⁠  ⁠

चालू घडामोडी : ७ नोव्हेंबर २०१९

Chetan Patil
By Chetan Patil 8 Min Read
8 Min Read

Current Affairs 7 November 2019

‘एच १ बी’ व्हिसा नाकारण्याच्या प्रमाणात चौपटीने वाढ

image

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या निर्बंधात्मक धोरणांमुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे एच १ बी व्हिसा अर्ज फेटाळले जाण्याचे प्रमाण चौपटीने वाढले असल्याचे दिसून आले आहे.
दी नॅशनल फाउंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी या संस्थेने अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर सेवा संस्थेच्या माहितीआधारे असे म्हटले आहे की, एच १ बी व्हिसा हा भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांमध्ये लोकप्रिय असला तरी तो नाकारला जाण्याचे प्रमाण चौपट वाढले आहे. २०१५ मध्ये एच १ बी व्हिसा नाकारले जाण्याचे प्रमाण सहा टक्के होते, ते चालू आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीत २४ टक्के झाले आहे. एच १ बी हा अस्थलांतरित व्हिसा असून त्याच्या मदतीने अमेरिकी कंपन्या भारतीय किंवा परदेशी कर्मचाऱ्यांना तज्ज्ञतेच्या आधारावर नोक ऱ्या देतात. तंत्रज्ञान कंपन्या भारतासह अनेक देशातून कर्मचारी घेत असतात. त्यात भारत व चीनच्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. प्रमुख भारतीय कंपन्यांकडून एच १ बी व्हिसासाठी करण्यात आलेले अर्ज फेटाळण्याचे प्रमाण ट्रम्प यांच्या कठोर धोरणांमुळे वाढले आहे.
अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, इंटेल, गुगल या कंपन्यांमध्ये प्राथमिक स्तरावरील नोक ऱ्यांसाठी एच १ बी व्हिसा अर्ज नाकारण्याचे प्रमाण २०१५ मध्ये केवळ एक टक्का होते, तर २०१९ मध्ये ते या चार कंपन्यासांठी सहा, आठ, सात व तीन टक्के वाढले आहे. अ‍ॅपल कंपनीतील नोक ऱ्यांसाठी एच १ बी व्हिसा अर्ज नाकारण्याचे प्रमाण तेवढेच म्हणजे दोन टक्के राहिले आहे. याच काळात टेक महिंद्राला एच १ बी व्हिसा नाकारण्याचे प्रमाण चार टक्के होते, ते आता ४१ टक्के, तर टाटा कन्सलटन्सी सव्‍‌र्हिसेसला व्हिसा नाकारण्याचे प्रमाण सात टक्क्यांवरून ५३ टक्के झाले आहे. विप्रोसाठी हे प्रमाण सात टक्क्यांवरून ५३ टक्के झाले, इन्फोसिससाठी ते दोन टक्क्यांवरून ४५ टक्के झाले आहे.
भारतातील एकूण बारा कंपन्या अमेरिकेत व्यावसायिक व माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवतात. त्यांना व्हिसा नाकारण्याचे एकूण प्रमाण २०१९ मध्ये पहिल्या तीन तिमाहीत ३० टक्क्यांवर होते. यातील अनेक कंपन्यांना व्हिसा नाकारण्याचे प्रमाण २०१५ मध्ये २ ते ७ टक्के होते. सध्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा व्हिसा नाकारण्याचे प्रमाण टेक महिंद्रासाठी २ टक्क्यांवरून १६ टक्के, विप्रोसाठी ४ टक्क्यांवरून १९ टक्के, इन्फोसिससाठी १ टक्क्यांवरून २९ टक्के झाले आहे. याच प्रवर्गात अ‍ॅमेझॉनसाठी हे प्रमाण १ टक्क्यांवरून ३ टक्के, मायक्रोसॉफ्टमध्ये २ टक्के कायम, अ‍ॅपल १ टक्का कायम, गुगल ०.४ टक्क्यांवरून एक टक्के याप्रमाणे आहे. प्राथमिक नोक ऱ्यांसाठी व्हिसा नाकारण्याचे प्रमाण २०१० ते २०१५ या काळात आठ टक्क्यांवर कधीच गेले नव्हते, आता हे प्रमाण तीन पट जास्त आहे. युसिसच्या माहितीनुसार पहिल्या तीन तिमाहीत एच १ बी व्हिसा नाकारण्याचे प्रमाण प्राथमिक नोक ऱ्यांसाठी २४ टक्के, चालू नोकरी पुढे सुरू ठेवण्यासाठी १२ टक्के होते. आधीच काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना व्हिसा नाकारण्याचे बारा टक्के प्रमाणही २०१५ मधील तीन टक्के या प्रमाणापेक्षा खूप अधिक आहे.

घर खरेदीदारांना केंद्राचा दिलासा; रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी २५ हजार कोटींची घोषणा

Image result for घर खरेदीदारांना केंद्राचा दिलासा

आर्थिक मंदीमुळे सुस्तावलेल्या गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, या क्षेत्रासाठी १० हजार कोटींच्या निधीला अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
सरकार एक विशेष निधीची निर्मिती करणार आहे. ज्यामध्ये सरकार १० हजार कोटींचे योगदान देणार आहे. यामध्ये इतरही अनेक संस्थांचा सहभाग असेल त्यामुळे सर्वांचा मिळून हा २५,००० कोटींचा निधी तयार होईल. यामध्ये एसबीआय आणि एलआयसीचा देखील समावेश असेल. त्यानंतर पुढे आणखी संस्था या निधीसोबत जोडल्या जातील.
या निधीद्वारे एका बँक खात्यात पैसे टाकून अपूर्ण गृहप्रकल्पांना मदत केली जाईल. रेरामध्ये जे अपूर्णावस्थेतील प्रकल्प आहेत त्यांना व्यावसायिकदृष्टीने प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मदत दिली जाईल. म्हणजे जर प्रकल्पांचे ३० टक्के काम अपूर्ण असेल तर जोपर्यंत प्रकल्प पूर्ण होत नाही तोवर त्यांना मदत दिली जाईल. कारण, यामुळे लवकरात लवकर घर खरेदीदारांना घर हस्तांतर करता येईल.

बॉक्सिंग : ऑलिम्पिक चॅम्पियन अॅडम्सने निवृत्ती घेतली

image 1

दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन बॉक्सर निकोला अॅडम्सने निवृत्ती घेतली. ब्रिटनच्या अॅडम्सला बॉक्सिंगमुळे डोळ्याची दृष्टी जाण्याची भीती होती. ३७ वर्षीय अॅडम्सने २०१२ लंडन आणि २०१६ रिअाे ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले. ती २०१७ मध्ये व्यावसायिक खेळाडू बनली होती आणि जागतिक फ्लाइवेट किताबदेखील जिंकला.
अॅडम्सने म्हटले की, मी जर आताही बॉक्सिंग खेळणे सुरू ठेवले तर माझी दृष्टी नेहमीसाठी जाऊ शकते, असे माझ्या डॉक्टरांनी सांगितले. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे गर्वाची बाब आहे. आता माझे शरीर साथ देत नाही. त्यामुळे बॉक्सिंग सुरू ठेवू शकत नाही.

भारताच्या कनिष्ठ पुरुष संघाने आशियाई विक्रमासह जिंकले सुवर्ण

Image result for भारताच्या कनिष्ठ पुरुष संघाने आशियाई विक्रमासह जिंकले सुवर्ण

आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये बुधवारी भारताचे वरिष्ठ खेळाडू अपयशी ठरले. ते एकही कोटा आणि पदक जिंकू शकले नाही. मात्र, कनिष्ठ खेळाडूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली. पुरुष व महिला कनिष्ठ संघाने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सुवर्ण जिंकले. नीरज कुमार, आबिद अली खान, हर्षराजसिंग गोहिल या कनिष्ठ संघाने आशियाई विक्रमासह प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय संघाने एकूण १८४५ गुणांची कमाई केली. नीरजने एकूण ६१६.३, आबिदने ६१४.४, गोहिलने ६१४.३ असे गुण मिळवले. चीनच्या संघाने रौप्य आणि कोरियन संघाने कांस्य जिंकले. चीनने १८४४.४ व कोरियाने १८१८ गुण मिळवले.
कनिष्ठ महिला गटात भारतीय टीमने एकूण १८३६.३ गुणांची कमाई केली. निश्चलने ६१५.३, भक्ती भास्करने ६१४.२ आणि किनोरी कोनारने ६०६.८ गुण आपल्या खात्यात जमा केले. पुरुष गटाप्रमाणे महिलांमध्ये चीनच्या संघाने १८२९.१ आणि कोरिया संघाने १८२०.७ गुणांसह अनुक्रमे रौप्यपदक आणि कांस्यपदक पटकावले.
५० मीटर रायफल प्रोन प्रकारात कनिष्ठ वैयक्तिक गटात निश्चल आणि भक्तीने पदक जिंकले. निश्चलने रौप्य आणि भक्तीने कांस्यपदक जिंकले. निश्चलने ६१५.१ गुण व भक्तीचे ६१४.२ गुण होते. चीनच्या मा युटिंगने ६१८.१ गुणांसह सुवर्ण आपल्या नावे केले. पुरुषांत नीरजने रौप्य व आबिदने कांस्य जिंकले. नीरजने ६१६.३ व आबिदने ६१४.४ गुण मिळवले. चीनच्या यू हाओने सोने जिंकले.

बीएसएनएलची स्वेच्छा निवृत्ती याेजना जाहीर, ८० हजार कर्मचाऱ्यांना लाभ

Image result for बीएसएनएलची

सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या दूरसंचार कंपनीने अापल्या कर्मचाऱ्यांसाठी एेच्छिक सेवानिवृत्ती याेजना (व्हिअारएस) जाहीर केली अाहे. या याेजनेतून ७० हजार ते ८० हजार कर्मचाऱ्यांना लाभ हाेऊ शकेल व या वेतनातून जवळपास ७,००० काेटी रुपयांची बचत हाेईल, अशी कंपनीला अाशा अाहे.
सरकारने या दूरसंचार कंपनीसाठी दिलासा पॅकेजला मंजुरी दिल्यानंतर काही दिवसातच व्हिअारएस याेजना अाणली अाहे. बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.के. पुरवार म्हणाले, याेजना चार नाेव्हेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत खुली असेल. व्हिअारएस याेजनेबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी विभागीय कार्यालयांना याचे निर्देश देण्यात अाले अाहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या १.५० लाख अाहे अाणि जवळपास एक लाख कर्मचारी याेजनेसाठी पात्र अाहेत. पुरवार म्हणाले,सरकार व बीएसएनएळने दिलेली ही सर्वाेत्तम याेजना अाहे.
बीएसएनएल व्हीअारएस योजने ५० वर्ष वा त्यापेक्षा जास्त वयाचे सर्व कायम कर्मचारी व्हिअारएससाठी अर्ज करण्यास पात्र अाहेत. यात त बीएसएनएलच्या बाहेरच्या संघटनेत प्रतिनियुक्तीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांही समावेश अाहे. पात्र कर्मचाऱ्यांंसाठी सानुग्रह रक्कम पूर्ण केलेल्या प्रत्येक सेवा वर्षाच्या बदल्यात ३५ दिवस तसेच उर्वरित कालाधीसाठी २५ दिवसांच्या वेतना प्रमाणे असेल.

चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

Share This Article