एकाच कुटुंबातील चार बहिण-भाऊ झाले आयएएस-आयपीएस

0
213
upsc_inspiring_story

आयएएस आणि आयपीएस होण्यासाठी कित्येक वर्षे कष्ट घेऊन कुटुंबातील एखादा तरुण किंवा युवती या पदावर जाते. महत्प्रयासाने अधिकारी पद मिळवणे हे खर्‍या अर्थाने तुमचे कसब दाखवणारे असते. अनेक कुटुंबातील एखादी मुलगी किंवा मुलगा तरी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी धडपडत असतो. काही वर्षांनी तो यामध्ये यशस्वी होऊन सेवेत दाखलही होतो. मात्र एकाच कुटुंबातील तब्बल ४ बहीण-भाऊ प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. प्रतापगड जिल्ह्यातील लालगंज तालुक्यातील मिश्रा कुटुंबातील हे बहीण-भाऊ आहेत. यांचा हा प्रवास आपणासर्वांना निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल…..

प्रतापगढच्या लालगंज तालुक्यात राहणारे अनिल मिश्रा यांचे एक स्वप्न होते की, त्यांची मुलं-मुली मोठे झाल्यानंतर असे काही काम करे ज्यामुळे त्यांचे नाव निघेल. चारही भाऊ-बहिणींनी हे स्पप्न सत्यात उतरवले आहे. हे चारही भावडं आज आयएएस व आयपीएस झाले आहेत.

Advertisement

यात सर्वात मोठे भाऊ असलेले योगश मिश्रा आता कोलकता येथे राष्ट्रीय तोफ व गोळे तयार करणार्‍या संस्थेत प्रशासकिय अधिकारी आहेत. दोन नंबर असलेली त्यांची बहिण क्षमा मिश्रा आता आयपीएस उत्तीर्ण झाल्यानंतर कर्नाटकामध्ये कार्यरत आहेत. तिसर्‍या क्रमांकावरील माधवी मिश्रा या आयएएस असून त्यांची पोस्टींग दिल्ली येथे आहे. सर्वात लहान असलेले लोकश मिश्रा जे देखील आयएएस आहेत ते आता बिहारच्या चंपारण जिल्ह्यात ट्रेनिंग घेत आहेत.

योगेश मिश्रा हे सर्वात मोठे असल्याने त्यांनी आधी आयएएस उत्तीर्ण होण्याचा प्रण घेतला होता कारण त्यानंतर त्यांना आपल्या लहान भाऊ व बहिणींना मार्गदर्शन करायचे होते. ते आयएएस होण्याआधी सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. ते नोएडामध्ये एका कंपनीत काम करत असतांना त्यांच्या दोन्ही बहिणी क्षमा व माधवी प्रशासकिय सेवांमध्ये येण्यासाठी तयारी करत होत्या. योगेश यांच्यावर घरची जबाबदारी असल्याने ते नोकरी करत होते. दोन्ही बहिणींनी परीक्षा दिल्यानंतर पहिल्या प्रयत्नात त्या नापास झाल्या. याकाळात त्या प्रचंड डिप्रेशन मध्ये होत्या. त्यावेळी योगेश यांनी ठरविले की, आपण आयएएस अधिकारी होवून दाखवू व त्यानंतर बहिणींना योग्य मार्गदर्शन करु. त्यांनी तयारी सुरु केली व पहिल्याच प्रयत्नात आयएएस अधिकारी झाले. यानंतर त्यांनी लहान भाऊ व बहिणींना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. याकाळात ते केवळ दोन खोल्यांच्या लहानशा घरात राहत होते. घरी कोणी पाहूणे जरी आले तरी त्यांना खुप अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र त्यांनी केलेल्या दृढनिश्‍चयापुढे सर्व अडचणी फार छोट्या ठरल्या. सन २०१५ मध्ये क्षमा यांचे सिलेक्षण उप पोलीस अधिक्षक म्हणून झाले मात्र त्यांनी युपीएससीची तयारी सुरुच ठेवली. त्यानंतर पुढच्याच वर्षी २०१६ मध्ये दिलेल्या परीक्षेत त्या आयपीएस झाल्या. माधवी यांनी इकॉनॉमिस्टमधून पोस्ट ग्रॅज्युएशन पुर्ण केल्यानंतर २०१६ मध्येच त्या देखील आयएएस झाल्या. लोकेश यांनी केमिकल इंजिनिअरींग पूर्ण केल्यानंतर एका खाजगी कंपनीत नोकरी केली. २०१५ मध्ये ते बीडीओ झाले. मात्र तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली व ते देखील आयएएस उत्तीर्ण झाले. या चारही भाऊ-बहिणींचा प्रवास अनेक हुशार व गुणवंतांना मार्गदर्शक असा ठरला आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here