⁠  ⁠

चालू घडामोडी : २३ ऑक्टोबर २०१९

Rajat Bhole
By Rajat Bhole 1 Min Read
1 Min Read

‘भारत-अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान व व्यापार पुढाकार (DTTI) बैठक दिल्लीत

– नवी दिल्लीत ‘भारत-अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान व व्यापार पुढाकार (DTTI) याची नववी बैठक आयोजित करण्यात आली आहे. वर्तमानात DTTI उपक्रमाचे नेतृत्व अमेरिकेचे एलन एम. लॉर्ड आणि भारताचे संरक्षण सचिव अपूर्व चंद्रा हे करीत आहेत. 

– अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी DTTI हा उपक्रम आखण्यात आला आहे, कारण की दोन्ही देशातल्या भिन्न नोकरशाही प्रक्रिया आणि कायदेशीर आवश्यकता अस्तित्वात असल्यामुळे ती व्याख्या संकुचित होते. त्यामुळे हा उपक्रम अश्या अडथळ्यांना दूर करण्यास तसेच अमेरिकेच्या वरिष्ठ पातळीवरचा दृष्टिकोन विस्तारित करण्यास मदत करते.

पाकिस्तानकडून भारतासोबतची टपाल सेवा बंद

– पाकिस्तानने भारताबरोबरची टपाल सेवा बंद केली असून  या निर्णयाने आंतरराष्ट्रीय निकषांचे उल्लंघन झाल्याची टीका भारताने केली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाने दोन्ही देशातील संबंध आणखी खालच्या पातळीवर आले आहेत.

– पाकिस्तानने भारतातून आलेले टपाल २७ ऑगस्टपासून स्वीकारलेले नाही व तेथूनही टपाल पाठवलेले नाही. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने टपालसेवा बंद केली आहे. केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सांगितले, की पाकिस्तानने टपाल सेवा बंद करण्याचा निर्णय एकतर्फी घेतला असून त्याची पूर्वसूचना भारताला दिली नाही.

चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

Share This Article