⁠  ⁠

Current Affairs – 15 September 2018

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 2 Min Read
2 Min Read

घाऊक महागाई दरातही उतार

  • प्रामुख्याने अन्नधान्याच्या किमतीत उतार आल्याने गेल्या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ४.५३ टक्क्यांवर आला आहे. गेल्या चार महिन्यांतील हा किमान दर आहे.
  • केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केलेला हा दर आधीच्या, जुलैमधील ५.०९ टक्क्यांच्या तुलनेत कमी आहे. तर वर्षभरापूर्वीच्या, ऑगस्ट २०१७ मधील ३.२४ टक्क्यांपेक्षा तो काहीसा अधिक आहे.
  • यंदा अन्नधान्याच्या किमतीत ४.०४ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदली गेली आहे. गेल्या महिन्यात भाज्यांच्या किमती २० टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर इंधन व ऊर्जा गटातील वस्तूतही दरउतार नोंदला गेला आहे.
  • गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दर ३.६९ टक्के असा १० महिन्यांतील किमान स्तरावर नोंदला गेला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने जुलै ते सप्टेंबर २०१८ दरम्यान किरकोळ महागाईचा ४.२ टक्के तर चालू वर्षांच्या उर्वरित अर्ध वित्त वर्षांत ४.८ टक्के अपेक्षित केला आहे.

telegram ad 728

इराणकडून तेल आयातीत कपात

  1. अमेरिकेने इराणबरोबर २०१५ साली केलेल्या अणुकरारातून माघार घेऊन इराणविरुद्ध निर्बंध लागू केल्याने भारताला तेथून आयात केल्या जाणाऱ्या खनिज तेलात कपात करावी लागणार आहे.
  2. इराण अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवत नसल्याचे कारण देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी केलेल्या बहुराष्ट्रीय अणुकरारातून माघार घेतली. तसेच इराणवर नव्याने आर्थिक निर्बंध लादले. त्यानुसार इराणशी तेल आणि अन्य व्यापारी संबंध ठेवणाऱ्या देशांवरही अमेरिका निर्बंध लादू शकते. इराणवरील तेलविषयक निर्बंध ४ नोव्हेंबरपासून लागू होत आहेत.
  3. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी गेल्या आठवडय़ात नवी दिल्लीला भेट दिली. त्या वेळी भारताला इराणकडून तेल आयात करू देण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न करण्यात आले. मात्र अमेरिकेकडून त्याबाबत ठोस आश्वासन मिळाले नाही.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Share This Article