⁠  ⁠

चालू घडामोडी : ३१ मार्च २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Current Affairs 31 March 2020

इंटरनेट स्पीडमध्ये देश १२८व्या स्थानी

हैमरकॉप्फ कंज्यूमर सर्वेच्या मते लाॅकडाऊन दरम्यान एका अाठवड्यातच भारतीयांमध्ये साेशल मिडीयाचा वापर ८७% वाढला. पूर्वी साेशल मिडीयावर सरासरी १५० मिनीटे लाेक घालवत असत. परंतु अाता २८० मिनीटे युजर्स वेळ घालवत अाहेत. इंटरनेट ब्राउजिंग देखील ७२% ने वाढले असल्याचे सर्व्हेच्या निरीक्षण अाहे. कैंटर कंसल्टिंग कंपनीच्या पाहणीतून देखील जगभरात व्हाॅट्सअॅपचा वापर ४०% वाढला असल्याचे निदर्शनास अाले अाहे.
इंटरनेट स्पीडच्या संदर्भात देश पूर्वीपासूनच मागे पडला अाहे. इंटरनेट सेवेचे विश्लेषण करणाऱ्या ऊकला या संस्थेने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या विश्लेषणानुसार माेबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत १४१ देशांच्या यादीत १२८ व्या स्थानी अाहे. ब्राॅडबॅन्डच्या स्पीडमध्ये स्थिती ठीक म्हणावी अशी अाहे. येथे १७६ देशांच्या यादीत ६९ वा क्रमांक लागताे. ऊकलाच्या मते देशात माेबाइल अाणि ब्राॅडबॅन्ड डाऊनलाेड स्पीडमध्ये घसरण दिसून अाली अाणि ती ४० एमबीपीएस पेक्षा कमी अाहे. फेब्रुवारीतील अाकड्यांनुसार देशात माेबाईलवर सरासरी स्पीड ११.८३ एमबीपीएस हाेती. जानेवारीपेक्षा ती १.७५ एमबीपीएसने कमी अाहे.

फिच सोल्युशन्स, इंडिया रेटिंग्जने घटवला अंदाज

फिच सोल्युशन्सने २०२०-२०२१ वर्षासाठी भारताच्या आर्थिक वृद्धिदराचा अंदाज ५.४ वरून घटवून ४.६% केला. काेरोनामुळे व्यवहार व गुंतवणुकीत झालेल्या घटीमुळे अंदाज घटवला आहे. इंडिया रेटिंग्जनेही आपला अंदाज घटवून ३.६ केला आहे.

बँक ऑफ बडोदाचे कर्ज ०.७५ टक्के स्वस्त

बँक ऑफ बडोदाने आरबीआयच्या रेपो रेटशी संबंधित कर्जाच्या व्याजदरात ०.७५% कपात केली. रिटेल ग्राहकांसह एमएसएमईला ७.२५% हा नवा व्याजदर लागू होईल. याआधी एसबीआयने रेपो रेटशी संबंधित कर्जे ०.७५% स्वस्त केली आहेत.

Share This Article