⁠  ⁠

Current Affairs 27 February 2019

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

भारताकडून दोन मध्यम रेंजच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी

  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने आज पहाटे एअर स्ट्राईक केले तर दुसरीकडे ओडिशाच्या समुद्रकिनारी दोन क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. डीआरडीओकडून ही चाचणी घेण्यात आली. खासकरून लष्करासाठी हे क्षेपणास्त्र बनवण्यात आलेले आहे.
  • हे क्षेपणास्त्र ट्रकवर बसवण्यात आलेल्या चहू बाजूने फिरु शकणाऱ्या बेसवर हे क्षेपणात्र बसवण्यात येते. तसेच ट्रकच्या मदतीने ते कुठेही सहज वाहून नेता येते.
  • १५ किमी अंतरापर्यंत जमिनीवरुन हवेत मारा करण्याची त्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक टार्गेटवर हल्ला करु शकते. मध्यम रेंजच्या आपल्या ‘आकाश’ या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रासाठी हे नवे क्षेपणास्त्र पूरक असेल.

मुकेश अंबानी टॉप टेनमध्ये

  • रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा जगातील १० श्रीमंत व्यक्तींच्या सूचीमध्ये समावेश झाला आहे. द हुरन ग्लोबल रिच लिस्ट २०१९ मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. ५४ अब्ज अमेरिकी डॉलरची संपत्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांनी या सूचीत दहावे स्थान मिळवले आहे. अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस या सूचीत प्रथम क्रमांकावर आहेत.
  • कौटुंबिक व्यवसायाची विभागणी झाल्यानंतर अंबानी बंधुंनी साधारण सारख्याच भांडवलाच्या आधारे आपापले व्यवसाय सुरू केले. मात्र गेल्या सात वर्षांत मुकेश यांच्या संपत्तीत ३० अब्ज डॉलरची भर पडल आहे. त

आनंदवन स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित

  • चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने आयोजित आदर्श ग्राम पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा ग्रामसेवक व सरपंच यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडला. यावेळी अनेक ग्रामपंचायतनींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आनंदवनला स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • आनंदवन हे गाव सर्व निकषांच्याही पुढे आहे. स्वच्छता, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जलसुविधा, आरोग्य, याबाबत गावात विशेष उपक्रम राबविले जात आहेत. पाळणाघर ते पदवीधरपर्यंतचे शिक्षण व्यावसायिक शिक्षणही येथे आहे.
  • आनंदवन ग्रामपंचायतीला वरोरा पंचायत विभागातून सर्वात जास्त गुण मिळाविल्यामुळे स्मार्ट ग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सरपंच सुधारकर कडू व ग्रामसेविका विद्या गिलबिले यांनी हा सन्मान स्वीकारला.
Share This Article