⁠  ⁠

चालू घडामोडी : २५ जून २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 25 June 2020

प्रादेशिक असमतोलात घट

Untitled 23 14
  • संपूर्ण देश करोना साथीच्या अभूतपूर्व संकटाशी झगडत असून, ही परिस्थिती राज्या-राज्यातील असमतोल कमी करणारा परिणाम साधणारी असेल, असे स्टेट बँकेच्या संशोधन अहवाल ‘इकोरॅप’चे प्रतिपादन आहे. अर्थात यामागे संपन्न राज्यांची हानी ही या संकटापायी गरीब राज्यांच्या तुलनेत अधिक असेल, असे गृहीतक आहे.
  • कोणत्याही देश व भौगोलिक प्रदेशाचा उत्पन्न स्तर मोजण्याचे साधन म्हणजे दरडोई उत्पन्नाची सरासरी ही संपूर्ण देशस्तरावर ५.४ टक्क्यांनी घटून, १.४३ लाख रुपये या पातळीवर येईल. साथीचे संकट सरल्यावर, संपूर्ण देश एक स्तरावर येईल, म्हणजे गरीब राज्ये ही श्रीमंत राज्यांची काही प्रमाणात बरोबरी करू शकतील, असा या अहवालाचा निष्कर्ष आहे.
  • अहवालाच्या मते, विद्यमान २०२०-२१ आर्थिक वर्षांत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ६.८ टक्के इतके आक्रसू शकेल. तर साथ येण्यापूर्वी असलेला अर्थवृद्धी दर गाठण्यासाठी आर्थिक वर्ष २०२३-२४ पर्यंत वाट पाहावी लागेल, असाही अहवालाचा निष्कर्ष आहे.
  • अहवालाच्या मते, कोणत्याही मोठा आघात करणाऱ्या प्रसंगानंतर दिसून येणारा हा परिणाम आहे. अशाच प्रकारच्या असमतोलात घसरणीचा अनुभव यापूर्वी एकसंध जर्मनीनेही १९८९ साली बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर अनुभवला आहे.
  • भारतात दरडोई उत्पन्नाच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा उच्च स्तर असलेल्या श्रीमंत राज्यांतील नागरिकांचे दरडोई उत्पन्न करोनापश्चात लक्षणीय घसरलेले दिसेल. अखिल भारतीय स्तरावरील दरडोई उत्पन्नातील सरासरी घसरण जरी ५.४ टक्के अंदाजण्यात येत असली तरी दिल्ली (-१५.४ टक्के) आणि चंडीगड
  • (-१३.९ टक्के) या राज्यांमध्ये घसरणीचे प्रमाण त्यापेक्षा तीन पट इतके असेल. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नांत (जीडीपी) ४७ टक्के वाटा असणाऱ्या आठ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दरडोई उत्पन्न दोन अंकी प्रमाणात घसरताना दिसेल, असे हा अहवाल सांगतो.

भारताला लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ देण्याचं रशियाचं आश्वासन

s400 missile fast
  • लडाख सीमेवर भारत आणि चीनदरम्यान तणावाचं वातावरण आहे. याचदरम्यान, रशियानं अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम S-400 भारताला लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक यांनी हे ब्रह्मास्त्र लवकरच भारताला देण्याचं आश्वासन दिलं आहे.
  • एस-४०० जगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर आहेत.
  • रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोविक बोरिसोव यांनी एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर भारताला देण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे.

पाकिस्तान FATF च्या ‘ग्रे यादीत’ कायम

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) ग्रे यादीमध्ये कायम राहणार आहे.
लष्कर आणि जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांना पोहोचणारी आर्थिक मदत थांबवण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. यामुळे बुधवारी एफएटीएफनं पाकिस्तानला ग्रे यादीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
चीनच्या शिय्यामिन लियू यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एफएटीएफच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवायचं की काळ्या यादीत टाकायचं यासंदर्भात चर्चा करण्यात येणार होती.
यापूर्वीही फेब्रुवारी महिन्याच एफएटीएफची बैठक पार पडली होती. त्यावेळीही या यादीतून बाहेर पडण्यास पाकिस्तानला अपयश आलं होतं. लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत पुरवण्याचा आरोप पाकिस्तानवर करण्यात आला आहे.
त्या बैठकीनंतर एप्रिल २०२० पर्यंतची वेळ पाकिस्तानला देण्यात आली होती. तसंच त्यांना २७ पॉईंट अॅक्शन प्लॅनवर काम करण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु पाकिस्तानला त्यातही अपयश आलं. दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या कारणावरून एफएटीएफने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानला ग्रे यादीत टाकण्याचा निर्णय घेतला होता.

भारतीय अर्थव्यवस्थेला लॉकडाऊनचा जबर फटकाः IMF

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारतीय अर्थव्यवस्थेवर या वर्षाचा धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ४.५ टक्क्यांनी घसरेल आणि हे घसरण ऐतिहासिक असेल, असं नाणेनिधीने म्हटलंय.
  • करोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यात आर्थिक उलाढाल ठप्प झाली. यामुळे ही मोठी घसरण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. पण यासोबतच २०२१मध्ये भारतयी अर्थव्यवस्थेत मोठी तेजी असेल आणि आर्थिक विकासदर हा ६ टक्क्यांपर्यंत जाईल, असा दिलासाही नाणेनिधीने दिला आहे.
  • २०२० मध्ये जगाच्या आर्थिक विकासदर ४.९ टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज आयएमएफने वर्तवला आहे. जागतिक आर्थिक परिदृश्याच्या (World economic scenario) अंदाजानुसार हा आकडा १.९ टक्कांनी खाली आहे.
  • करोनाच्या या बिकट संकटात अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.५ टक्क्यांनी घसरेल. हा अंदाज ऐतिहासिक दृष्ट्या खाली आहे. ही स्थिती सर्वच देशांची आहे, असं आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितलं.
  • करोना व्हायरसच्या संकटाचा २०२० मधील पहिल्या सहामाहितील आर्थिक उलाढालीवर नकारात्मक परिणाम झाला. अपेक्षेपेक्षा जास्त व्यापक परिणाम दिसून आला. तर २०२१ मध्ये जागतिक वृद्धी दर हा ५.४ टक्के असेल, असा अंदाज आहे.
  • हा आधी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमी आहे. २०२० मध्ये पहिल्यांदाच सर्व क्षेत्रात घसरण दिसून येणार आहे. चीनच्या आर्थिक विकासात पहिल्या तीमाहीनंतर सुधारणा होत आहे. यानुसार २०२० मध्ये चीनचा वृद्धी दर हा १.० टक्के असेल, असा अंदाज आहे.

Share This Article