⁠  ⁠

चालू घडामोडी : २८ जानेवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 28 January 2020

श्रीलंका आणि बांगलादेशातील व्यक्‍तींनाही पद्‌म पुरस्कार

padmashriaward

यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमधे श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल स्थान मिळाले आहे. देशबंधू डॉक्‍टर वजीरा चित्रसेना यांना नृत्यातल्या, तर दिवंगत प्राध्यापक इंद्र दसनायके यांना हिंदी साहित्यातल्या कार्याबद्दल पद्मश्री प्रदान करण्यात आला.
कंदयान आणि ओडिसी नृत्यप्रकारात डॉक्‍टर चित्रसेना यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. श्रीलंकेचा देशबंधू हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार त्यांना श्रीलंका सरकारने प्रदान केला आहे. दिवंगत प्राध्यापक सदनायके यांनी केलनिया विद्यापीठात हिंदी प्राध्यापिका म्हणून मोठे कर्तृत्व आहे. श्रीलंकेच्या शैक्षणिक संस्थांमधे हिंदीचा प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्रीलंकेत 80 हून अधिक शैक्षणिक संस्थांमधे हिंदी भाषा शिकवली जाते.
तसेच बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद मुअज़्जम अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक़ यांना भारत सरकारकडून दिला जाणारा यावर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. सय्यद मुअज्जम अली यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ते भारतात 2014 पासून बांगलादेशाचे राजदूत म्हणून कार्यरत होते.
गेल्या 30 डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला. अली यांनी 1971 मधे पाकिस्तान सरकारविरुद्ध बंड करुन बांगलादेशाप्रति आपली निष्ठा व्यक्त केली होती. नामवंत वस्तूसंग्रहालय तज्ञ इनाम उल हक यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 1936 मधे जन्मलेले हक बांगलादेश राष्ट्रीय वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक महासंचालक होते.

प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी

Kobe

NBA Los Angeles Lakers संघाकडून खेळणारा प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे.
४१ वर्षीय कोबे ब्रायटंने २०१६ साली निवृत्ती स्विकारली. कोबी ब्रायंट हा तब्बल २० वर्षे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये (NBA) सक्रिय होता. आपल्या काळात ब्लॅक मांबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोबेने पाचवेळा संघाला NBA Championship मिळवून दिली होती. आपल्या कारकिर्दीत कोबेने १८ वेळा NBA All Star हा मानाचा किताब पटकावला होता. याव्यतिरीक्त अन्य पुरस्कारांनीही त्याचा सन्मान करण्यात आलेला होता.

अमित शहांची मध्यस्थी; बोडोलँड वाद अखेर संपुष्टात

केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार, आसाम सरकार आणि बोडो माओवादी यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारामुळे गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेला बोडोलँड वाद संपुष्टात आला आहे.
बोडोलँड वादामुळे आतापर्यंत २ हजार ८२३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २७ वर्षांतील हा तिसरा आसाम करार आहे. बोडोलँड वाद संपवण्यासाठी मोदी सरकार गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत होते. अमित शहा यांनी केंद्रीय मंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून या प्रयत्नांना वेग आला आणि अखेर सोमवारी हा करार करण्यात आला.
या करारानुसार, नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड या संघटनेचे १,५५० माओवादी ३० जानेवारी रोजी आत्मसमर्पण करणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे असललेली शस्त्रास्त्रे सरकारला देणार आहेत. या करारामुळे आसाममधील नागरिकांचा विकास होण्यास मदत होईल आणि आसामवासीयांना भयमुक्त जीवन जगता येईल

औरंगाबादच्या मनीषाने २२ हजार फूट उंच अॅकाँकागुअा शिखरावर फडकवला तिरंगा

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मनीषा वाघमारेने अर्जेंटिनातील अॅकाँकागुअा या शिखरावर तिरंगा फडकवला. तिने २२ हजार ८३७ फुटांचा खडतर प्रवास यशस्वीपणे गाठला. हा पराक्रम करणारी ती राज्यातील पहिलीच गिर्याराेहक ठरू शकते. ‘मिशन गाे फाॅर सेव्हन समिट’च्या माध्यमातून तिने हे पाचवे शिखर सर केले.
यासाठी जगभरातील ८० गिर्याराेहकांनी शर्थीने प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयशाला सामाेरे जावे लागले. यातील फक्त चार जणांनी यंदाच्या सीझनमध्ये हे शिखर सर केले. यामध्ये अाैरंगाबादची शिवछत्रपती पुरस्कार विजेती मनीषा ही एकमेव महिला गिर्याराेहक हाेती. माेठ्या धाडसाने तिने ही माेहीम फत्ते केली. यासह तिने गाे फाॅर सेव्हन समिटमधील पाचव्या शिखराला पादाक्रांत करण्यात यश मिळवले अाहे. ही माेहीम फत्ते करणारी ती एकमेव अाहे.

Share This Article