⁠  ⁠

चालू घडामोडी : २७ फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 27 February 2020

दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची बदली

s murlidhar

दिल्ली हिंसाचार प्रकरणी पोलिसांना फटकारे लगावणारे दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीयमने १२ फेब्रुवारीला झालेल्या आपल्या बैठकीत त्यांच्या बदलीची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली केली आहे. राष्ट्रपतींनी न्यायाधीश मुरलीधरन यांना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहावे असे आदेश दिल्याचे त्या बाबतच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

न्यायाधीश एस. मुरलीधर यांची २९ मे २००६ ला दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. इथल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी आयपीसी कलम ३७७ ला देखील नॉन क्रिमिनल घोषित केले होते. ज्येष्ठतेनुसार न्यायाधीश मुरलीधर हे दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीशांमध्ये तिसऱ्या स्थानी होते. आता बदलीनंतर पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात ते मुख्य न्यायाधीश रविशंकर झा यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी असतील.

ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती

MARIA SHARAPOVA

५ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या रशियाच्या ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाने निवृत्ती स्विकारलेली आहे. आपल्या कारकिर्दीत शारापोव्हाने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेची २, तर ऑस्ट्रेलियन-विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेचं प्रत्येकी एक विजेतेपद मिळवलं आहे. मध्यंतरी उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात शारापोव्हावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर शारापोव्हाने दमदार पुनरागमन केलं, मात्र यानंतर तिला एकाही मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलं नाही.

आपल्या उमेदीच्या काळात शारापोव्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून शारापोव्हा फॉर्मात नव्हती, ज्यामुळे अखेरीस तिने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. लहानपणापासून ज्या कोर्टवर तुम्ही सराव केला आहोत ते कोर्ट सोडणं खूप कठीण असतं. या २८ वर्षांत टेनिसने मला खूप काही दिलं आहे. मात्र आता निवृत्तीची वेळ आलेली आहे. Goodbye Tennis…अशा शब्दांत शारापोव्हाने आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

एसव्हीसी बँकेने पटकावले विजेतेपद

देशातील आघाडीच्या सहकारी बँकांपैकी एक एसव्हीसी बँकेने उत्कृष्ट दर्जांच्या सेवांसाठी व वैयक्तिक बँकिंग सुविधेसाठी विजेतेपद पटकावले. वर्ल्ड बीएफएसआय काँग्रेसमध्ये एसव्हीसीेला ‘बेस्ट को-ऑपरेटिव्ह बँक’ व ‘मोस्ट फ्युचर रेडी बँक’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

बँकेने अनेक नवीन योजना सुरू केल्या आहेत. त्यात पगारदार व्यावसायिक व्यक्तींसाठी गोल्ड व सिल्व्हर खाते. एमएसएमई व्यवसायांकरिता आणि मोठ्या कंपन्यांकरता पर्ल, प्रीमिअर आणि सिल्व्हर प्लस-चालू खाते, आणि रिटेल बँकिंग ग्राहकांकरिता-क्लासिक बचत खाते,अादींचा समावेश अाहे. याबाबत बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित वेणुगोपालन म्हणाले, “हे पुरस्कार आणि मान्यता एसव्हीसी बँकेतील उत्कृष्टतेची भावना दर्शवते. ग्राहकांचे सक्षमीकरण करून त्यांची स्वप्ने व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.” मागील वर्षात बँकेने ४ पुरस्कार जिंकले आहेत.

कॅबिनेट बैठकीत नॅशनल टेक्निकल टेक्सटाइल मिशनला मंजुरी

Image result for cabinet meeting

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत. या कॅबिनेटच्या बैठकीत नॅशनल टेक्निकल टेक्सटाइल मिशन (National Technical Textile Mission)ला मंजुरी देण्यात आली आहे. टेक्निकल टेक्सटाइल मिशनबरोबरच कॅबिनेटनं सरोगसी एमेंडमेंट एक्ट (Surrogacy (Regulation) Amendment Act )वरही शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे सरोगसी कायदा आणखी कडक होणार आहे. त्याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योगातील दोन संस्थांना राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

1 फेब्रुवारी 2020ला सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांनी नॅशनल टेक्निकल टेक्सटाइल मिशनची घोषणा केली आहे. भारत दरवर्षी जवळपास 1600 कोटी डॉलर (जवळपास 1.13 लाख कोटी रुपये)चे टेक्निकल टेक्सटाइल आयात करतो. आयातमध्ये कपात आणण्यासाठी या मिशनवर 1,480 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. टेक्निकल टेक्सटाइलचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात केला जातो. मेडिकल सेक्टर आणि ऍग्रो सेक्टरमध्येही याचा वापर केला जातो. सामान्य भाषेत सांगायचं झाल्यास टेक्नोलॉजीच्या माध्यमातून असे प्रोडक्ट तयार केले जाणार असून, इतर सेक्टरना यानं मदत मिळणार आहे. सरकारचे हे अभियान 2020-2021 ते 2023-2024 दरम्यान राबविण्यात येईल. अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणाले की उद्योग व वाणिज्य विकासासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी 27,300 कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय केंद्रीय, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्यातदारांच्या कर्तव्यात आणि करात या वर्षापासून डिजिटल परताव्यास परवानगी देण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.

कमल, साथियानला ‘वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन’मध्ये रौप्यपदक

‘वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन’मध्ये कमल, साथियानला रौप्यपदक मिळालं आहे. भारतीय पुरुष दुहेरीत अचंता शरथ कमल आणि ज्ञानसेकर साथियान या जोडीला पुरुष दुहेरी प्रकारात रौप्यपदक मिळालं आहे.
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या ( International Table Tennis Federation – ITTF) वर्ल्ड टूर हंगेरियन ओपन स्पर्धेत पदक आहे.

विजेते
बेनेडिक्ट डूडा (जर्मनी)
पॅट्रिक फ्रान्झिस्का (जर्मनी)

विशेषता
शरथ कमलने स्पर्धेत पदक जिंकण्याची दुसरी वेळ

Share This Article