Current Affairs 17 February 2019

0
231

भारतातातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तुंवरील
कस्टम ड्युटीत 200 टक्के वाढ

  • पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला निर्यात करणाऱ्या करण्यात येणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के कस्टम ड्युटी आकारली आहे. तर पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीत वाढ केल्याने कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ भारताकडून घेण्यासाठी पाकिस्तानला जास्त किंमत चुकवावी लागणार आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्यात आली आहे.
  • भारत पाकिस्तानला साखर, चहा, ऑइल केक, पेट्रोलियम ऑइल, कॉटन, टायर, रबरसह जवळपास 14 वस्तू निर्यात करतो. आता या वस्तूंवरची कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे पाकिस्तानला भारताकडून घ्याव्या लागणाऱ्या या वस्तूंवर दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच पाकिस्तानकडून आयात करण्यात आलेल्या सिमेंटवरही भारताला जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे

सौरऊर्जेने 90 दिवस उड्डाण करेल हा ब्रिटिश ड्रोन

Advertisement
  • ब्रिटनची मॅपिंग एजन्सी ऑर्डनन्स सर्व्हेने एकाच उड्डाणात पृथ्वीच्या प्रत्येक भागाचे छायाचित्र घेण्यास सक्षम असेल. तर सौरऊर्जेच्या साहाय्याने हा ड्रोन 67 हजार फूट उंचीवर सलग 90 दिवस उड्डाण करू शकेल.
  • तसेच याद्वारे घेतलली छायाचित्रे विज्ञान संस्थेशी संबंधित संस्था व व्यवसायांना विक्री केली जातील. हा ड्रोन 150 किलोग्रॅम वजनाचे असून त्याचे पंख 40 मीटर लांबीचे आहेत. मॅपिंगसाठी सर्वोत्तम ड्रोन असल्याचे ऑर्डनन्स सर्व्हेचे म्हणणे आहे.

Badminton Nationals : सिंधूवर मात करुन सायनाने पटकावलं
राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद

  • भारताची फुलराणी म्हणून ओळख मिळवलेल्या सायना नेहवालने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत सायनाने सिंधूचा दोन सेटमध्ये पराभव केला.
  • सायनाचं हे चौथं राष्ट्रीय विजेतेपद ठरलं आहे. याआधी २००६, २००७ आणि २०१८ साली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घालत सायनाने आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं आहे.
  • सायनाने सिंधूची झुंज सरळ दोन सेटमध्ये २१-१८, २१-१५ अशी मोडून काढली. सिंधूने याआधी २०११ आणि २०१३ साली राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. पुरुषांमध्ये सौरभ वर्माने लक्ष्य सेनवर मात करत राष्ट्रीय विजेतेपदांची हॅटट्रीक साजरी केली. सौरभने १७ वर्षीय लक्ष्यला २१-१८, २१-१३ च्या फरकाने हरवत आपलं तिसरं विजेतेपद मिळवलं.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here