⁠  ⁠

Current Affairs 24 February 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे ७५ हजार कोटी रुपयांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ होणार आहे.
  • जवळपास एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात येणार
  • केंद्र सरकारने २०१९-२० चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये सदर योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टर जमीन असलेल्या १२ कोटी छोटय़ा शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तीन हप्त्यांत वर्षांला सहा हजार रुपये जमा करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
  • सदर योजना चालू आर्थिक वर्षांपासून अमलात आणण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना पहिला हप्ता मार्चपूर्वीच मिळणार आहे.
  • उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसह १४ राज्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवणार

  • भारताला जगातील तिसरी व १० लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचा सरकारचा इरादा असून देशात असंख्य स्टार्ट अप, विद्युत वाहनांचा जास्त वापर असलेला देश बनवण्याचे आपले स्वप्न आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात मंत्रालयांमध्ये भ्रष्टाचारासाठी स्पर्धा होती; आता कार्यक्षमतेसाठी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
  • ग्लोबल बिझिनेस शिखर बैठकीत त्यांनी सांगितले, की आम्हाला लकवा असलेली अर्थव्यवस्था मागील सरकारकडून वारशाने मिळाली.
  • भाजपप्रणीत एनडीए सरकारने ७.४ टक्के विकास दर संपादन केला असून चलनवाढही ४.५ टक्कय़ांपेक्षा कमी आहे. वस्तू व सेवा कर सुधारणेमुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात भर पडली आहे.
  • भारतात १०० स्मार्ट शहरे उभी राहात आहेत. १०० महत्त्वाकांक्षी जिल्ह्यंची प्रगती वेगान होते आहे. देशात वेगवान रेल्वेगाडी तयार करण्यात आली आहे, देशातील कोटय़वधी लोकांना वीज मिळाली असून आपला देश विजेचा निर्यातदार झाला आहे. देशातील लोकांमुळेच अशक्य ते शक्य झाले आहे.

अपूर्वीचा विश्वविक्रमी ‘सुवर्ण’वेध

  • भारताची स्टार नेमबाज अपूर्वी चंदेला हिने शनिवारी कर्णिसिंग शुटिंग रेंजवर सुरू झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात पहिल्याच दिवशी महिलांच्या दहा मीटर एअर रायफल नेमबाजीत विश्व विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली.
  • अपूर्वीने २५२.९ गुणांच्या शानदार कामगिरीसह अव्वल स्थान पटकविले. चीनची रूओझू झाओ २५१.८ गुणांसह दुसऱ्या आणि तिची सहकारी ज्यू होंग २३०.४ गुणांसह तिसºया स्थानी राहिली.
  • आठ महिलांच्या अंतिम लढतीत अपूर्वीने रौप्य विजेत्या खेळाडूच्या तुलनेत १.१ गुण अधिक घेतले. अपूर्वीने मागच्या विश्व चॅम्पियनशिपमधील देदीप्यमान कामगिरीच्या बळावर आगामी टोकियो आॅलिम्पिकची आधीच पात्रता मिळविली आहे. रविवारी पात्रता फेरीत तिने ६२९.३ गुणांची कमाई करीत चौथे स्थान घेतले होते.
  • अंतिम फेरीत २६ वर्षीय अपूर्वी सर्वात युवा होती. विश्कचषक स्पर्धेत तिने पहिल्यांदाच सुवर्ण जिंकले. याआधी तिला २०१५ मध्ये चँगवॉन येथे कांस्य, तर म्युनिच येथे रौप्य पटकावले होते. चिनच्या रौशू झाओ व हाँग झू यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अपूर्वी व अंजूम मुदगील यांनी २०२० च्या टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेची पात्रता आधीच निश्चित केली आहे. त्यामुळे चीनी खेळाडूंना आॅलिम्पिकचे तिकिट मिळाले.

बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूची ‘तेजस’ मधून गगन भरारी

  • देश विदेशात बँडमिंटनचे कोर्ट गाजवणारी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने हवाई दलात नव्याने दाखल झालेल्या तेजस या भारतीय बनवितीच्या हलक्या लढाऊ विमानातून आकाशात भरारी घेत संपूर्ण देशातील महिला सैनिकांच्या कार्याचा गौरव केला. तेजस हे अतिशय चांगले विमान असून या विमानामुळे भरती हवाई दलाची ताकद वाढली असल्याचे नमूद करत तिने डीआरडीओ तसेच भारतीय अभियंत्यांचे अभिनंदन केले.
  • बेंगळुरु येथील एलहांका विमानतळावर सुरु असलेल्या १२ व्या ‘एअरो ईंडीया २०१९’ या प्रदर्शनाचा चौथा दिवस हा भारतीय हवाई दल,सशस्त्र सेना आणि एरोस्पेस क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याच्या गौरव करण्यासाठी महिला दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त हवाई दलातील काही वैमानिक महिलांनी डॉर्नियर, बी.ए.ई सिस्टम्स पीएलसी चे हॉक-१ एडवांस्ड जेट ट्रेनर या विमानाचे आणि चेतक हेलिकॉप्टर या विमानाचे सारथ्य केले.
  • १२ व्या ‘एअरो ईंडीया २०१९’ या प्रदर्शनाचा चौथा दिवस हा भारतीय हवाई दल,सशस्त्र सेना आणि एरोस्पेस क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याच्या गौरव करण्यासाठी महिला दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
Share This Article