⁠  ⁠

Current Affairs 26 March 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 3 Min Read
3 Min Read

1) ‘अस्मिता- स्वच्छता व आरोग्याचा आयाम’ योजना : 1 मेपासून बचत गटांकडे सॅनिटरी नॅपकिन

किशोरवयीन मुली, महिलांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारने ‘अस्मिता- स्वच्छता व आरोग्याचा आयाम’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत गावांमध्ये एक मेपासून केवळ पाच रुपयांत १३ नॅपकिनचा संच मिळू शकेल. गावागावांमध्ये महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

2) चेंडू कुरतडल्यामुळे अाॅस्ट्रेलिया टीमच्या कर्णधार स्टीव्हन स्मिथ अाणि उपकर्णधार डेव्हिड वाॅर्नरची हकालपट्टी

दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसाेटीच्या तिसऱ्या दिवशी अाॅस्ट्रेलियाच्या सलामीवीर कॅमरून बेनक्राॅफ्टने चेंडू कुरतडल्यामुळे अाॅस्ट्रेलिया टीमच्या कर्णधार स्टीव्हन स्मिथ अाणि उपकर्णधार डेव्हिड वाॅर्नरची हकालपट्टी करण्यात अाली. तसेच या कसाेटीसाठी टीम पॅनकडे टीमच्या कार्यवाह कर्णधारपदाची जबाबदारी साेपवण्यात अाली. हे गैरवर्तन करणाऱ्या कॅमरून बेनक्राफ्टवर अायसीसीने बंदीसह दंडात्मक कारवाई केली अाहे. केपटाऊन कसाेटीच्या तिसऱ्या दिवशी लंचनंतर सलामीवीर कॅमरून बेनक्राॅफ्ट हा चेंडू पिवळसर वस्तूशी घासत असल्याचे टेलिव्हिजन चित्रीकरणात स्पष्ट दिसून अाले अाहे. चेंडू रिव्हर्स स्विंग व्हावा, याच उद्देशाने त्याने हा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत स्मिथने अापल्या टीमच्या खेळाडूंकडून हा प्रकार घडल्याचे मान्य केले. मात्र, यादरम्यान त्याने हा सारा प्रकार डावपेचांचाच एक भाग असल्याचीही स्पष्टाेक्ती केली.

3) आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले

जम्मू काश्मीरमधील दल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेलं आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन रविवारपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. हे गार्डन १५ हेक्टर क्षेत्रात पसरलं आहे. या गार्डनमध्ये ५३ प्रकारची जवळपास १० लाखांहून अधिक ट्यूलिप येत्या महिन्याभरात उमलणार आहे. पूर्वी सिराज बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी २००८ मध्ये टय़ूलिप गार्डन सुरू केले होते. दहा वर्षांत आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डनचा मान या गार्डनला मिळाला.

4) ब्रिटनच्या वर्तमानपत्रांत फेसबुककडून माफीनामा

फेसबुकच्या वापरकर्त्यांची माहिती फुटल्याप्रकरणी फेसबुकचे अध्यक्ष मार्क झकरबर्ग यांनी ब्रिटनच्या वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन माफी मागितली आहे. आम्हांवर तुमची माहिती जपण्याची जबाबदारी आहे. ते जमत नसेल तर आमची या व्यवसायात राहण्याची पात्रता नाही, अशा आशयाच्या पूर्ण पानभर जाहिराती झकरबर्ग यांनी ब्रिटनमधील महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये छापून माफी मागितली आहे. विद्यापीठातील एका संशोधकाने २०१४ साली तयार केलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून फेसबुकवरील माहिती फुटली. त्या वेळी आम्ही फारसे काही केले नाही याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पण त्यानंतर फेसबुकने सुरक्षा वाढवली आहे. आमच्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही, असे झकरबर्ग यांनी म्हटले आहे.

5) महाराष्ट्राची कांची आडवाणी मिस इंडिया

नऊ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने अकराव्या मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेच्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून मिस इंडियाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने ऐतिहासिक कामगिरी करीत महिला शरीरसौष्ठवात मणिपूरच्या वर्चस्वाला धक्का दिला. मुळ मणिपूरची असलेल्या ममता देवी यमनमवर मात करीत कांचीने ही सुवर्णमयी कामगिरी रचली. हरयाणाची गीता सैनी तिसरी आली तर मणिपूरच्या जमुना देवी आणि सरिता देवीला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या स्पोर्टस् मॉडेल प्रकारात उत्तर प्रदेशची संजू विजेती ठरली. पश्चिम बंगालच्या सोनिया मित्राने रूपेरी कामगिरी करण्यात यश मिळविले.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Share This Article