⁠  ⁠

Current Affairs 22 March 2019

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

शेतमजुरी क्षेत्रातील रोजगारात ४० टक्क्यांनी घट

  • शेतमजुरीच्या क्षेत्रातील रोजगारात २०११- १२ या वर्षांपासून सुमारे ४० टक्क्यांनी घट झाली असून यामुळे गेल्या सात वर्षांत रोजगाराची संख्या सुमारे ३ कोटींनी कमी झाली आहे.
  • राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) २०१७-१८ या वर्षांसाठीच्या (अद्याप जाहीर न झालेल्या) पिरिऑडिक लेबर फोर्स सव्‍‌र्हे (पीएलएफएस) या अहवालात, शेतमजुरीतून प्रामुख्याने उत्पन्न मिळणाऱ्या ग्रामीण भागातील घरांच्या संख्येत २०११-१२ पासून २१ टक्क्यांपासून १२.१ टक्क्यांपर्यंत, म्हणजे १० टक्क्यांनी घट झाली आहे. म्हणजेच शेतमजुरीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या संख्येत दीड कोटींनी घट होऊन, ती ३६० दशलक्षवरून २१ दशलक्ष इतकी झाली आहे.
  • एनएसएसओच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण शेतमजुरीच्या क्षेत्रात २०११-१२ पासून पुरुषांच्या रोजगारात ७.३ टक्क्यांनी, तर महिलांच्या बाबतीत ३.३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. याचाच अर्थ, यापूर्वीच्या रोजगार सर्वेक्षणानंतर एकूण रोजगाराचे ३.२ कोटी रुपयांनी नुकसान झाले असून, ग्रामीण शेतमजुरीच्या क्षेत्रात २९.२ टक्क्यांची घट झाली आहे.

महिला आयकर आयुक्तांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये प्रवेश

  • मेरठ येथे कार्यरत असलेल्या आयआरएस अधिकारी प्रीता हरित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रीता हरित या आयकर विभागात विशेष आयुक्तपदी कार्यरत होत्या.
  • उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रमुख राज बब्बर यांच्या उपस्थितीत प्रीता हरित यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. प्रीता यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. मुळच्या हरयाणाच्या असलेल्या प्रीता पूर्वीपासूनच दलितांच्या अधिकारांसाठी सक्रिय आहेत.
  • १९८७ च्या बॅचच्या आयआरएस अधिकारी असलेल्या प्रीता हरित यांनी दनकौर येथे दलित महिलांवरील अत्याचारावर तिखट प्रतिक्रिया नोंदवली होती. याप्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीचीही मागणी केली होती.

मशिदीवरील गोळीबाराच्या घटनेनंतर न्यूझीलंडमध्ये स्वयंचलित रायफल्सवर बंदी

  • न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत ४९ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या देशात शस्त्रांवर बंदी घालण्याची मागणी होत होती. त्यानुसार, पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी सेमी ऑटोमॅटिक रायफलींच्या विक्रीवर बंदीची घोषणा केली आहे.
  • अर्डन यांनी म्हटले की, आम्ही सर्व सेमी ऑटोमॅटिक रायफल, उच्च क्षमतेच्या मॅगझिन्स आणि त्यांच्या पार्ट्सवर प्रतिबंध घालत आहोत. ज्यामुळे कोणतेही हत्यार अधिक जास्त घातक बनवले जाऊ नये.

माजी अव्वल बॅडमिंटनपटू पेरसोनवर दीड वर्ष बंदी

  • जागतिक क्रमवारीत एके काळी सहाव्या स्थानापर्यंत पोहोचलेला डेन्मार्कचा जोकीम पेरसोन याने सामनानिश्चिती आणि सट्टेबाजीला साहाय्य केल्याचे कारण देत जागतिक बॅडमिंटन महासंघाने त्याच्यावर दीड वर्षांसाठी बंदी घातली आहे. चार प्रकरणांमध्ये जोकीम हा दोषी आढळला आहे.
  • त्याला दीड वर्षांच्या बंदीसह ४५०० डॉलर्स इतकी रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे. गतवर्षी मलेशियाच्या दोघा बॅडमिंटन खेळाडूंवर सामनानिश्चिती आणि भ्रष्टाचार प्रकरणात १५ आणि २० वर्षे बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यामुळे त्या तुलनेत ही कारवाई सौम्यच मानली जात आहे.
Share This Article