Current Affairs 17 March 2019

0
130

मनोज वाजपेयी, थिमक्का यांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान

 • लोकगीत गायिका तीजनबाई, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे अध्यक्ष अनिलकुमार नाईक, वैज्ञानिक ए. नम्बी नारायणन, अभिनेते मनोज वाजपेयी, ज्येष्ठ पर्यावरणवादी एस. थिम्मक्का यांच्यासह विविध क्षेत्रांतील ५४ मान्यवरांना शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. तीजनबाई आणि नाईक यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • रा. स्व. संघाचे नेते दर्शनलाल जैन, एमडीएच संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी महाशय धरमपाल गुलाटी, वैद्यकीय व्यावसायिक अशोक लक्ष्मणराव कुकडे, नम्बी नारायण, बचेंद्री पाल आणि माजी महालेखापाल व्ही. के. शुंगलू यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • अभिनेते मनोज वाजपेयी यांच्यासह वकील एच. एस. फूलका, शास्त्रज्ञ सुदाम लक्ष्मण काटे, अणुभौतिकी शास्त्रज्ञ रोहिणी मधुसूदन गोडबोले, क्रिकेटपटू गौतम गंभीर, तबलावादक स्वपन चौधरी, पांचजन्यचे माजी संपादक देवेंद्र स्वरूप (मरणोत्तर), जवळपास ६५ वर्षे हजारो वृक्ष लावणाऱ्या आणि त्यांची मुलांप्रमाणे काळजी घेणाऱ्या वृक्षमाता एस. थिक्कम्मा आदींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मतदानाच्या ४८ तास आधी जाहीरनामा प्रसिद्धीस बंदी

 • मतदानाच्या ४८ तास आधी पक्षांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करू नये, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने आता जाहीरनामा प्रसिद्ध करणे हा आचारसंहितेचाच एक भाग केला आहे. एका किंवा अनेक टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असल्यास जाहीरनामा प्रतिबंधात्मक कालावधीत प्रसिद्ध करू नये, असे सुधारित आचारसंहितेमध्ये म्हटले आहे.
 • मतदानापूर्वी ७२ तास अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास राजकीय पक्षांना मज्जाव करावा, अशी शिफारस निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या पथकाने अलीकडेच केली होती.

टँकरमुक्तीसाठी अमेरिकेतून निधी

 • शेतीसाठी पूरक उत्पादनांचा अमेरिकेत उद्योग उभारणारे वसंत राठी यांनी सोशल नेटवर्किंग फोरमच्या टँकर मुक्ती अभियानासाठी पावणे चार लाख रुपयांचा निधी दिला आहे. यातून पेठ तालुक्यातील दुष्काळग्रस्त कोळुष्टी गावाचा पाणीप्रश्न सोडविला जाणार आहे, अशी माहिती फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी दिली.
 • मूळचे येवला येथील राठी कुटुंबातील वसंत आणि किशोर राठी यांचा अॅडव्हान्स एंझाइम या नावाने उद्योग आहे. या उद्योगाचे जाळे युरोप-अमेरिकेत उभारण्यासाठी वसंत राठी हे अनेक वर्षे अमेरिकेत स्थायिक आहेत तर किशोर राठी स्थानिक कामकाज बघतात.
 • सोशल फोरमच्या टीमने पेठ तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून कोळुष्टी गाव निश्चित केले. तेथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना आखल्या. जबाबदाऱ्या निश्चित करून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनाही त्यांचा सहभाग देण्यासाठी प्रोत्साहित केले. कामासाठी लागणाऱ्या उर्वरित निधीचा राठी यांना प्रस्ताव देण्यात आला. अॅडव्हान्स एंझाइम कंपनीने केवळ ३ आठवड्यात निधी मंजूर केला आणि ३ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश फोरमला प्राप्त झाला.

अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून 53 हजार कोटी रुपये भारताला दान

 • आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या संपत्तीतील 52,750 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेमजी त्यांच्या मालकीचे 34 टक्के शेअर आता दान करणार आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 145,000 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • अझीम प्रेमजी फाउंडेशनने आता बिल गेट्स यांच्या फाउंडेशनला मागे टाकत सर्वाधिक रक्कम दान करण्याचा विक्रम केला आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या मार्फत गरीब, वंचित आणि मुख्यत्वे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते. प्रेमजींनी एकूण 1 लाख 45 हजार कोटी रुपये इतकी रक्कम सामाजिक कार्यासाठी दिल्याने ती सर्वाधिक निधी देणारी कॉरपोरेट संस्था ठरली आहे.
 • सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे 1 लाख 54 हजार 919.78 कोटींचे बाजारभांडवल आहे. आज (गुरुवार) मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर 257.55 रुपयांवर व्यवहार करतो आहे.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here