Current Affairs – 24 October 2018

0
26

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘२०१८ सेऊल पीस प्राइझ’ असे या पुरस्काराचे नाव असून द सेऊल पीस प्राइझ कमिटीने याची घोषणा केली आहे.
 • पंतप्रधान मोदी यांची स्वदेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याबाबत प्रयत्न, जागतीक अर्थ व्यवस्थेच्या वाढीमध्ये भर टाकल्याबद्दल त्याचबरोबर भारतातील लोकांच्या विकासाला चालना दिल्याबद्दल मोदींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे द सेऊल पीस प्राइझ कमिटीने म्हटले आहे. एएनआयने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या हवाल्याने याबाबत ट्वीट केले आहे.
 • भ्रष्टाचाराविरोधात पावले उचलल्याने आणि समाजाच्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नांद्वारे मोंदींनी भारताच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले आहेत. याचीही मोदींच्या पुरस्कार निवडीसाठी नोंद घेण्यात आल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.
 • दरम्यान, नुकतेच २६ सप्टेंबर रोजी न्युयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण आमसभेत मोदींना ‘चॅम्पिअन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड’ हा पर्यावरण विषयक पुरस्कार जाहीर झाला होता. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला होता.

Advertisement

CBI: नागेश्वर राव यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

 • सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि माजी विशेष संचालक नागेश्वर राव यांनी एकामेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असतानाच या प्रकरणार लक्ष ठेवणाऱ्या केंद्रीय समितीने आयपीएस नागेश्वर राव यांची हंगामी सीबीआय संचालकपदी नियुकती केली आहे. ही निवड करताना मोईन प्रकरणात आरोप झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वगळून राव यांना संधी देण्यात आली आहे.
 • सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावर खुद्द सीबीआयने काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा दाखल केला. तोच आरोप त्यांनी संचालक आलोक वर्मांवर केला. याप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण समितीने दखल घेतली . हे प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायालयात गेले आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वर्मा आणि अस्थाना या दोघांनाही केंद्र सरकारने सक्तीच्या सुट्टीवर पाठवले आहे. त्याजागी नागेश्वर राव यांची हंगामी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहेत.
 • राव ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मुळचे तेलंगणातले वारंगलचे रहिवाशी आहेत.ते सीबीआमध्ये सहसंचालक म्हणून काम पाहत होते.

बँकांवरील बुडीत कर्जाचे अरिष्ट;
रिझव्‍‌र्ह बँकेच्या भूमिकेवर ‘कॅग’चा सवाल 

 • बँकांवर सध्याचे संकट ओढवत असताना, बँकिंग व्यवस्थेची नियंत्रक म्हणून रिझव्‍‌र्ह बँक काय करीत होती, तिची काहीच जबाबदारी नाही काय, असे तिखट प्रश्न भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) राजीव मेहऋषी यांनी मंगळवारी येथे उपस्थित केले.
 • बँकांनी इतक्या मोठय़ा प्रमाणात कर्ज वितरित केली की, त्यांचे मालमत्ता आणि दायित्व हे संतुलन बिघडले आणि ज्याची परिणती आज प्रचंड प्रमाणावर बुडीत कर्जाचा डोंगर उभा राहण्यात झाली; तथापि या घडामोडी सुरू असताना, रिझव्‍‌र्ह बँकेच्या भूमिकेबाबत प्रश्न का उपस्थित केला जाऊ नये, असे मेहऋषी यांनी प्रतिपादन केले.
 • देशाच्या बँकिंग क्षेत्रात आर्थिक वर्ष २०१७-१८ अखेर अनुत्पादित कर्ज मालमत्ता ९.६१ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. ३१ मार्च २०१८ अखेरच्या आकडेवारीतील सर्वाधिक ७.०३ लाख कोटी रुपयांचा वाटा औद्योगिक क्षेत्राला दिलेल्या कर्जाचा आहे. शेती आणि शेतीपूरक घटकांना दिलेली कर्जे थकण्याचे प्रमाण ८५,३४४ कोटी रुपयांचे आहे.

राज्यात १८० तालुके दुष्काळसदृश

 • २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीच्या निकषाचे ट्रिगर २ लागू झालेल्या राज्यातील १८० तालुक्‍यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे आज राज्य सरकारने जाहीर केले. दुष्काळसदृश परिस्थितीवर उपाययोजना म्हणून या तालुक्‍यांमध्ये विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 • २०१८ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील सर्व तालुक्‍यांचे महा मदत संगणक प्रणालीद्वारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनानुसार राज्यातील २०१ तालुक्‍यांमध्ये ट्रिगर १ लागू झाले होते. या तालुक्‍यांचे प्रभावदर्शक निर्देशांकांचे मूल्यांकन करून ट्रिगर २ मध्ये समाविष्ट झालेल्या १८० तालुके आज जाहीर करण्यात करण्यात आले. या तालुक्‍यांमधील रॅंडम पद्धतीने १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

अमेरिकी दबावापुढे झुकणार नाही!

 • टरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी (आयएनएफ) या करारात सामील होण्याबाबत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही, असे स्पष्टीकरण चीनने दिले आहे.
 • मध्यम पल्ल्याची अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे कमी करण्यासाठी अमेरिकी आणि सोव्हिएत युनियन यांच्यात १९८० च्या दशकात इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी (आयएनएफ) हा करार झाला होता. त्यावर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन आणि सोव्हिएत नेते मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या करारामुळे २७०० लघु आणि मध्यम पल्ल्याची अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली होती. सोव्हिएत युनियनने १९८० च्या दशकात एसएस-२० ही अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे युरोपीय शहरांच्या रोखाने तैनात केल्यानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी या कराराची मदत झाली होती.
 • मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच या करारातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. रशिया आणि चीन अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे विकसित करत असल्याचे कारण त्यांनी दिले आहे. तसेच चीनलाही या करारात सामील करून घेतले पाहिजे असे म्हटले.

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here