⁠  ⁠

चालू घडामोडी : ३० मे २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 30 May 2020

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्यत्व सोडले

trump

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची मोठी घोषणा केली. जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातातील बाहुलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व संबंध तोडत आहोत, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. दरम्यान कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाला सुरुवातीच्या स्तरापासून रोखण्यात जागतिक आरोग्य संघटनेला अपयश आल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. सोबतच चीनवरही चहूबाजूंनी टीका केली. कोरोनाच्या महामारीवरुन ट्रम्प यांनी यापूर्वीही जागतिक आरोग्य संघटनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.
चीन जागतिक आरोग्य संघटनेला “वार्षिक केवळ 40 मिलियन डॉलर (4 कोटी डॉलर) मदत देत होतं दुसरीकडे या तुलनेत अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला वार्षिक 45 कोटी डॉलर एवढी मदत करत होती.

जानेवारी ते मार्च 2020 या तिमाहीतील विकास दर केवळ 3.1 टक्के

Agriculture, mining saved Indian economy in FY20, can it sustain ...

लॉकडाऊन सुरू होण्याअगोदरच्या जानेवारी ते मार्च 2020 या तिमाहीतील विकास दर केवळ 3.1 टक्के नोंदला गेला आहे. हा दहा वर्षातील नीचांक आहे. मार्च महिन्याच्या शेवटी लॉक डाऊन सुरू झाले. त्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीतील विकास दर प्रचंड कोसळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
जानेवारी ते मार्च या तिमाहीतील मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढण्याऐवजी 1.4 टक्‍क्‍यांनी (म्हणजे उणे 1.4 टक्‍के) कमी झाली आहे. बांधकाम क्षेत्राची उत्पादकता केवळ 2.2 टक्के मोजली गेली आहे. मात्र कृषी क्षेत्राची उत्पादकता 5.9 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी जी माहिती उपलब्ध झाली आहे, त्या माहितीच्या आधारावर जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे यात आणखी घट होण्याची शक्‍यता खुली आहे.

शुक्रवारी एप्रिल महिन्याची मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राच्या उत्पादकतेची आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता उणे 38.10 टक्के इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत. एप्रिल महिन्यात मॅन्यूफॅक्‍चरींग क्षेत्रातील कोळशाची उत्पादकता उणे 15.5 टक्के, क्रुड तेलाची उत्पादकता उणे 6.4 टक्के, नैसर्गिक वायू क्षेत्राची उत्पादकता उणे 19.9 टक्के, तेल शुद्धीकरण क्षेत्राची उत्पादकता उणे 24.2 टक्के, खत क्षेत्राची उत्पादकता उणे 4.5%, पोलाद क्षेत्राची उत्पादकता उणे 83.9 टक्के, सिमेंट क्षेत्राची उत्पादकता उणे 86 टक्के तर वीज क्षेत्राची उत्पादकता उणे 22.8 टक्के नोंदली गेली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेवरील आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मे महिन्यातील उत्पादकतेवरही असाच परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

2019-20 या आर्थिक वर्षाचा विकासदर केवळ 4.2 टक्के इतका मोजला गेला आहे. दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतरचे मोदी सरकारचे हे पहिले वर्ष आहे. पहिल्या वर्षातील विकास दर 11 वर्षाच्या नीचांकावर गेला आहे. आता दुसरे वर्ष सुरू झाले असून करोना व्हायरसमुळे या वर्षाचा विकास दर तर शून्य टक्‍क्‍यांच्या खाली जाणार आहे. त्यामुळे विकास दराच्या परीक्षेत पहिल्या वर्षे मोदी सरकार नापास झाले आहे. दुसऱ्या वर्षी त्यापेक्षा खराब परिस्थिती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अगोदर भारत जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे समजले जात होते. 2018-19 या वर्षात भारताचा विकास दर 6.1 टक्‍के होता.

छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन :

छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अजित जोगी 74 वर्षांचे होते. तर राजकारणात येण्यापूर्वी अजित जोगी यांनी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसंच ते तहसीलदार या पदावर कार्यरत होते.

1988 च्या जवळपास त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती येण्यापूर्वी त्यांनी खासदार म्हणूनही काम केलं आहे.
तसेच छत्तीसगढच्या निर्मितीनंतर त्यांनी 2000-2003 या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली होती.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट एकटा क्रिकेटपटू

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तर 2020 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या फोर्ब्सच्या 100 खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीला स्थान मिळालं आहे.
तसेच या यादीत विराट कोहली हा एकटाच क्रिकेटपटू आहे. विराटचं वार्षिक उत्पन्न हे 26 Million अमेरिकन डॉलर्स एवढं असून यातील 24 Million अमेरिकन डॉलर्स एवढं उत्पन्न विराटला जाहीरातींमधून मिळतं.

तर महत्वाची गोष्ट म्हणजे 2018 साली जाहीर करण्यात आलेल्या यादीत विराट 83 व्या स्थानावर होता. यानंतर 2019 साली विराटची या यादीत घसरण होऊन ते 100 व्या स्थानावर फेकला गेला होता.
मात्र नवीन वर्षात विराटने चांगली कमाी करत थेट 66 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

क्रिकेट व्यतिरीक्त विराट अनेक ब्रँडच्या जाहीराती करतो. ज्यामध्ये PUMA, Audi India, Hero MotoCorp, Philips India, Himalaya, Vicks, Volini अशा नामांकित ब्रँडचा समावेश आहे.

Share This Article