⁠  ⁠

Current Affairs 25 February 2019

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

oscar: ‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स’ने पटकावला ऑस्कर

  • दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी असलेल्या ‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स’ या मासिक पाळीसंदर्भातील भारतीय माहितीपटाने ‘डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट’ या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
  • रायका झेहताबची यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाची निर्मिती गुणित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटने केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटपमधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
  • याबरोबरच, ‘रोमा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तसेच रोमाने बेस्ट सिनेमटॉग्रफीचा पुरस्कार देखील पटकावला आहे.
  • असे मिळाले पुरस्कार:
  • सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट: रोमा
  • सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री: रेजिना किंग (चित्रपट- इफ बील स्ट्रीट कुड टॉक)
  • सर्वोत्कृष्ट सहअभिनेता: माहर्शाला अली (चित्रपट- ग्रीन बुक)
  • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट: स्पायडर मॅन: इनटू द स्पायडर वर्स
  • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट सब्जेक्ट: पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स
  • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट: फर्स्ट मॅन
  • सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म: स्किन
  • सर्वोत्कृष्ट वेशभुषा: रुथ कार्टर

कलम ३५ अ सुनावणीच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त

  • जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानाच्या कलम ३५-अ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
  • मागच्या विधानसभा निवडणुकीत जम्मूमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारी भाजपा कलम ३५ अ विरोधात आहे. हे कलम रद्द करावे अशी भाजापाची भूमिका आहे. काश्मीरमधील दोन प्रादेशिक पक्ष नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडिपी हे कलम रद्द करण्याच्या विरोधात आहेत.
  • १४ मे १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी एक आदेश पारित केला होता. या आदेशान्वये भारताच्या संविधानात एक नवीन कलम ३५ (अ) जोडण्यात आले. कलम ३५ अ, कलम ३७० चाच हिस्सा आहे. कलम ३५ अ नुसार, जम्मू-काश्मीरमधील नागरिक तेव्हाच राज्याचा हिस्सा मानला जाईल जेव्हा त्याचा जन्म त्या राज्यातच होईल.

निर्माणाधीन घरांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्के

  • केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेताना निर्माणाधीन घरांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर आणला आहे, तर सवलतीच्या घरांवरील जीएसटी देखील ८ वरून एका टक्क्यावर आणला आहे.
  • गृहखरेदीवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.
  • ‘बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये ६० चौ. मीटर कार्पेट एरियापर्यंतची घरे परवडणारी मानली जातील तर नॉन मेट्रो शहरात ९० चौ. प्रति मीटरची घरे परवडणारी मानली जातील. या घरांची कमाल किंमत ४५ लाख रुपये असेल. हे नवे दर १ एप्रिल २०१९ पासून लागू होतील’ल अशी माहितीही जेटलींनी यावेळी दिली.

भारताच्या सौरभचा विश्वविक्रम, सुवर्ण पदकासह ‘ऑलिम्पिक’भरारी

  • भारतात सुरु असणाऱ्या ISSF shooting World Cup स्पर्धेत भारताचा १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरी याने रविवारी विश्वविक्रम करत सुवर्णपदक मिळवले. १० मीटर एअर पिस्टल पुरुष गटात त्याने २४५ गुण कमवले आणि थेट ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. या सुवर्णकमाईमुळे भारताच्या खात्यात दुसरे सुवर्णपदक जमा झाले.
  • अपूर्वी चंदेला हिने १० मी. एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर वरिष्ठ गटात नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत सौरभने ही कामगिरी केली.
  • सौरभने आशियाई स्पर्धेतही १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. त्यावेळी त्याने २४०.७ गुण मिळवले होते. त्यानंतर अवघ्या १६व्या वर्षाच्या सौरभने भारताला विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून दिले. सौरभ प्रथमच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय नेमबाजी गटात सहभागी झाला होता आणि त्याने इतिहास रचला. त्याने २४५ गुण मिळवले आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूतक केले. या स्पर्धेत सर्बियाच्या दामीर मायकेसने २३९.३ गुणांसह रौप्य पदक तर चीनच्या पँग वेईने २१५.२ गुणांसह कांस्यपदक पटकावले.

पंतप्रधान मोदी करणार ८०० किलोच्या भगवद्‌गीतचे अनावरण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्कॉन मंदिरात २६ फेब्रुवारी रोजी एका भव्य भगवद्‌गीतेचे उद्घाटन करणार आहेत. या भगवद्‌गीतेचे ‘एस्टांउडिंग भगवद्‌गीता’ असे नामकरण करण्यात आले आहे. ही भगवद्‌गीता ६७० पानांची असून, तिचे वजन ८०० किलो असणार आहे
  • इस्कॉनकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भगवद्‌गीतेचा आकार २.८ मीटर X २ मीटर आहे. या भगवद्‌गीतेला जगातील सर्वात मोठे धार्मिक व पवित्र पुस्तक म्हणून सादर केले जाणार आहे. पंतप्रधान मोदी इस्कॉनच्या कार्यक्रमात सहभागी होणार असून, जागतिक पातळीवरील नेते, राजकीय व्यक्ती, सामाजिक नेते, भाविक आणि इस्कॉन सदस्यांना संबोधित करतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली.

पनवेलच्या प्रणित पाटीलची ‘नासा’भरारी

  • अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या मंगळ मोहिमेसाठी नुकत्याच झालेल्या संशोधन मोहिमेत मूळचा पनवेलचा रहिवासी असलेला प्रणित पाटील याची निवड झाली असून प्रणितने मोहिमेचा कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पडली.
  • प्रणित पाटील याने पनवेलच्या व्ही. के. हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमात पूर्ण करून एमएजीएम कॉलेजातून सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग केले.
  • प्रणित पाटील याने जगद्विख्यातद्वैमानिक पॅटी वागस्टाफ यांच्याकडून एरोबॅटिक्सचे प्रशिक्षण घेतले. त्याच्या कामगिरीची दखल घेत २६ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या मंगळ मोहिमेच्या संशोधनात दोनशे जणांच्या पथकाचा कार्यकारी अधिकारी म्हणून त्याची निवड करण्यात आली.
Share This Article