⁠  ⁠

पोलिस उपनिरीक्षक (PSI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा?

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 3 Min Read
3 Min Read

how-to-solve-psi-pre-question-paperतुमच्यापैकी बरेच जण पोलिस उपनिरीक्षक (PSI) पूर्व परीक्षेची तयारी करत असणार. अनेकांना प्रश्न पडतो ऑब्जेक्टीव्ह पेपर कसा सोडवावा? पुढील लेखाद्वारे पेपर सोडवतांना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी मी सविस्तर लिहिले आहे. माझ्या मते तुम्ही जर खालीलप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक (PSI ) पूर्वची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळेचं नियोजन केलं तर तुम्ही ठरलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवू शकाल.

१०० प्रश्न – सोडवण्यासाठी ६० मिनिटे

[callout color=”#dd3333″ radius=”10″ fontsize=”18″ bt_content=”Click Here” bt_pos=”right” bt_style=”undefined” bt_link=”https://missionmpsc.com/psi-pre-new-syllabus/” bt_target=”_blank” bt_radius=”10″ bt_outer_border=”true” bt_icon=”momizat-icon-file”]PSI Preliminary Exam Syllabus[/callout]

साधारणपणे, खालीलप्रमाणे प्रश्न येतात त्या त्या विषयावर:

  • अंकगणित – १५ प्रश्न
  • भूगोल – १५ प्रश्न
  • इतिहास – १५ प्रश्न
  • विज्ञान – १५ प्रश्न
  • नागरिकशास्त्र – १० प्रश्न
  • चालू घडामोडी – १५ प्रश्न
  • अर्थव्यवस्था – १५ प्रश्न

[icon type=”vector” icon=”momizat-icon-clock” size=”32″ hover_animation=”border_increase” ]PSI चा पेपर सोडवतांना वेळेची विभागणी कशी करावी ?

  1. १० मिनिटे – शेवटच्या क्षणी काही प्रश्न राहिले असतील तर त्यांना सोडवण्यासाठी म्हणजेच रिविजनसाठी राखून ठेवावेत.
  2. अंकगणिताचे १५ प्रश्न सुरुवातीला सोडवू नयेत कारण त्यात भरपूर वेळ वाया जातो. ते प्रश्न सर्वात शेवटी सोडवावेत.
  3. तर मग ८५ प्रश्न ४० मिनिटांत सोडवायाचेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याजवळ २८.२३ सेकंद आहेत (२४०० सेकंद /८५ प्रश्न). तरी प्रत्येक प्रश्न २० सेकंदात सोडवायचा प्रयत्न करावा.
  4. ज्या प्रश्नाचं उत्तर “येतच” नसेल तर तो प्रश्न लगेच सोडून द्यावा आणि पुढच्या प्रश्नाकडे जावे. पण आठवणीने तो प्रश्न क्रमांक तुम्ही कच्चे काम कराल त्या जागी लिहून ठेवावा. प्रश्नपत्रिकेवर कोणत्याही प्रकारचे चिन्ह वगैरे करू नये.
  5. एखादा प्रश्न २० सेकंदात सोडवता आला नाही तर त्याला सोडून पुढील प्रश्नाकडे जावे. तो प्रश्न क्रमांक तुम्ही कच्चे काम कराल त्या जागी लिहून ठेवावा.
    जर प्रत्येक प्रश्नाला तुम्ही २० सेकंद दिलेत तर पहिल्या राउंडमध्ये ८५ प्रश्नांना ४३ मिनिटे लागतील (८५ प्रश्न X २० सेकंद = १७०० सेकंद = २८ मिनिटे).
  6. दुसरा राउंड १२ मिनिटांचा असेल. तर १२ मिनिटांत राहून गेलेले प्रश्न सोडवावेत. तेव्हा सुद्धा वरील प्रमाणे २० सेकंदाचा नियम वापरावा. १० मिनिटांत अंक गणितावरील १५ प्रश्न सोडवावेत.
  7. सर्वात शेवटी १० मिनिटे उरतील तर त्यादरम्यान राहून गेलेले बाकी प्रश्न सोडवावेत. एखाद्या प्रश्नाचे उत्तर घाईघाईत नोंदवू नये. निगेटिव्ह मार्क सिस्टीम असल्याने तुमचेच नुकसान होऊ शकते.

[callout color=”#dd3333″ radius=”10″ fontsize=”18″ bt_content=”Click Here” bt_pos=”right” bt_style=”undefined” bt_link=”https://missionmpsc.com/book-list/psi-book-list/” bt_target=”_blank” bt_radius=”10″ bt_outer_border=”true” bt_icon=”momizat-icon-book”]पोलिस उपनिरीक्षक PSI ची तयारी करत असतांना कोणती पुस्तके वाचावीत?[/callout]

[quote font_size=”18″ arrow=”yes”]विद्यार्थी मित्रांनो यानंतर हि तुमचे काही प्रश्न असल्यास खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्सद्वारे विचारू शकतात. लेख आवडल्यास सोशल मिडियावर नक्की शेअर करा. नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC[/quote]

आगामी पोलिस उपनिरीक्षक (PSI ) परीक्षेसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो !!!

Share This Article