Current Affairs 25 October 2018

0
19

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार जाहीर

 • दक्षिण कोरिआच्या कल्चरल फाऊन्डेशनतर्फे देण्यात येणाऱ्या सेऊल शांतता पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे. भारतातील गरीब-श्रीमंतांची दरी कमी करण्यासाठी मोदींनी केलेले प्रयत्न,नोटाबंदी,वैश्विक शांततेसाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
 • मोदींनी गरीब-श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पाऊलं उचलली आहेत. तसंच मोदीनोमिक्स अर्थात त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी अर्थव्यवस्थेत केलेल्या सुधारणांसाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोदींनी केलेल्या नोटाबंदीचेही या संस्थेने कौतुक केलं आहे.

इस्त्रायल भारताला देणार घातक मिसाइल सिस्टिम,
७७७ मिलियन डॉलरचा करार

 • रशिया पाठोपाठ भारताने इस्त्रायल बरोबर एलआरएसएएम एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिमचा खरेदी करार केला आहे. इस्त्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज ही सरकारी कंपनी ७७७ मिलियन डॉलरचे हे अतिरिक्त कंत्राट मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. भारतीय नौदलाच्या सात जहाजांवर इस्त्रायल एअरोस्पेसची एलआरएसएएम एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिमचा तैनात केली जाईल.
 • केंद्र सरकारच्या मालकीच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबरोबर हा करार करण्यात आला आहे. इस्त्रायलच्या एअरोस्पेस इंडस्ट्रीजकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली. एलआरएसएएम सिस्टिम बराक ८ कुटुंबाचा भाग असून इस्त्रायली नौदलबरोबरच भारताचे नौदल, हवाई दल आणि भूदल या सिस्टिमचा वापर करते. या नव्या करारामुळे बराक आठ क्षेपणास्त्राच्या विक्रीचा व्यवहार ६ अब्ज डॉलरपेक्षा पुढे गेला आहे असे आयएआयकडून सांगण्यात आले.

१ एप्रिल २०२० पासून ‘ही’ वाहने होणार बंद

 • वाहनांमधून होणारे प्रदूषण हे पर्यावरणाला हानिकारक असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. १ एप्रिलपासून भारतात भारत स्टेज-४ म्हणजेच BS-4 या वाहनांची विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या वाहनांना पर्याय म्हणून १ एप्रिल २०२० नंतर भारत BS-6 प्रकारच्या इंजिनाचा वापर करावा लागणार आहे. एप्रिल २०१७ मध्ये BS-4 वाहनांची विक्री अनिवार्य करण्यात आली होती. आताच्या BS-4 वाहनांची विक्री बंद झाल्यानंतर कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. ही वाढ एक ते दिड लाखांपर्यंत होईल असे बोलले जात आहे.
 • BS-6 मुळे कार बनविण्याच्या खर्चात वाढ होणार आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात भारतात दिल्लीमध्ये BS-6 सुविधेच्या कारमध्ये इंधन भरण्याची सुविधा पहिल्यांदा दिल्लीत उपलब्ध झाली. मात्र या नव्या निर्णयामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्याला मोठा हातभार लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपन्यांनी आता आपल्याकडे असलेला BS-4 चा स्टॉक लवकर क्लिअर करावा असे कंपन्यांना सांगण्यात आले आहे. जे ग्राहक आधीपासून BS-4 किंवा BS-3 च्या कार वापरतात त्यांना कोणत्या अडचणी येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विराट कोहली विक्रमवीर

 • भारताचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी वन डे सामन्यांमधील १० हजार धावांचा टप्पा ओलांडला असून हा टप्पा वेगाने ओलांडण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रमही विराटने मोडला आहे. विराटने फक्त २०५ डावांमध्ये हा टप्पा गाठण्याची किमया साधली आहे. तर सचिनने २२९ डावांमध्ये दहा हजार धावा केल्या होत्या.वन – डेत धावांचा पाठलाग करताना
 • विराट कोहली धावांचा पाठलाग करताना दबावाखालीदेखील सर्वोत्तम खेळी करतो हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. या बाबतची आकडेवारीही हेच सांगते. विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना ११६ डावांमध्ये ६८. ५४ च्या सरारीने ६, ०३२ धावा चोपल्या आहेत. यात २२ शतकांचा समावेश आहे. तर सचिनने धावांचा पाठलाग करताना २३२ डावांमध्ये ४२.३३ च्या सरासरीने ८, ७२० धावा केल्या आहेत. यात १७ शतकांचा समावेश आहे.
 • कसोटीत चौथ्या डावातील कामगिरी
  कसोटी सामन्यात चौथ्या डावात फलंदाजी करतानाही विराट धावांचा पाऊस पाडताना दिसतो. सचिन तेंडुलकरने ६० डावांमध्ये ३६. ९३ च्या सरासरीने १, ६२५ धावा केल्या असून यात तीन शतकांचा समावेश आहे. तर विराटने २२ डावांमध्ये ५१. ७० च्या सरासरीने ८७९ धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. कसोटीत चौथ्या- पाचव्या दिवशी खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी होते. अशा परिस्थितीत फलंदाजी करणे हे काहीसे आव्हानात्मकच असते.
 • वन डेमध्ये विराटने ७७ डावांमध्ये ५९. २५ च्या सरासरीने ३, ९७० धावा केल्या आहेत. यात १५ शतकांचा समावेश आहे. तर सचिनने १६० डावांमध्ये ४८.११ च्या सरासरीने ६, ९७६ धावा केल्या आहेत. यात २० शतकांचा समावेश आहे.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here