⁠  ⁠

चालू घडामोडी – २२ एप्रिल २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 2 Min Read
2 Min Read

देश-विदेश

पॉप संगीताचा सुपरस्टार प्रिन्स याचे निधन
अमेरिकन पॉप संगीताचा सुपरस्टार प्रिन्सचे काल रात्री वयाच्या ५७ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. प्रिन्सच्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला.

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट कायम
उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करून तेथील मुख्यमंत्री हरिश रावत यांना २९ एप्रिलला बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात नैनिताल उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. या प्रकरणी २७ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या दिवसापर्यंत राष्ट्रपती राजवट कायम राहणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन२१ कि.मी सागरी बोगद्यातून
मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचा प्रवास साहसी ठरणार आहे. कारण देशातील ही पहिली बुलेट ट्रेन मुंबईतील ठाणे-विरार टप्प्यातून जाताना सागरातील २१ कि.मी. लांबीच्या बोगद्यातून प्रवास करणार आहे. मुंबई-अहमदाबाद हे ५०८ कि.मी.चे अंतर अगदी कमी काळात पार करणारी बुलेट ट्रेन ठाणेखाडीनजीक सागराखालील बोगद्यातून जाईल असे रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी

महाराष्ट्र

अलिबागची संविधानकन्या
लहान वयात मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांना नित्य वाचनाची सवय लावली जाते. त्यांच्याकडून श्लोक आणि स्तोत्र बोलून घेतले जातात. पण अलिबागच्या मनश्री आंबेतकर हिने पाठांतरासाठी चक्क भारतीय राज्यघटना निवडली. आणि बघता बघता राज्यघटनेतील सर्व कलमे, उपकलमे, दुरुस्त्या, परिशिष्ट, अनुसूच्या मुखोद्गत केल्या आहेत. त्यामुळे अलिबागची ‘संविधानकन्या’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

अर्थव्यवस्था

भारताला १० टक्के दराने अर्थवृद्धी शक्य!
भारताला १० लाख कोटी अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यापर्यंत आणि २०३२ सालापर्यंत अर्थव्यवस्थेत १० टक्के दराने वाढ साधता येईल, असा विश्वास निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी गुरुवारी व्यक्त केला.

परकी गुंतवणुकीत भारताने चीनला टाकले मागे
नवी दिल्ली : थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात भारताने गेल्या वर्षी चीनला मागे टाकल्याची माहिती एका अहवालाद्वारे समोर आली आहे. गेल्या वर्षी घोषित झालेल्या प्रकल्पांमधून 63 अब्ज डॉलर इतकी परकी गुंतवणूक भारतात होणार आहे.

क्रीडा

ग्रीसमध्ये ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित
ऑलिंपियाड – रिओ २०१६चे काउंटडाउन जल्लोषात सुरू झाले आहे. ग्रीसमधील प्राचीन ऑलिंपियाड शहरात ग्रीक अभिनेत्री कॅटरीना लिहोयू हिने विशिष्ट प्रकारच्या आरशाच्या साह्याने सूर्यकिरणांचा वापर करून ही ज्योत प्रज्वलित केली. कॅटरीनाने ग्रीक अप्सरेसारखा पोशाख परिधान केला होता.

TAGGED:
Share This Article