⁠  ⁠

चालू घडामोडी : २८ जुलै २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 28 July 2020

पाच राफेल विमानांचे भारताच्या दिशेने प्रस्थान

rafal
  • पाच राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे येण्यास निघाला असून ही विमाने करारानुसार देण्यात येत आहेत. बहुउद्देशी असलेले हे लढाऊ विमान असून बुधवारी ही विमाने अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर येणार आहेत.
  • राफेल विमानांच्या खरेदीचा करार भारताने पाच वर्षांपूर्वी केला होता. भारतीय हवाई दलाला फ्रान्सची दसॉल्ट कंपनी ३६ विमाने देणार असून त्यासाठी ५९ हजार कोटींचा करार झाला होता.
  • फ्रान्सने भारताला यापूर्वीही जग्वार, मिराज, मायसियर विमानांचा पुरवठा केला होता. एकूण दहा राफेल विमाने तयार असून त्यातील पाच देण्यात आली आहेत तर पाच अजून प्रशिक्षण कार्यक्रमासाठी फ्रान्समध्येच आहेत.
  • फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारताला सर्व ३६ राफेल विमाने दिली जाणार आहेत.
  • मिटिऑर क्षेपणास्त्रे
  • मिटिऑर क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती असलेले बीव्हीआर क्षेपणास्त्र भारताला देण्यात आले असून ते एमबीडीएने तयार केले आहे. ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन आणि स्वीडन या देशांच्या समान शत्रूंविरोधात त्यांचा वापर केला जातो. मिटिऑर क्षेपणास्त्राला रॅमजेट मोटर असून ते खूप लांबपर्यंत जाऊ शकते. राफेल विमानात भारताला सोयीचे अनेक बदल करून देण्यात आले आहेत, त्यात रडार वॉर्निग रिसीव्हर, लो बँड जॅमर्स, १० तासांचे फ्लाइट डाटा रेकॉर्डिग, इन्फ्रारेड शोध सुविधा, ट्रॅकिंग यंत्रणा या सुधारणांचा त्यात समावेश आहे.

दुहेरी ऑस्करविजेत्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे निधन

Double Oscar winner Olivia de Havilland dies at 104 zws 70 ...
  • ‘गॉन विथ दी विन्ड’ तसेच अन्य हॉलिवूडपटांमधील अभिनयामुळे गाजलेल्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले.
  • दुहेरी ऑस्कर विजेती असलेल्या या अभिनेत्रीची ओळख ‘दी फ्रॅगरन्ट क्वीन ऑफ दी हॉलिवूड कॉस्च्युम ड्रामा’ अशी होती.
  • टोकिओ येथे जन्म झालेल्या ऑलिव्हिया कॅलिफोर्नियात लहानाच्या मोठय़ा झाल्या. त्यांना १९४६ मधील ‘टू इच हिज ओन’ आणि १९४९ मधील ‘दी हेअर्स’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
  • गॉन विथ दी विन्डमधील त्यांची भूमिका चित्रपट रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली.

स्वच्छ भारत अभियानाचे अय्यर यांचा राजीनामा

१९८१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी परमेश्वरन अय्यर यांनी केंद्र सरकारच्या सचिव, स्वच्छता व पेयजल अभियानाच्या पदाचा राजीनामा दिला.
अय्यर २००९ मध्ये जागतिक बँकेसोबत जोडले गेले होते. २०१६ मध्ये ते पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून परत आले. तसेच त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचे काम सांभाळले. आतापर्यंत ११ कोटी शौचालये बांधली गेली आहेत.

सेरी-ए फु टबॉल स्पर्धा : युव्हेंटसचे सलग नववे विजेतेपद

Juventus' ninth consecutive title abn 97 | सेरी-ए फु ...
  • ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अप्रतिम कामगिरीमुळे युव्हेंटसने सलग नवव्यांदा सेरी-ए फु टबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. युव्हेंटसने रविवारी सॅम्पडोरियाचा २-० असा पाडाव करत दोन सामन्यांआधीच जेतेपदावर मोहोर उमटवली.
  • पाच वेळा ‘बलॉन डीऑर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या रोनाल्डोने करोनाच्या विश्रांतीनंतर सलग ११ सामन्यांत गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
  • रोनाल्डोला आता सेरी-ए स्पर्धेत युव्हेंटसतर्फे सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी एका गोलची गरज आहे. १९३३-३४मध्ये फे लिस बोरेल यांनी हा विक्रम नोंदवला होता.
  • युरोपमधील पाच प्रतिष्ठेच्या लीगमध्ये करोनानंतर १० पेक्षा जास्त गोल झळकावणारा रोनाल्डो हा एकमेव फु टबॉलपटू ठरला आहे.
  • ५ युव्हेंटसने (१९३१-३५) याआधी सेरी-ए फु टबॉल स्पर्धेत सलग पाच वेळा विजेतेपद पटकावण्याची करामत केली होती.
  • त्यानंतर टोरिनो संघाने १९४३-४९ दरम्यान सलग पाच वेळा विजेतेपद संपादन केले होते.
  • १४ युरोपमधील सर्व प्रतिष्ठेच्या लीगमध्ये सलग १४ वेळा विजेतेपद मिळवण्याची किमया लॅटव्हियाच्या स्कोंटो क्लबने १९९१-२००४ या कालावधीत केली होती.

Share This Article