⁠  ⁠

ब्रिक्स देशांतील विद्यापीठांची क्रमवारी जाहीर; आयआयटी मुंबई नवव्या स्थानावर

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 1 Min Read
1 Min Read

जगभरातील शिक्षणसंस्थाची क्रमवारी जाहीर करणाऱ्या ‘क्यूएस’ संस्थेने जाहीर केलेल्या ब्रिक्स राष्ट्रांतील शिक्षणसंस्थांच्या क्रमवारीत आयआयटी मुंबईने नववे स्थान पटकावले आहे. बंगळूरु येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (आयआयएससी) दहाव्या स्थानावर आहे. देशातील साधारण ४५ शिक्षणसंस्थांना या क्रमवारीत पहिल्या दोनशे संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे. क्यूएस या संस्थेकडून जगातील उच्चशिक्षण संस्थांची पाहणी करण्यात येते. संस्थांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थी आणि शिक्षकांचे गुणोत्तर, परदेशी विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकरीच्या संधी अशा विविध घटकांचा आढावा घेऊन उच्चशिक्षण संस्था आणि विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. क्यूएसकडून ब्रिक्स राष्ट्रांतील संस्थांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये आयआयटी मुंबईने शंभरपैकी ८३.६ गुण मिळवून नववे स्थान पटकावले आहे. गेल्यावर्षी आयआयटी मुंबईचे स्थान या क्रमवारीनुसार तेरावे होते. बंगळूरु येथील आयआयएससीने यंदा दहावे स्थान पटकावले आहे. आयआयटी दिल्ली (१७), मद्रास (१८), कानपूर (२१), खरगपूर (२४) आणि दिल्ली विद्यापीठ (४१) यांनी पहिल्या पन्नास विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे.

TAGGED: ,
Share This Article