Current Affairs 15 April 2019

0
317

‘एचडीएफसी’ ठरली देशातील सर्वोत्तम बँक

 • खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
 • आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘फोर्ब्ज’ मासिकाने केलेल्या ‘वर्ल्ड्स बेस्ट बँक सर्व्हे’ या अभ्यासानुसार देशातील सर्वोत्तम बँकांच्या सूचीत एचडीएफसी बँकेने ग्राहककेंद्रित सेवांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ‘फोर्ब्ज’ने हा अहवाल मार्केट रिसर्च फर्म ‘स्टॅटिस्टा’च्या साह्याने केला असून, त्यामध्ये २३ देशांतील बँकांचा आढावा घेण्यात आला आहे.
 • देशातील पहिल्या १० बँकांच्या सूचीत सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेला स्थान मिळवता आलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि आपल्या ४.३० कोटी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देऊन ‘एचडीएफसी बँके’ने देशातील बँकांमध्ये अग्रस्थान पटकावले आहे. ‘एचडीएफसी बँके’ पाठोपाठ खासगी क्षेत्रातीलच आयसीआयसीआय बँकेने दुसरा क्रमांक पटकावला असून, तिसरा क्रमांक सिंगापूरस्थित मुख्यालय असलेल्या डीबीएस बँकेने पटकावले आहे. त्या पाठोपाठ कोटक महिंद्र बँक आणि आयडीएफसी बँकेने अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट, पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक, विजया बँक आणि खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने अनुक्रमे सहा ते दहा क्रमांक पटकावले आहेत. स्टेट बँक सूचीत अकराव्या क्रमांकावर आहे. या सूचीत कॅनरा बँक तिसाव्या स्थानावर आहे.

जगातील सर्वांत महाकाय विमानाची यशस्वी अवकाशझेप

 • जगातील सर्वांत महाकाय विमानाने आपली पहिली उड्डाणचाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. सहा ‘बोईंग ७४७’ इंजिने असलेल्या या विमानाने कॅलिफोर्निया येथील मोजावे वाळवंटावरील आकाशात अडीच तास उड्डाण केले.
 • ‘स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ’ असे नाव असलेल्या या विमानाची संरचना दोन भागांची आहे. उपग्रह बसवलेले रॉकेट अंतराळाजवळ नेऊन सोडण्याची या विमानाची क्षमता आहे. नंतर हे रॉकेट प्रज्वलित होऊन उपग्रहास त्याच्या अंतराळातील कक्षेपर्यंत नेईल.
 • सध्या महाकाय प्रवासी विमान असलेल्या ‘एअरबस ए-३८०’ विमानापेक्षा ‘स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ’ कित्येक पटीने मोठे आहे. ‘ए-३८०’च्या पंखांचा विस्तार ८० मीटर असून ‘स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ’च्या पंखांचा विस्तार दीडपट म्हणजे ११७ मीटर इतका आहे.
 • ‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक असलेल्या पॉल अॅलन यांनी ‘स्ट्रॅटोलाँच बेहेमोथ’च्या निर्मितीला अर्थसहाय केले होते.

शीख दहशतवादाचा उल्लेख कॅनडाने वगळला

 • दहशतवादावरील यंदाच्या अहवालात कॅनडाने शीख दहशतवादाशी असलेले सर्व संदर्भ काढून टाकले आहेत. याआधीपर्यंत कॅनडाला दहशतवादी संघटनापासून असलेल्या धोक्यात पहिल्या पाचांमध्ये शीख दहशतवादाचा उल्लेख होता.
 • ‘दहशतवादापासून कॅनडाला असलेला धोका २०१८’ या अहवालात सर्व धार्मिक संदर्भ काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी ‘भारतात स्वतंत्र राष्ट्रासाठी हिंसेला पाठिंबा देणारे अतिरेकी’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
 • ‘देशांतर्गत राजकारणाला बळी पडून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेव यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने भारत आणि जगाला धोका निर्माण झाला असून, याचे भारत-कॅनडा संबंधांवर दीर्घकालीन परिणाम होणार आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.

मंगळावरील खडकांचे नमुने घेण्यात यश

 • मंगळ ग्रहावर २०१२पासून असणाऱ्या ‘नासा’च्या ‘क्युरिऑसिटी’ रोव्हरने पहिल्यांदा तेथील खडकांचे नमुने तपासले आहेत. या मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मानण्यात येत आहे.
 • ‘क्युरिऑसिटी’ २०१२मध्ये मंगळावरील ‘शार्प’ या पर्वतावर उतरले होते. या ग्रहावर २३७७ दिवसांपासून हे रोव्हर असून, त्यामध्ये विविध निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. याचाच पुढील भाग म्हणून या रोव्हरने सहा एप्रिल रोजी ‘अबरलेडी’ असे नाव दिलेल्या खडकाला छिद्र पाडत, त्यातून नमुने गोळा केले. हे नमुने या रोव्हरमध्येच असलेल्या खनिजांच्या छोटेखानी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या आधीच्या खडकांच्या तुलनेमध्ये या वेळी खडकाला छिद्र पाडण्यामध्ये फारशा अडचणी आल्या नाहीत, असे ‘नासा’च्या निवेदनात म्हटले आहे.

यंदाचे विश्व मराठी साहित्य संमेलन कंबोडियात होणार:

 • नववे विश्व मराठी साहित्य संमेलन 28 ऑगस्ट रोजी कंबोडियातील अंग्कोरवाट येथे आयोजितकरण्यात आले आहे. विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी ही माहिती दिली.
 • ‘पुरातन स्थापत्य शास्त्र’ हे या वर्षीच्या संमेलनाचे सूत्र असून, या वेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ज्येष्ठ लेखिका माधवी वैध यांनी केले.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here