Current Affairs 26 October 2018

0
8

Too: निवृत्त न्यायाधीश, CBI चे माजी संचालक करणार BCCI चे सीईओ राहुल जोहरींची चौकशी

 • लैंगिक छळाचा आरोप असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीाय) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल जोहरी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने राहुल जोहरींवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमली असून या चौकशी समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश, सीबीआयच्या माजी संचालकांचा समावेश आहे.
 • ‘मी टू’मोहिमेचे वादळ बीसीसीआयमध्येही धडकले असून काही दिवसांपूर्वी हरनिध कौर यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट टाकण्यात आली होती. यात महिलेच्या नावाचा उल्लेख नव्हता. मात्र, त्या महिलेचे जोहरी यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. संबंधित महिला काही वर्षांपूर्वी जोहरी यांच्यासोबत ‘डिस्कव्हरी वाहिनी’साठी काम करत होती, असे सांगितले जाते.

भारतीय वंशाच्या डॉ. अभय अष्टेकरांचा आइन्स्टाइन पुरस्काराने सन्मान

 • कृष्णविवरांमधील टक्कर यांसारख्या जटिल भौतिक घटनांचा अभ्यास करण्याचे समीकरण तयार करणारे भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ डॉ. अभय अष्टेकर यांना प्रतिष्ठेचा आइन्स्टाइन पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
 • अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या (एपीएस) वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. एपीएस ही भौतिक शास्त्रज्ञांची जगातील दुसऱ्या क्रमांकांची संस्था आहे. अष्टेकर यांना प्रदान केलेल्या पुरस्काराचे स्वरूप १० हजार डॉलर असे आहे. अल्बर्ट आइन्स्टाइनने काही दशकांपूर्वी वर्तवलेल्या गुरुत्वाकर्षणासंबंधीची भविष्यवाणी समजून घेण्यासाठी अष्टेकर यांनी १९८७मध्ये गणितीय समीकरण मांडले. त्यालाच लूप क्वॉंटम ग्रॅव्हिटी सिद्धान्त किंवा अष्टेकर व्हेरीअबल्स असे म्हटले जाते. जगातील अनेक शास्त्रज्ञ या सिद्धांतावर आधारित संशोधन करीत आहेत.
 • मुंबई ते अमेरिका
  डॉ. अभय अष्टेकर हे सामान्य सापेक्षता आणि क्वॉंटम ग्रॅव्हिटी या क्षेत्रातील नामवंत संशोधक आहेत. डॉ. अष्टेकर पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिटय़ूट ऑफ ग्रॅव्हिटेशन अ‍ॅण्ड द कॉसमॉस या संस्थेचे संचालक आहेत. त्यांचा जन्म ५ जुलै १९४९ रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्य़ात शिरपूर येथे झाला.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना टागोर पुरस्कार जाहीर

 • आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे. एक कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपारिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राम सुतार यांच्यासह मणिपुरी शास्त्रीय नर्तक राजकुमार सिंघजीत सिंह यांना २०१४ या वर्षासाठीचा तर बांगलादेशातील छायानौत या सांस्कृतिक संस्थेला २०१५ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची नावं निवडली आहेत अशी माहिती समोर आली आहे. या समितीत चीफ जस्टिस ऑफ इंडिया रंजन गोगोई यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारने रविंद्रनाथ टागोर यांच्या दीडशेव्या जयंतीपासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

तामिळनाडूचे ‘ते’ १८ आमदार अपात्रच, पलानीस्वामींचे सरकार वाचले

 • तामिळनाडूतील अण्णाद्रमुकच्या (एआयएडीएमके) १८ आमदारांना अपात्र ठरविणाचा विधानसभा सभापतींचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्या सत्ताधारी सरकारला दिलासा मिळाला आहे. तामिळनाडू विधानसभेत विश्वास मतापूर्वी २२ ऑगस्ट २०१७ रोजी १८ आमदारांना अन्नाद्रमुकचे बंडखोर नेते टीटीवी दिनाकरण यांच्यासोबत गेल्याबद्दल अपात्र घोषित करण्यात आले होते.
 • २०१७ मध्ये अपात्र घोषित केल्यानंतर १८ आमदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सथ्यानारायणन यांच्या खंडपीठाने विधानसभा सभापतींचा निर्णय कायम ठेवत १८ आमदारांना अपात्र ठरविले आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय अपात्र आमदारांना आहे.

PNB Scam: हाँगकाँगमधील नीरव मोदीची २५५ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

 • जाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याच्या हाँगकाँगमधील संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यानुसार (पीएमएलए) नीरवची इथली सुमारे २५५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
 • या कारवाईमुळे त्याची आजवर एकूण ४७४४ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

सिंधूची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पुन्हा मुसंडी

 • ऑलिम्पिक आणि जागतिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीच्या दुसऱ्या स्थानावर पुन्हा मुसंडी मारली आहे.
 • सध्या पॅरिसमध्ये फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत खेळत असलेल्या सिंधूने एका स्थानाने आगेकूच केली आहे. चायनीज तैपेईची ताय झू यिंग अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सिंधूने एका आठवडय़ाकरिता जागतिक क्रमवारीतील दुसरे स्थान मिळवले होते. त्यानंतर तिची घसरण झाली होती. मग सप्टेंबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी पुन्हा हे स्थान मिळवले होते. मग ती तिसऱ्या स्थानावर होती.
 • पुरुष एकेरीच्या क्रमवारीत किदम्बी श्रीकांतने आपले सहावे स्थान कायम राखले आहे, तर समीर वर्माने पाच स्थानांनी आगेकूच करताना १८वे स्थान गाठले आहे. डेन्मार्क आणि फ्रेंच खुल्या स्पध्रेतून माघार घेणाऱ्या एच. एस. प्रणॉयची दोन स्थानांनी घसरण झाली असून, तो १७व्या स्थानावर आहे. बी. साईप्रणीत २६व्या स्थानावर असून, सौरभ वर्माने दोन स्थानांनी आगेकूच करताना ४८वे स्थान गाठले आहे.

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here