⁠  ⁠

C-SAT ची तयारी कशी करावी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

1.सर्वप्रथम गेल्या चार वर्षांच्या प्रश्‍नपत्रिकांचे व्यवस्थित विश्‍लेषण करावे. त्यामध्ये तुम्हाला कळेल की, उतार्‍यांचे काही ठराविक विषय आहेत (ऐतिहासिक, राजकीय, मानवी भावना, तत्त्वज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण इ.) यापैकी तत्वज्ञान, मानवी भावना इ. वरचे उतारे आकलनास थोडेसे अवघड असतात. त्यामुळ तुम्हाला सोप्या वाटणार्‍या विषयांच्या उतार्‍यांना प्राधान्य द्या.

2. Apti व Reasoning मधील काही प्रश्‍न खूप किचकट असतात. त्यामुळे तिथे जास्त वेळ न घालवता बकीचे प्रश्‍न सोडवा.

3. Passage सोडवताना एकच भाषेत असलेले Passage सोडवा. कारण ते भाषांतरीत नसल्याने आकलनास सोपे जातात. असे साधारण 3 Passage असतात.

4. C-SAT च्या पेपरमधील उतार्‍यांवरील प्रश्‍नांचा एक ठराविक साचा आहे. माझ्या मते यामध्ये आकलन हा भाग कमी असून शब्दांचे खेळ हा भाग जास्त आहे. बर्‍याच जणांना प्रश्‍न असतो की, आधी Passage वाचा की प्रश्‍न. माझी पद्धत अशी होती की प्रश्‍न वाचून त्यातला Keyword शोधणे व मग Passage मधून त्या Keyword वर आधारित उत्तरे शोधणे. या पद्धती Elimination Method चा वापर करुन वेळ वाचवता येतो. तुम्ही तुम्हाला Comfortable असलेल्या पद्धतीने Passage सोडवावेत.

5. माझ्या मते पेपर सोडण्याचा क्रम असा असावा.
1) Decision Making  –
2) Apti Reasoning
3) एकचा भाषेत असलेले Passage (मराठी-इंग्रजी दोन्ही)
4) तुम्हाला सोप्या जाणार्‍या विषयांनुसार Passage सोडवावेत
(उदा.- ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण इ.)
Apti व Reasoning प्रथम सोडवल्याने आपला ईींंशािीं किती ठेवावा हे समजते.

Sources
C-SAT Smplified अजित थोरबोले सर
R.S.Agrawal – Quant, Aptitude] Verbal – N.Verbal Reasoning News Pepar मधील संपादकीय पानावरील लेख वाचताना Passage समजून वाचणे व त्यावर आयोगाच्या पद्धतीनुसार प्रश्‍न बनवणे.

  • अतुल अ. कानडे
    (परि. अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क)

Share This Article