⁠  ⁠

Current Affairs 24 April 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

आशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला सुवर्ण

  • आशियाई कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाने दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले आहे. कझाखस्तानच्या सायतबेक ओकासोव्ह याला १२-७ अशा फरकाने पराभूत करत ६५ किलो वजनी गटात सर्वोच्च स्थान मिळवले.
  • सामना सुरू होताच पहिल्या मिनिटात ओकासोव्ह याने २-७ अशी दमदार आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर बजरंगने सामन्यात जोरदार पुनरागमन करत पाठोपाठ ८ गुणांची कमाई करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली आणि सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. बजरंगचा आक्रमकपणा आणि सामन्यात वापरलेला चाणाक्षपणासमोर ओकासोव्हने शरणागती पत्करली.
  • बजरंगने आशियाई कुस्ती स्पर्धेचे दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे.
    उझबेकिस्तानच्या सिरोजिद्दीन खासनोव्ह याला १२-१ ने पराभूत करत बजरंगने उपांत्य फेरी गाठली होती.

श्रीलंकेत आणीबाणी लागू

  • दहशतवादाची भरू लागलेली जखम पुन्हा चिघळवण्याचे कारस्थान रचणाऱ्या दहशतवादी गटांविरोधात कठोर कारवाई करण्यास लष्कराला जादा अधिकार देण्यासाठी श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपला सिरिसेना यांनी सोमवार मध्यरात्रीपासून देशात आणीबाणी जाहीर केली.
  • ‘एलटीटीई’ संघटनेच्या दहशतवादी कारवायांच्या काळ्या अध्यायानंतर शांततेचा अनुभव घेणारी श्रीलंका ‘ईस्टर संडे’लाच तब्बल आठ बॉम्बस्फोटांनी हादरली. नॅशनल तौहिद जमात या संघटनेनेच हे स्फोट घडवून आणल्याचा संशय सोमवारी श्रीलंकेच्या सरकारने व्यक्त केला आहे

भारत थांबविणार इराणी तेलाची आयात; पर्यायी स्रोतांचा वापर

  • अमेरिकेने निर्बंधातील सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबविणार आहे. त्यामुळे निर्माण होणारी तेलाची तूट सौदी अरेबियासारख्या देशांकडून तेल खरेदी करून भरून काढली जाणार आहे.
  • अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लावल्यानंतर भारत आणि चीनसह काही देशांना त्यातून सवलत दिली होती. त्यामुळे भारत इराणकडून तेल खरेदी करीत होता. तथापि, आता अमेरिकेने ही सवलत काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थितीत भारताने इराणकडून तेल खरेदी सुरूच ठेवल्यास अमेरिकेकडून भारतावरही निर्बंध लावले जाऊ शकतात. त्यामुळे भारताला इराणी तेल खरेदी करणे थांबवावेच लागणार आहे.
  • भारत हा इराणी तेलाचा दुसरा मोठा ग्राहक आहे. २०१८-१९ या वित्त वर्षात भारताने इराणकडून २४ दशलक्ष टन कच्चे तेल खरेदी केले होते. इराणला पर्याय म्हणून सौदी अरेबिया, कुवैत, यूएई आणि मेक्सिको या देशांकडून भारत तेल घेऊ शकतो.

दीड लाख टपाल कार्यालये टीसीएसने केली आधुनिक

  • भारतातील सर्वात मोठी माहिती व तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) देशातील १.५ लाख टपाल कार्यालयांच्या
    (इंडिया पोस्ट) आधुनिकीकरणासाठी इंटिग्रेटेड सोल्युशन तैनात केले आहे.
  • २०१३ मध्ये टीसीएसने टपाल विभागाकडून १,१०० कोटी रुपयांचा
    अनेक वर्षे चालणारा करार माहिती व तंत्रज्ञान आधुनिकीकरणासाठी मिळवल्याचे जाहीर केले होते.
  • हे आधुनिकीकरण टीसीएस इतर कोणत्याही कंपनीकडून सेवा न घेता झाले आहे. या भागीदारीचा हेतू पोस्टाला अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त
    करून ग्राहकांना कार्यक्षम सेवा देण्याचा आहे. या रूपांतरणात कोअर सिस्टीम इंटिग्रेशन कार्यक्रम टीसीएसने डिझाईन करून राबवला आहे.
  • यात इंटिग्रेटेड ईआरपी सोल्युशन आहे. त्याद्वारे मेल ऑपरेशन्स, फायनान्स आणि अकाऊंटिंग, एचआर फंक्शन्स करता येतील व दीड
    लाखांपेक्षा जास्त संख्येत असलेल्या टपाल कार्यालयांना प्रचंड नेटवर्कशी जोडले गेले.

आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत स्वप्ना बर्मनला रौप्यपदक:

  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आणि गतविजेत्या स्वप्ना बर्मन हिला आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या हेप्टॅथलॉन प्रकारात रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. Swapna-Barman
  • मात्र पदकासाठीचा दावेदार समजल्या जाणाऱ्या जिन्सन जॉन्सनने दुखापतीमुळे पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीतून माघार घेतली.
    22 वर्षीय स्वप्नाने सात क्रीडाप्रकारांमध्ये 5993 गुणांची कमाई करत दुसरे स्थान पटकावले. तिच्यावर उझबेकिस्तानच्या एकतारिना वोरनिना हिने 6198 गुण मिळवत मात केली. याच गटात भारताच्या पूर्णिमा हेमब्राम हिला 5528 गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
  • स्वप्नाच्या रौप्यपदकामुळे भारताने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली. तर महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरी हिने 10.03.43 सेकंद अशी वेळ देत पाचवे स्थान प्राप्त केले.

Share This Article