⁠  ⁠

Current Affairs 24 May 2019

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

आले तर मोदीच! नेहरु, इंदिरांनंतर घडला इतिहास

  • पं. जवाहरलाल नेहरु व इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमतात सत्ता मिळवण्याची किमया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्य केली आहे.
  • यूपीएच्या १० वर्षांच्या राजवटीनंतर २०१४ मध्ये पूर्ण बहुमताने निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले होते. यानंतर या निवडणुकीत मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी नोंदवली आहे.
  • देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी १९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेतील जवळपास तीन चतुर्थांश (४८९ पैकी ३६४) बहुमत मिळवले होते. ही पहिली निवडणूक पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ (ऑक्टोबर ५१ ते फेब्रुवारी ५२) चालली होती.
  • यानंतर झालेल्या १९५७ व १९६२च्या निवडणुकादेखील नेहरुंनी पूर्ण बहुमताने जिंकल्या. नेहरुंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९५७मध्ये ३७१ तर, १९६२मध्ये ३६१ जागा जिंकल्या.
  • इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९६७मध्ये ५२०पैकी २८३ जागा जिंकून सत्ता राखली. काँग्रेसमध्ये दुफळी पडल्यानंतर (अन्य गटाचे नेतृत्व मोरारजी देसाई यांच्याकडे होते) इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील गटाने १९७१च्या निवडणुकीत ३५२ जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमतात सत्ता मिळवली. याच कालावधीत इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाओ’चा नारा दिला होता.

संजीव पेंढरकर यांना पुरस्कार

  • विको लॅबोरेटरिजचे संचालक संजीव पेंढरकर यांना महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रॅण्ड (सर्वोत्तम ग्राहकसेवा) या पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले.
  • बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे झालेल्या या कार्यक्रमात पेंढरकर यांना बीएसईचे सीईओ आशीषकुमार चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
  • पेंढरकर यांना यावेळी द ब्राइट शायनिंग स्टार ही उपाधीही देण्यात आली.
    अर्थसंकेत या संस्थेतर्फे हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी पेंढरकर यांच्या व्यतिरिक्त अनेक उद्योजकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी होणार मुख्यमंत्री

  • वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील ‘वायएसआर कॉंग्रेस’ने आंध्र प्रदेश विधानसभेत बहुमत मिळवत तेलगु देशम पक्षाला (टीडीपी) धूळ चारली. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना हटवत जगनमोहन ३० मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे पक्षाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
  • राज्यात विधानसभेच्या एकूण १७५ जागांपैकी ‘वायएसआर’ने १४९ जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी ‘टीडीपी’ला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Share This Article