⁠  ⁠

चालू घडामोडी :२४ फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 24 February 2020

Untitled 20 9

हंगेरी टेबल टेनिस स्पर्धा : शरथ-साथियानला रौप्यपदक

अचंता शरथ कमल आणि जी. साथियान या भारताच्या पुरुष दुहेरी जोडीला ‘आयटीटीएफ’ जागतिक हंगेरी खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
शरथ-साथियान जोडीला अंतिम फेरीत जर्मनीचा बेनेडिक्ट डुडा आणि पॅट्रिक फ्रँझिस्का या जोडीकडून ५-११, ९-११, ११-८, ९-११ असा पराभव पत्करावा लागला. शरथ कमाल याचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले. याआधी त्याने या स्पर्धेत मिश्र दुहेरीत मनिका बात्रासह कांस्यपदक मिळवले होते.
रथ-साथियान जोडीने उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या अव्वल मानांकित जोडीला पराभूत केले होते. मात्र अंतिम फेरीत जर्मनीच्या जोडीकडून त्यांना हार मानावी लागली.
१० वर्षीय हन्सिनीला कांस्यपदक : भारताच्या टेबल टेनिसमधून सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते चेन्नईच्या हन्सिनी हिने. १० वर्षांची पाचवी इयत्तेमधील विद्यार्थिनी माथन राजन हन्सिनी हिने स्वीडनमधील ऑरेब्रो येथील स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. हन्सिनीचा उपकनिष्ठ मुलींच्या गटातील उपांत्य फेरीत रशियाच्या लुलिया पुगोवकिनाकडून १२-१०, ९-११, ५-११, ८-११ पराभव झाला. मात्र उपांत्य फेरी गाठल्याने हन्सिनीला कांस्यपदक मिळवता आले.

आशियाई कुस्ती स्पर्धा : राहुल आवारेला कांस्यपदक

Untitled 21 9

महाराष्ट्राला यंदाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेतील पहिले पदक राहुल आवारेच्या रूपाने मिळाले. ६१ किलो वजनी गटात राहुलने कांस्यपदकाची कमाई करत आपल्या खात्यात आणखी एका आंतरराष्ट्रीय पदकाची भर घातली.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी मात्र भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. ७४ किलो वजनी गटात सुशील कुमारचा प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जाणारा जितेंदर कुमार याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जितेंदरचे सुवर्ण हुकले असले तरी अंतिम फेरी गाठल्याने त्याचे किर्गिजिस्तान येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित झाले.दिवसभरातील तिसरे पदक ८६ किलो वजनी गटातून अनुभवी कुस्तीपटू दीपक पुनियाने कांस्यपदकाच्या रूपाने मिळवले. महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारे याने कांस्यपदकासाठीच्या लढतीत इराणच्या माजित अल्मास दास्तान याचा ५-२ पराभव केला.

आंध्र प्रदेशातील जोनागिरी येथे उभारण्यात येणार भारतातील पहिली खासगी सोन्याची खाण

भारतातील पहिली खासगी सोन्याची खाण आंध्र प्रदेशातील जोनागिरी येथे उभारण्यात येणार आहे. या कामाला २०२१ च्या शेवटच्या तिमाहीत सुरुवात होणार आहे. खाण प्रकल्पातील भूसंपादन पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
जियोमैसूर कंपनीकडून जोनागिरी येथे १५०० एकर क्षेत्रासाठी खाण भाडेपट्टी तत्वावर देणार आहे.

जगातील टॉप १०० विद्यापीठांमध्ये भारतातील अकरांचा समावेश

टाइम्स हायर एज्युकेशनच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या देशांत यावर्षी ११ भारतीय विद्यापीठांनी स्थान पटकावले असून, २०१५ पासून भारताला हे सर्वात जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे. २०१५ पासून पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये ११ भारतीय शैक्षणिक संस्थांनी स्थान पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे.
टाइम्स हायर एज्युकेशनच्या माहितीनुसार पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये चीनच्या सर्वात जास्त ३० विद्यापीठांनी स्थान पटकावले आहे. या रँकिंगसाठी ४७ देश आणि विभागांचा समावेश होता. एकूण ५३३ विद्यापीठांत एकूण ५६ भारतीय विद्यापीठांनी फूल रँकिंग मिळवले होते. टॉप भारतीय विद्यापीठांत इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सने (बंगळुरू) पहिले स्थान मिळवले होते, तरी दोन पायऱ्या खाली येऊन १६ क्रमांकावर आले. त्यानंतर इंडियन इन्स्टिस्ट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (खरगपूर) आणि आयआयटीने (मुंबई) अनुक्रमे ३२ व ३४ वे स्थान मिळवले. ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इमिनन्स स्कीममध्ये भाग घेतलेल्या विद्यापीठांपैकी एक अमृत विश्व विद्यापीठमने प्रथमच पहिल्या १०० संस्थांच्या यादीत ५१ वे स्थान मिळवले.
२०१९ मध्ये हे विद्यापीठ १४१ व्या स्थानी होते. २०१९ च्या तुलनेत अमृत विद्यापीठमने रँकिंगच्या सगळ्या मापनात (मेट्रिक्स) सुधारणा केल्याचे टाइम्स हायर एज्युकेशनने म्हटले. इन्स्टिट्यूटस् आॅफ इमिनन्स स्कीममध्ये समाविष्ट असलेल्या व पहिल्या १०० संस्थांच्या यादीत स्थान मिळवलेल्या विद्यापीठांनी रँकिंगमध्ये फार मोठी सुधारणा केली आहे.
आयआयटी खरगपूर, दिल्लीने मिळविले स्थान
च्आयआयटीने (खरगपूर) २३ पायºया चढून ३२ वे स्थान मिळवले, तर आयआयटी दिल्लीने २८ पायºया चढून ३८ वे स्थान मिळवले. आयआयटीने (मद्रास) १२ पायºयांची प्रगती करून ६३ वे स्थान मिळवले. आयआयटी (रोपार) आणि इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीने (मुंबई) टॉप १०० रँकिंगमध्ये आपापल्या पहिल्याच प्रयत्नात अनुक्रमे ६३ व ७३ वे स्थान मिळवले.
च्इन्स्टिट्यूट आॅफ इमिनन्स स्कीम सहभागी होणाºया विद्यापीठांना जगातील पहिल्या १०० संस्थांच्या यादीत (टाइम्स हायर एज्युकेशनच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगसह) स्थान मिळवण्यासाठी शासकीय अनुदान तेही जास्त स्वायतत्तेसह उपलब्ध करून देते.

Share This Article