⁠  ⁠

चालू घडामोडी : १९ जुलै २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Current Affairs 19 July 2020

अमेरिकेची भारतात ४० अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक

dollar
  • अमेरिकेची भारतातील थेट परकीय गुंतवणूक ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे भारत केंद्री उद्योग गटाने म्हटले आहे.
  • या वर्षी आतापर्यंत ४० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडेच गुगलने भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून फेसबुक ट्विटर यांनीही गुंतवणुकीच्या घोषणा केल्या आहेत.
  • भारतात गुंतवणूक करण्याबाबत उद्योजकांचा विश्वास वाढला आहे. भारत ही मोठी बाजारपेठ आहे. याशिवाय मध्य पूर्व व अतिपूर्वेकडील देशातूनही भारतात गुंतवणूक होत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीतून हरभजन सिंहची माघार

harbhajan singh sad
  • भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंहचं नाव पंजाब सरकारने खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीमधून मागे घेतलं.
  • खेलरत्न पुरस्कारासाठी कोणत्याही खेळाडूने ३ वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणं हा निकष असतो. हरभजनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपलं म्हणणं मांडलं आहे.
  • गेल्या काही वर्षांपासून हरभजन सिंह भारतीय संघात खेळत नाहीये. आयपीएलमध्ये हरभजन चेन्नईचं प्रतिनिधीत्व करत असला तरीही भारतीय संघात पुनरागमन करण्याचं त्याचं स्वप्न अधुरच आहे.
  • भारताचा अनुभवी फिरकीपटू अशी ओळख असलेल्या हरभजनने आतापर्यंत १०३ कसोटी, २३६ वन-डे सामने खेळले आहेत. कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये हरभजनच्या नावावर अनुक्रमे ४१७ आणि २६९ बळी जमा आहेत.

Share This Article