⁠  ⁠

Current Affairs 23 February 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • ऑक्टोबर महिन्यात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. मोदीनॉमिक्स आणि लोकशाहीला बळकटी दिल्याने हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • नरेंद्र मोदींनी पुरस्कारासोबत १ कोटी ३० लाखांची रक्कम देण्यात आली आहे. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा योजनेला देणार असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी नरेंद्र मोदींनी केलेले प्रयत्न, नोटाबंदी, वैश्विक शांततेसाठी केलेल्या कार्यासाठी नरेंद्र मोदींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
  • महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी झाली त्याच वर्षी हा पुरस्कार मिळणं माझं भाग्य आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

बँका करणार व्याजदरकपात

  • रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातील बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. या बैठकीत पतधोरण आढाव्यात रेपो दर घटवूनही अद्याप बँकांनी सर्वसामान्यांना देण्यात येणाऱ्या कर्जांवरील व्याजदरात घट न केल्याचा मुद्दा विशेष चर्चिला गेला.
  • आगामी ४ एप्रिलच्या पतधोरण आढाव्यात व्याजदरात आणखी घट होण्याची शक्यता आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे फेब्रुवारीमध्ये महागाईचा दर २.५ टक्क्यांच्या आसपास राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
  • रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर गेला आहे. बँकांना रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने निधी पुरवठा केला जातो, त्याला रेपो दर म्हणतात
  • ज्या वेळी बँकांमधील मुदत ठेवींमध्ये (६.१) कर्जे वाटपाच्या तुलनेत घट होते (९.३ टक्के) त्या वेळी मुदत ठेवी वाढविण्यासाठी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवावे लागतात.

बुलेट ट्रेनच्या नाव, बोधचिन्हासाठी स्पर्धा

  • ‘द नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड,’ ने मुंबई-अहमदाबाद, या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे नाव आणि बोधचिन्ह सुचविण्यासाठी एका राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही बुलेट ट्रेन २०२२मध्ये सुरू होईल, असे नियोजन आहे.
  • या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी बुलेट ट्रेनचे नाव आणि बोधचिन्ह २५ मार्चपर्यंत सादर करावयाचे आहे.

नरेंद्र मोदींचें ५५ महिन्यात ९३ परदेश दौरे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावरुन नेहमी मोठी चर्चा केली जाते. पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांचा हा ५५ महिन्यांतील ९३ वा परदेश दौरा आहे. त्यावर २०२१ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
  • परदेश दौऱ्यात मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची बरोबरी केली आहे. त्यांनी १० वर्षांत ९३ विदेश दौरे केले होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ वर्षांत ११३ विदेश दौरे केले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ४८ दौरे केले होते.
  • पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ६८ वेळा विदेश दौरे केले होते. मोदी यांच्या प्रत्येक दौऱ्यावर २२ कोटी रुपये खर्च झाले तर मनमोहन सिंग यांच्यासाठी २७ कोटी खर्च झाले आहेत. दक्षिण कोरियापूर्वी मोदी यांनी ९२ विदेश दौरे केले आहेत. त्यावर एकूण २०२१ कोटी रुपये खर्च झाले. त्यांच्या एका दौऱ्यावर सरासरी २२ कोटी रुपये खर्च झाले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक दौरे २०१५ मध्ये केले. या वर्षी ते २४ देशांमध्ये गेले. २०१६ व २०१८ मध्ये १८-१८ देशांत गेले. २०१४ मध्ये ते १३ देशांमध्ये गेले होते. मोदी यांनी प्रत्येकी ५ वेळा अमेरिका तर प्रत्येकी ३ वेळा फ्रान्स-जपानचा दौरा केला. मोदींनी पाच वर्षांत एकूण ४९ विदेश दौरे केले. यादरम्यान ते ९३ देशांत गेले. त्यातील ४१ देश असे आहेत, जेथे ते पहिल्यांदा गेले. १० देशांमध्ये ते दोन वेळा गेला. फ्रान्स, जपानमध्ये ३-३ वेळा गेले. चीन-अमेरिकेत ५-५ वेळा गेले. रशिया, सिंगापूर, जर्मनी, नेपाळमध्ये ४-४ वेळा गेले.
Share This Article