप: पेपर क्र. १ व २ करता प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता १/४ निगेटिव्ह मार्किंग आहे.

पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम
राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील चालू घडामोडी, नागरिकशास्त्र-राज्यघटना, राज्य आणि ग्रामीण प्रशासन, आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल-महाराष्ट्र आणि जागतिक संदर्भासहित, अर्थव्यवस्था- भारतीय आणि शासकीय स्तर, सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आणि आरोग्यशास्त्र, बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित या घटकांचा पूर्वपरीक्षेत समावेश होतो.

पूर्व परीक्षेचे विश्लेषण
२०१४ सालच्या विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेत ६५ प्रश्न सामान्य अध्ययनावर आधरित आणि उर्वरित १५ प्रश्न बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित या विषयांवर आधारित होते. सामान्य अध्ययनावर आधारित ८५ पकी ६३ प्रश्नांचे उत्तर बहुविधानात्मक होते (जसे अ आणि ब, वरील सर्व इ.). हे प्रमाण तीन चतुर्थाश आहे. बुद्धिमापन आणि अंकगणितावर आधारित १५ पकी १२ प्रश्न तर्क क्षमतेवर आणि केवळ ३ प्रश्न अंकगणितावर विचारण्यात आले होते.

विश्लेषणाची निकड
जास्त प्रश्न सोडविण्याच्या ओघात परीक्षार्थीचे बहुविधानात्मक प्रकारचे प्रश्न चुकण्याची शक्यता अधिक असते. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सखोल अभ्यास आणि त्याला या प्रकारच्या प्रश्नांच्या सरावाची जोड निर्णायक ठरू शकते. अभ्यासपद्धती दिशाहीन असल्यास परीक्षार्थी नाहक भूलथापांना बळी पडण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे स्वत: परीक्षार्थीनी प्रश्नपत्रिकांचे विषयनिहाय सूक्ष्म विश्लेषण करणे अधिक व्यवहार्य ठरते.

२०१६ मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा

संदर्भ साहित्य सूची
इतिहास : ‘एनसीइआरटी’ची सातवी ते बारावीची क्रमिक पुस्तके. राज्य मंडळाची पाचवी, आठवी आणि अकरावीची क्रमिक पुस्तके, ‘इंडिया इअर बुक’मधील संस्कृतीविषयक पाठ.

भूगोल : ‘एनसीइआरटी’ची सहावी ते बारावीची क्रमिक पुस्तके, ‘इंडिया इअर बुक’मधील पाठ.

नागरिकशास्त्र : ‘एनसीइआरटी’ राज्यशास्त्राविषयक पुस्तके.

आर्थिक व सामाजिक विकास: ‘एनसीइआरटी’ अकरावीचे पुस्तक, भारताची व महाराष्ट्राची आíथक पाहणी, ‘इंडिया इअर बुक’मधील पाठ, वार्षकि अंदाजपत्रक.

सामान्य विज्ञान व पर्यावरण : जैवविविधता : ‘एनसीइआरटी’ची सहावी ते बारावीची भूगोल व विज्ञानाची क्रमिक पुस्तके, ‘इंडिया इअर बुक’मधील पाठ.

अंकगणित आणि तार्किक क्षमता: या विषयीच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी बँक क्लार्क व परिविक्षाधीन अधिकारी किंवा स्टाफ सिलेक्शन बोर्डाच्या गेल्या काही वर्षांचे प्रश्नासंच सोडवा.

पुढील लेखात आपण विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा आणि त्याअनुषंगाने अभ्यासाचे नियोजन यासंबंधी माहिती घेऊ.
(क्रमश:)

(सदर लेख चंद्रशेखर बोराडे यांनी दैनिक लोकसत्ताच्या ‘करियर वृतांत’ या सदरात लिहला असून तेथून साभार घेण्यात येत आहे.)

Share This Article