⁠  ⁠

Current Affairs – 7 September 2018

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

समलैंगिकता गुन्हा नाही – सर्वोच्च न्यायालय

  • समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.
  • सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची स्वतंत्र ओळख आहे. समलैंगिकांनाही मुलभूत हक्क मिळण्याचा अधिकार आहे. आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची गरज असून जुनी विचारधारा बदलण्याची वेळ आली आहे.
  • आपल्याला पूर्वग्रहांमधून मुक्त व्हावं लागेल, सर्वसमावेशक व्हावं लागेल तसंच सर्वांना समान अधिकार मिळतील याची हमी घ्यावी लागेल असे सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.
  • सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचं विविध स्तरांमधून स्वागत होत आहे. तसंच काही कट्टर विचारसरणीच्या लोकांनी या निकालास विरोध देखील करण्यास सुरूवात केली आहे. धार्मिक पगडा असलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर या निकालाला विरोध करताना निसर्गनियमांच्या विरोधात जाण्यासाठी व स्वैराचारासाठी या निकालामुळे वाव मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय, विधानसभा मुदतीआधी बरखास्त

  • तेलंगणा विधानसभा मुदतीआधी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. तेलंगणा मंत्रिमंडळाने एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला असून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्यपाल ईएसएल नरसिंहम यांची भेट घेऊन त्यांना या निर्णयाची माहिती दिली.
  • राज्यपालांनी त्यांचा हा प्रस्ताव मंजूर केला असून नवीन सरकार सत्तेवर येईपर्यंत चंद्रशेखर राव यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
  • या वर्षाअखेर चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांबरोबर तेलंगणा विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

टू प्लस टू बैठक: ड्रोनसह सर्वोच्च तंत्रज्ञान भारताला मिळण्याचा मार्ग मोकळा

  • भारत आणि अमेरिकेत गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देशांनी संरक्षणाशी संबंधित सीओएमसीएएसएस करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे भारताचा अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका आणि भारतामध्ये आज टू प्लस टू ची बैठक पार पडली. यापूर्वी दोनवेळा ही बैठक रद्द झाली होती.
  • अमेरिकेकडून संरक्षण मंत्री जिम मॅटिस परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो तर भारताकडून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या बैठकीत सहभागी झाले होते.
  • दोन्ही देशांचे लष्करी संबंध दृढ करणे आणि आशियातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याचा या करारांमागे उद्देश आहे. दक्षिण आशियात स्थिरता आणि शांतता कशी नांदेल त्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.

ISSF World Championship : सौरभ चौधरीला पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक

  • भारताच्या सौरभ चौधरीने कोरियात सुरु असलेल्या ISSF World Championship स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात ज्युनिअर गटात सौरभने २४५.५ अशा विक्रमी गुणांची कमाई करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे.
  • याआधी इंडोनेशियात पार प़डलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही सौरभने सुवर्णपदकाची कमाई केली होती.आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर लागोपाठ दुसऱ्या मोठ्या स्पर्धेत मिळवलेल्या पदकामुळे सौरभ चौधरीकडून भारताच्या आशा वाढलेल्या आहेत.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Share This Article