⁠  ⁠

चालू घडामोडी :१८ फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 18 February 2020

संयुक्त मुख्यालय दोन वर्षांत

तिन्ही सैन्यदलांचे संयुक्त मुख्यालय (थिएटर कमांड) २०२२पासून अस्तित्वात येईल, अशी माहिती सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी सोमवारी येथे दिली. या संयुक्त मुख्यालयामुळे सैन्यदलांना एकत्रितपणे लढण्यास मदत होणार आहे.
‘सन २०२२पासून लष्कराची संयुक्त मुख्यालये स्थापन करण्याचे नियोजन आहे. या संदर्भातील अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच या मुख्यालयांचे नेमके स्वरूप स्पष्ट होईल,’ असे जनरल रावत यांनी सांगितले.
जनरल रावत यांच्या नेतृत्वाखालील लष्करी व्यवहार विभागाला संयुक्त मुख्यालये स्थापन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही मुख्यालये स्थापन करण्याची प्रक्रिया ही लष्करातील मोठी फेररचना ठरणार आहे. जम्मू आणि काश्मीरसाठी वेगळे मुख्यालय असेल, असे जनरल रावत यांनी सूचित केले.

देशातील पहिली इंटरसिटी इलेक्ट्रिक बस मुंबई-पुणेदरम्यान शनिवारपासून सुरू

New Project 25

आजवर सर्व शहरात सुरू असलेल्या इलेक्ट्रिक बसेस आता दोन शहराला जोडणार आहेत. मुंबई-पुणे दरम्यान देेशातील पहिली इलेक्ट्रिक सुरू झाली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बसचे उद्््घाटन झाले. या आलिशान बसमध्ये ४३ लोक बसू शकतात. एकदा या बसची बॅटरी चार्ज झाल्यानंतर ती ३०० किमी चालते.

वायफाय प्रवासातील ‘गुगल स्टेशन’ बंद!

wify

इंटरनेट सेवेच्या वायफाय प्रवासातील गुगलचे ‘स्टेशन’ आता बंद होणार आहे. सन २०१५मध्ये गुगलने भारतीय रेल्वे आणि रेलटेल यांच्यासमवेत मोफत सार्वजनिक वायफाय सेवा देणारी ‘स्टेशन’ ही सेवा सुरू केली होती. देशात आपली ऑनलाइन ओळख निर्माण करणे सोपे झाले असून इंटरनेटही स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता ‘स्टेशन’ सेवेची आवश्यकता उरली नसल्याचे कारण गुगलने दिले आहे.
‘स्टेशन’ सेवेने देशातील ४०० स्थानके २०२०च्या मध्यापर्यंत जोडण्याचे ध्येय गुगलने बाळगले होते. परंतु, हा आकडा २०१८मध्येच पार केल्याचे गुगलचे विभागीय उपाध्यक्ष सीझर सेनगुप्ता यांनी म्हटले आहे. सध्या देशातील अनेक स्थानकांतून ही सेवा सुरू आहे. अन्य ठिकाणीही ही सेवा दूरसंचार कंपन्या, आयएसपी आणि स्थानिक प्रशासकीय संस्था यांच्या सहकार्याने सुरू आहे. भारताखेरीज ही सेवा नायजेरिया, थायलंड, फिलिपाइन्स, मेक्सिको, इंडोनेशिया, ब्राझील व दक्षिण आफ्रिका येथेही पुरवली जात असून ही संकल्पना जगभरात लोकप्रिय ठरली आहे.

केर्न्‍स चषक बुद्धिबळ स्पर्धा : हम्पीला विजेतेपद

l 4 4

जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेचे डिसेंबरमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या कोनेरू हम्पीने केर्न्‍स चषक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. याबरोबरच दोन महिन्यांत दुसरे विजेतेपद हम्पीला तिच्या नावे करता आले.
हम्पीला त्यामुळे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवता आला. कारण तिच्या खात्यात पाच गुणांची भर पडली.
स्पर्धेत अखेरच्या म्हणजेच नवव्या फेरीत हम्पीने भारताच्या द्रोणावल्ली हरिकाविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. परिणामी, सहा गुणांसह हम्पीने केर्न्‍स चषकावर नाव कोरले.
हम्पी सध्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) महिलांच्या ग्रांप्री मालिकेत अव्वल स्थानी आहे. या वर्षांअखेरीस होणाऱ्या कॅँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीनेही हम्पीची तयारी सुरू आहे. केर्न्‍स चषकात हम्पीला पहिल्याच फेरीत १६ वर्षीय अमेरिकेचा कॅरिसा यिपचा पराभव करता आला होता. मात्र दुसऱ्याच फेरीत हम्पीला मारिया मुझिचूककडून पराभवाचा धक्का बसला. विश्वविजेती वेंजून जू हिलाही हम्पीने बरोबरीत रोखले होते.

लष्करात महिलाही नेतृत्वपदी

c 1 3

ष्करातील लिंगाधारित भेदभाव संपुष्टात आणण्याचे निर्देश देतानाच सर्वोच्च न्यायालयाने तळप्रमुखसारख्या नेतृत्वपदी महिलांच्या नियुक्तीचा मार्ग सोमवारी मोकळा केला. शारीरिक मर्यादा आणि सामाजिक रुढींमुळे महिलांना लष्करात नेतृत्वपदे दिली जात नसल्याचा केंद्राचा दावा धक्कादायक असून, महिला अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, असे निर्देश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिले.लष्करामध्ये लिंगाधारित भेदभाव संपवण्यासाठी सरकारने आपल्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे. महिलांना तळप्रमुखसारखी नेतृत्वाची पदे देण्यात कुठलीही आडकाठी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. महिला अधिकाऱ्यांना स्थायी नियुक्ती आणि नेतृत्वपद न देणे हे समानतेच्या तत्त्वाविरोधात असल्याचे न्या. चंद्रचूड, न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. सध्या लष्करात एकूण १ हजार ६५३ महिला अधिकारी असून, हे प्रमाण लष्करी अधिकाऱ्यांच्या एकूण संख्येच्या ३.८९ टक्के आहे.

Share This Article