राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी?

1
how-to-prepare-for-mpsc-preliminary-exam

नुकतीच झालेली राज्यसेवा Mains आणि त्यानंतरचा अतिशय गरजेचा असा सुट्टीचा एक आठवडा संपत आल्यामुळे बऱ्याच लोकांचा मोर्चा परत prelim च्या अभ्यासाकडे वळाला असेल. तसेच prelim 6 महिन्यावर आली असल्याने पहिल्या attempt वाल्यांना तयारी बाबत अनेक प्रश्न पडत असतील तर त्यावर काही उत्तरे जशी मला माझ्या स्पर्धापरिक्षा प्रवासात समजली तशी देत आहे.

MPSC Rajyaseva Prelims चा अभ्यास कधी सुरु करावा?

ज्यांनी अगोदर MPSC Rajyaseva Mains दिली आहे किंवाMPSC Rajyaseva Mains चा पूर्ण अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी 3 महिने हा कालावधी MPSC Rajyaseva Prelim साठी पुरेसा आहे. परंतु ज्यांना अगोदर MPSC Rajyaseva Prelims मध्ये अपयश आलेले आहे त्यांनी आणि पहिला attempt असलेल्यांनी 4-5 महिन्याचा कालावधी राखून ठेवावा. कारण prelim पास न झाल्यास mains च्या अभ्यासाचा कसलाही फायदा नाही. म्हणून किती अभ्यास लागणार आहे त्याचा अंदाज नसेल तर लवकर सुरु करणे कधीही उत्तम. प्रत्येकाला स्वतःच्या वाचनाच्या गतीनुसार आणि अगोदर च्या अभ्यासाच्या अंदाजावर किती कालावधी लागणार हे ठरवावे लागेल.

कोणत्या पेपर ला जास्त महत्व द्यावे?

खरे तर हा प्रश्नच पडू नये. जर प्रत्येक पेपर 200 मार्क ला असेल तर एकाला कमी आणि एकाला जास्त किंमत देऊन कसं चालेल? पण 90% लोकांची इथेच चूक होते. GS पेपर ला गरजेपेक्षा अधिक महत्व दिले जाते आणि CSAT पेपर परीक्षा जवळ आल्यावर करू या कारणाखाली दुर्लक्षित राहतो. मग परीक्षा जवळ येते आणि tension आलं की विध्यार्थी परत GS च्याच मागे लागतात आणि मग MPSC Rajyaseva CSAT ला कमी मार्क पडून स्पर्धेतून OUT व्हावे लागते.

गेल्या वर्षीचा MPSC Rajyaseva CUTOFF 189 वर जाण्यामागे CSAT ला पडलेले भरमसाट मार्क्स हेच आहे. तसेच GS चा अभ्यासक्रम आणि येणाऱ्या प्रश्नांची पातळी पाहता GS मध्ये जास्त मार्क पडतील याची कोणीही हमी देऊ शकत नाही. मग जिथे मेहनत करून फायदा मिळण्याची शाश्वती नाही तिथे गरजेपेक्षा जास्त वेळ देणे म्हणजे हमखास अपयश ओढवून घेण्यासारखे आहे.

त्यामुळे तुम्ही जेवढा वेळ MPSC RAJYASEVA PRELIM च्या अभ्यासाला देणार असाल त्यातील किमान 30% वेळ हा CSAT ला द्यावाच. म्हणजे जर तुम्ही रोज 10 तास अभ्यास करत असाल तर रोज 3 तास CSAT चा अभ्यास झालाच पाहिजे. CSAT चा केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. जेवढा अभ्यास जास्त तेवढे मार्क्स वाढत जाणारच. आणि हे सगळं आर्टस् पासून इंजिनीरिंग पदवी असणाऱ्या सगळ्यांना लागू पडते.

राज्यसेवा मुलाखत तयारी – विशाल नाईकवाडे

अभ्यास कसा करावा?

CSAT चा अभ्यास कसा आणि कधी करावा यावर एक स्वतंत्र लेख लवकरच लिहीन. या लेखा मध्ये GS च्या अभ्यासाबद्दल लिहितो. सर्वप्रथम गेल्या 6 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करावा. त्यातून दिसून येईल की, कसा ही पेपर आला तरी 30-35 पेक्षा जास्त प्रश्नाबद्दल आपण खात्री देऊ शकत नाही. कितीही पुस्तके वाचली तरी 60 एक प्रश्न माहिती नसलेलेच येणार. त्यामुळे वेगळे प्रश्न दिसले तर घाबरून जायचं कारण नाही.

अभ्यासक्रमातील एका घटकासाठी कोणतेही एकच पुस्तक खूप वेळा वाचावे. एकाच विषयाची खूप पुस्तके वाचून फारसा फायदा होत नाही. तसेच कोणताही घटक करायचा सोडू नये. एखादा विषय अवघड जात असेल तरी तो करावाच. आणि जो विषय सोपा जातो त्यातले बहुतेक प्रश्न कसे बरोबर येतील या दृष्टीने विचार करावा.

रोज अभ्यासाला बसण्यापूर्वी मागील 5 वर्षात त्या विषयावर कोणते प्रश्न विचारले होते ते पहावे म्हणजे अभ्यास करताना कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचे आणि काय लक्षात ठेवायचे याचा अंदाज येऊन अभ्यास परिणामकारक होतो. अभ्यास करताना महत्वाच्या बाबींना underline आणि अति महत्वाच्या आणि वारंवार वाचूनही विसर पडणाऱ्या गोष्टीच्या नोट्स काढाव्यात. पूर्ण विषयाच्या नोट्स काढणे टाळले तरी चालेल. उदाहरणार्थ महत्वाच्या BRITISH GOVERNER GENERALS च्या कारकिर्दीचे कालखंड पाठ असावेत म्हणून त्यांच्या नावाची आणि वर्षाची यादी बनवावी. परंतु 1920 च्या असहकार चळवळीची कारणे व परिणाम याच्या नोट्स काढायची गरज नाही.

तसेच, रोज रात्री आज वाचलेल्या विषयावरचे 20-30 प्रश्न अर्धा तास वेळ देऊन सोडवावेत. वाचायला कितीही वेळ कमी पडला तरी रोज अर्धा तास प्रश्न सोडवण्याची practice च तुम्हाला GS च्या पेपर मध्ये जास्त मार्क्स देऊन जातील. प्रश्न सोडवण्याची पद्धत आणि प्रत्यक्ष परिक्षेवेळी घ्यावयाची काळजी यावर स्वतंत्र लेख लिहिणार आहे.

MPSC RAJYASEVA PRELIM च्या अभ्यासक्रमातील जे घटक MPSC RAJYASEVA MAINS ला असतील त्यासाठी एकच source वापरावा. म्हणजे समजा जर भारताच्या इतिहासाचा mains चा अभ्यास तुम्ही ग्रोव्हर मधून केला असेल तर PRELIM साठी पण तेच वापरावे. नवीन SOURCE च्या मागे लागू नये.

खाली एक सर्वसाधारण BOOKLIST देत आहे. परंतु तुम्ही आधी ज्यातून अभ्यास केला असेल तीच पुस्तके वापरा. पास होण्यासाठी कोण्या एका पुस्तकातूनच वाचलं पाहिजे असं काही नाही.

Booklist:

1.Polity – Laxmikant/Kolambe
2.Panchayat Raj – Kishor Lawate किंवा beginners साठी तात्याचा ठोकळा
3.Environment – unique Academy
4.Current – Prithvi parikrama किंवा Sakal yearbook
5.Science – Sachin Bhaske Dynandeep किंवा Kolambe
6.Geography – state board (7th-12th)
7.Economy – Kolambe
8.History- Spectrum किंवा ग्रोव्हर आणि state board (11वी)

(Special thanks to Poonam Patil(DySP) for sharing her booklist.)

चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा?

अपडेट राहण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल – @MissionMPSC

Newspaper ला किती वेळ द्यावा?

Prelim च्या GS पेपर मध्ये चालू घडामोडी हा एक अतिशय महत्वाचा असा भाग आहे. परंतु या भागावरील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त असते. तसेच या प्रश्नांचा नक्की source शोधता येत नाही. त्यामुळे कोणता तरी एक NEWS पेपर आणि चालू घडामोडीचे एक मॅगझिन वाचणे योग्य राहील. कोणते मॅगझिन निवडायचे हे प्रत्येकाने स्वतःच्या आवडीने निवडावे. परंतु 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ news पेपर ला देणे योग्य ठरणार नाही. कारण प्रश्न कोणत्या गोष्टीवर येणार याची आपल्याला कल्पना नसते त्यामुळे बरंच वाचन हे निष्फळच जाते. त्यापेक्षा तो वेळ CSAT वर खर्च केला तर मार्कंमध्ये जास्त वाढ करता येईल.

तसेच Group Discussion ने चालू घडामोडींचा अभ्यास कमी वेळेत आणि जास्त चांगला केला जाऊ शकतो. चालू घडामोडीला जास्त वेळ देऊन इतर गोष्टींना कमी वेळ देणे हि धोक्याची घंटा ठरू शकते. चालू घडामोडी करताना मागील प्रश्नपत्रिका तसेच आपल्याला काय लक्षात राहते आणि काय नाही याचा अंदाज घेऊन अभ्यास करावा. कितीही करून जे लक्षात राहणार नाही त्याच्या Revision ला जास्त वेळ देऊ नये.

GROUP चा फायदा कसा होईल?

१. सुरुवातीला विषय वाटून घेऊन वाचून एकमेकांना समजून सांगता येईल. यामुळे अभ्यासक्रम लवकर पूर्ण होईल. तसेच विषय व्यवस्थित समजेल.
२. नंतरच्या टप्प्यात गटचर्चेमध्ये एकमेकांना प्रश्न विचारून त्याची उत्तरे DISCUSS केली तर गोष्टी लक्षात रहायला मदत होईल.
यामध्ये तुम्ही दुसर्यांना जेवढ्या गोष्टी सांगाल तेवढ्या त्या गोष्टी तुमच्या पक्क्या लक्षात राहतील. त्यामुळे फक्त दुसर्यांचे ऐकण्यासाठी चर्चेला जाऊन फायदा होणार नाही.

एवढ्या सर्वसाधारण माहितीवर अभ्यास सुरु करता येईल. MPSC Rajyaseva CSAT चा अभ्यास कसा करावा, प्रत्यक्ष परिक्षेवेळी काय काळजी घ्यावी आणि MULTIPLE CHOICE प्रश्न कशे हाताळावे यावर स्वतंत्र लेख लवकरच लिहीन.

माझ्या अनुभवाचा तुम्हास उपयोग होईल अशी आशा आहे. काही बाबतीत शंका असेल तर ती COMMENT SECTION मध्ये लिहून पाठवा. PRELIM च्या अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा.

(अमोल मांडवे सरांच्या वाटाड्या या ब्लॉगवरून साभार.)

Other important articles for MPSC Rajyaseva 2018 Preparation:

 

अपडेट राहण्यासाठी लाईक करा फेसबुक पेज – Mission MPSC

Comments

प्रतिक्रिया

Advertisement

1 COMMENT

  1. गेल्या वर्षीचा CUTOFF 189 वर जाण्यामागे CSAT ला पडलेले भरमसाट मार्क्स हेच कारण नाही… अजुन एक कारण हे होते की वयाच्या अटित वाढ करण्यात आली होती… जवळ जवळ ३०-४० गुणांनी कट ऑफ वाढला जरी त्यांनी Mains Notification मध्ये जागा पण वाढवल्या होत्या……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here