⁠  ⁠

चालू घडामोडी : ९ नोव्हेंबर २०१९

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 9 November 2019

हॉकी २०२३ विश्वचषकाचे भारताला मिळाले यजमानपद

भारताला २०२३ मध्ये होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषकाचे यजमानपद मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. पुरुष हॉकी विश्वचषक ५ वर्षांनंतर खेळवला जाईल, असे पहिल्यांदा होत आहे. भारत पहिला देश बनला, जो सलग दुसऱ्यांदा यजमानपद भूषवतो.
विश्वचषक २०२३ मध्ये १३ जानेवारी ते २० जानेवारीदरम्यान होईल. मात्र, एफआयएचने स्थळ निश्चित केले नाही. भारत चौथ्यांदा यजमानपद भूषवणारा पहिला देश बनला. यापूर्वी १९८२ (मुंबई), २०१० (नवी दिल्ली), २०१८ (भुवनेश्वर) मध्ये विश्वचषक झाले. दुसरीकडे, स्पेन आणि हॉलंड महिला विश्वचषकाचे संयुक्त आयोजन करणार आहेत. ही स्पर्धा २०२२ मध्ये १ ते २२ जुलैदरम्यान खेळवली जाणार आहे.

नवी मुंबईची हवा ‘अत्यंत वाईट’ स्तरावर

Untitled 8 10

नवी मुंबईची हवा बदलली आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगत आहेत. गुरुवारी दिवसभरात शहरातील हवेचा पोत तपासण्यात आला. तेव्हा तो अत्यंत वाईट या स्तरावर नोंदला गेला. नवी मुंबईची हवा ३१० एककात ‘सफर इंडिया’ या संस्थेच्या वतीने नोंदविण्यात आली. त्यामुळे ऊन-पावसाच्या खेळात आरोग्याच्या तक्रारींनी बेजार झालेल्या नवी मुंबईकरांना तरंगत्या धुलिकणांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. मात्र महाराष्ट्र प्रदूष ण नियंत्रण मंडळाने नवी मुंबईत औद्योगिक प्रदूषण नसल्याचे म्हटले आहे. ‘सफर’ या खासगी संस्थेच्या अभ्यासातील निष्कर्ष आम्ही मानीत नाही, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई शहरात काही दिवसांपासून सकाळी हवेत धके पसत आहे. शहरात तरंगत्या धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची नोंद केली. शहरातील ७० टक्के कंपन्या बंद झाल्या आहेत. ३० टक्के कंपन्या सुरू आहेत, असे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. हिवाळ्यात तरंगत्या धुलिकणांचे प्रमाण मोठे असल्याचे दाखवले जात असले तरी ही सर्व प्रमाण तांत्रिक आहेत. प्रत्यक्षात शहरातील हवा ‘अत्यंत वाईट’ या स्तरात मोडत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वीज पडण्याची पूर्वसूचना ३० मिनिटे आधी देणारी यंत्रणा

l 12

कडाडून पडणारी वीज नक्की केव्हा पडेल यांची माहिती ३० मिनिटे आधी देणारी यंत्रणा विकसित केल्याची माहिती शास्त्रज्ञांनी शुक्रवारी येथे दिली आहे. ३० किलोमीटर त्रिज्येच्या आत वीज नक्की केव्हा कोसळेल यांची माहिती देणारी अतिशय सोपी आणि फार खर्चीक नसणारी ही यंत्रणा आहे.
वीज कोसळणे ही निसर्गातील अंदाज व्यक्त न करता येणारी क्रिया आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होत असते. आग लागून घरंच नव्हे तर जंगलं नष्ट होतात. विमानांची उड्डाणे विजांच्या कडकडात रद्द करावी लागतात.
हे सर्व टाळण्यासाठी वीज केव्हा पडेल हे सांगणारी सोपी आणि महागडी नसणारी यंत्रणा आतापर्यंत उपलब्ध नव्हती. मात्र स्वित्र्झलडमधील इकोल पॉलीटेक्निक फेडेरल द लौवसानच्या शास्त्रज्ञांनी एक लहानशी यंत्रणा शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. या यंत्रणेविषयी माहिती ‘क्लायमेट अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉसफेरिक सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे. हे नियतकालिक हवामानविषयक आणि कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक संशोधन प्रकाशित करत असते.
वीज पडण्यापूर्वीची स्थितीचे विश्लेषण करणारे यंत्र संशोधकांनी विकसित केले आहे. त्यासाठी त्यांनी स्वित्र्सलडमधील शहरी आणि पर्वतीय प्रदेशांतील १२ हवामान स्थानकांमधून १० वर्षांची माहिती गोळा केली.

बुध ग्रहाचे सोमवारी अधिक्रमण

l 13

येत्या सोमवारी बुध ग्रह हा सूर्यबिंबावरून अधिक्रमण करणार आहे. मात्र, हे अधिक्रमण भारतामध्ये दिसणार नसून केवळ उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलंड या देशांमध्येच दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. तसेच अशा प्रकारचे अधिक्रमणचा योग तेरा वर्षांनंतर पुन्हा येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पृथ्वीवरून पाहताना बुध ग्रह जेव्हा सूर्यबिंबावरून जाताना दिसतो, त्याला ‘बुध ग्रहाचे अधिक्रमण’ असे म्हणतात. बुध ग्रहाप्रमाणेच शुक्राचे अधिक्रमणही पृथ्वीवरून दिसते. बुधाचे अधिक्रमण मात्र दुर्बिणीतून पहावे लागते. सूर्यग्रहणात जसे चंद्रबिंब सूर्यबिंबावरून जाताना दिसते, तसाच हा प्रकार असतो, असे सोमण यांनी सांगितले.
यापूर्वी ९ मे २०१६ रोजी बुध ग्रहाचे अधिक्रमण झाले होते. त्यानंतर आता येत्या ११ नोव्हेंबर रोजी बुधाचे अधिक्रमण होत आहे. हे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही. दक्षिण आशिया, यूरोप, आफ्रिका, दक्षिण ग्रीनलँड, अंटाक्र्टिका, दक्षिण अमेरिका, अलास्का सोडून उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलंड येथून हे अधिक्रमण दिसणार आहे. त्यामुळे तेथील खगोलप्रेमींसाठी अधिक्रमण निरीक्षणाची पर्वणी असणार आहे. तेरा वर्षांनी म्हणजेच १३ नोव्हेंबर २०३२ रोजी असा योग पुन्हा येणार आहे. शुक्राचे अधिक्रमण ६ जून २०१२ रोजी झाले होते. यानंतर ते ११ डिसेंबर २११७ रोजी दिसेल, असे त्यांनी सांगितले.

चीनमध्ये ८.५ कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या टॉयलेटची गिनीज बुकात नोंद

image 2

चीनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या इंटरनॅशनल इम्पोर्ट-एक्स्पोमध्ये हाँगकाँगच्या अरोन शुम ज्वेलरी फर्मने सोन्याचे स्वच्छतागृह सादर केले आहे. याला ४०,८१५ हिरे जडवलेले आहेत. याची किंमत ८.५ कोटी रुपये आहे. सोने व हिऱ्यांनी मढवलेले स्वच्छतागृह असल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. हिऱ्यांना स्वच्छतागृहातील सीटवरील बुलेटप्रूफ ग्लासमध्ये ठेवलेले आहे. गिनीजनुसार, अरोन शुमचा हा १० वा विक्रम आहे. या ट्रेड फेअरमध्ये १४ कोटी रु. किंमतीचे हिरेजडित गिटारही आहे.

चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

Share This Article