⁠  ⁠

Current Affairs 30 May 2019

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

नौदल प्रमुखपदाची सूत्रे घेण्यासाठी करमबीर सिंह यांना लवादाची परवानगी

  • नौदलाचे व्हाइस अ‍ॅडमिरल करमबीर सिंह यांना नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कार्यभार हाती घेण्यास लष्करी लवादाने परवानगी दिली आहे. करमबीर सिंह यांना शुक्रवारी नौदल प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • अंदमान व निकोबार कमांडचे ‘कमांडर इन चिफ’ असलेले व्हाइस अडमिरल बिमल वर्मा यांनी करमबीर सिंह यांच्या नियुक्तीला सेवाज्येष्ठतेच्या मुद्दयावर आव्हान दिले असून त्यावर लष्करी दले लवादाकडे याचिका दाखल केली आहे.
  • लवादाने आता करमबीर सिंह यांना नौदल प्रमुख पदाची सूत्रे हाती घेण्यास परवानगी दिली असून ते ३१ मे रोजी सध्याचे नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील.

अमेरिकेच्या करंसी मॉनिटरिंग लिस्टमधून भारत बाहेर

  • केंद्र सरकारने उचललेल्या काही महत्त्वाच्या पावलांमुळे अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारताला आपल्या करंसी मॉनिटरिंग यादीमधून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत मोठ्या व्यावसायिक भागीदार सहभागी असतात.
  • भारताव्यतिरिक्त या यादीतून स्वित्झर्लंडलादेखील हटवण्यात आल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले. सध्या या यादीत चीन, जपान, जर्मनी, इटली, दक्षिण कोरिया, आयर्लंड, सिंगापुर, मलेशिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.
  • भारतीय सरकारने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे चलनाचा आर्थिक धोका दूर झाल्याचे अमेरिकेला वाटत असल्याचे अमेरिकेच्या अर्थ मंत्रालकडून सांगण्यात आले आहे.
  • अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. तीन मुख्य निकषांपैकी केवळ एकाच निकषामध्ये भारत प्रतिकूल आढळल्यामुळे अमेरिकेने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 2017 मध्ये भारताने परकीय चलन साठा खरेदी केल्यानंतर 2018 मध्ये टप्प्याटप्प्याने त्याची विक्री करण्यात आली होती. या परकीय चलनाची विक्री जीडीपीच्या 1.7 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती, असे या अहवालात नमूग करण्यात आले आहे
  • मे 2018 मध्ये अमेरिकेने पहिल्यांदा भारताचे नाव करंसी मॉनिटरिंग यादीत घातले होते. याचबरोबर चीन, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया आणि स्वित्झर्लंड या देशांचाही या यादीत समावेश करण्यात आला होता.

अरूणाचलचे मुख्यमंत्री म्हणून पेमा खांडू यांनी घेतली शपथ

  • भाजपचे नेते पेमा खांडू यांनी बुधवारी अरूणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बी.डी.मिश्रा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
  • येथे झालेल्या सोहळ्यात खांडू यांच्यासमवेत 11 कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री चौना मीन यांचाही समावेश आहे.
  • चीनच्या सीमेलगत असणाऱ्या अरूणाचलमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकही झाली. त्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवताना भाजपने 60 पैकी 41 जागा जिंकल्या.

ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदी नवीन पटनायक

  • बीजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी भुवनेश्वरमध्ये सलग पाचव्यांदा ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ओदिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी नवीन पटनायक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
  • राज भवनाऐवजी मोकळया मैदानात ७३ वर्षीय नवीन पटनायक यांच्या शपथविधीचा सोहळा रंगला.
  • लोकसभा निवडणुकीच्या बरोबरीन् ओडिशामध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या. त्यामध्ये बीजू जनता दलाने १४७ पैकी तब्बल ११२ जागा जिंकून घवघवीत यश संपादन केले. सन २००० पासून ओदिशामध्ये नवीन पटनायक यांचे सरकार आहे.

Share This Article