Current Affairs 14 May 2019

0
191

दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी डी.एन. पटेल यांच्या नावाची शिफारस

 • सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून डी.एन.पटेल यांच्या नावाची शिफारस केली आहे. न्यायाधीश डी.एन. पटेल हे न्यायाधीश राजेंद्र मेनन यांची जागा घेतली. न्यायाधीश राजेंद्र मेनन हे जून महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागी न्यायमूर्ती पटेल यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
 • गेल्या दहा वर्षांपासून डी.एन.पटेल हे झारखंड उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. 2 फेब्रुवारी 2009 साली त्यांनी झारखंड उच्च न्यायलयाचे न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. 4 ऑगस्ट 2013 ते 15 नोव्हेंबर 2013 आणि 13 ऑगस्ट 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या कालावधीत न्यायाधीश पटेल यांच्याकडे झारखंड उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

अमेरिका देणार भारताला ‘थाड’ संरक्षण व्यवस्था

 • रशियाच्या एस-४०० ला पर्याय म्हणून अमेरिकेने भारताला टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स (टीएचएएडी) आणि पॅट्रियट अ‍ॅडव्हान्स कॅपॅबिलिटी (पीएसी-३) क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्था देण्याची तयारी दाखवली आहे.
 • २०१६ मध्ये अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने केलेल्या कथित हस्तक्षेपाबद्दल त्याला शिक्षा करण्यासाठी म्हणून भारताने त्याच्याकडून वरील व्यवस्था विकत घेतल्यास त्याच्यावर निर्बंध लादले जाणार नाहीत हे आश्वासन अमेरिकेने मागे घेतले.
 • नाटोचा सदस्य टर्कीने स्वत:च एस-४०० विकत घेऊ नयेत म्हणून ट्रम्प प्रशासन प्रयत्न करीत असताना हे घडले आहे.
 • थाड संरक्षण व्यवस्था विकत घेण्याची नेमकी रक्कम किती, हे निश्चित झालेले नाही; परंतु सीएनबीसीच्या वृत्तानुसार प्रत्येक एस-४०० ची किंमत तीन अब्ज अमेरिकन डॉलर असू शकेल.
 • सौदी अरेबियाने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेशी ४४ थाड लाँचर्स आणि मिसाईल्स १५ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.या तुलनेत भारत पाच एस-४०० साठी ५.४ अब्ज डॉलर्स देणार असल्याचे वृत्त आहे. या प्रत्येक एस-४०० ला आठ लाँचर्स आहेत.

‘हिंदुजा ब्रदर्स’ब्रिटनमधील श्रीमंतांमध्ये अव्वल, रुबेन बंधू दुसऱ्या क्रमांकावर

 • ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये हिंदुजा बंधूंनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे. हिंदुजा बंधूंनी तिसऱ्यांदा ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत पहिला क्रमांक गाठलंय. संडे टाइम्सने ही यादी प्रकाशित केली आहे.
 • यापूर्वी 2014 आणि 2017 मध्ये श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा बंधू पहिल्या स्थानी होते.
 • दुसऱ्या क्रमांकावर मुंबईत जन्मलेले रुबेन बंधू आहेत. डेविड आणि सिमन रुबेन यांनी कार्पेट आणि भंगारातून त्यांचा व्यवसाय उभा केला. त्यांचा या यादीत दुसरा क्रमांक आहे. त्यांची एकूण संपत्ती 18.664 बिलियन डॉलर आहे.
 • संडे टाइम्सनुसार या यादीत 1000 व्यक्तींचा समावेश होतो. जमीन, मालमत्ता किती आहे यावरून ही यादी तयार होते.
 • हिंदुजा ग्रुपची स्थापना 1914 मध्ये झाली. त्यांच्या व्यवसायाची सुरुवात मुंबई आणि कराचीमध्ये झाली.

नोव्हाक जोकोव्हिचचे दुसरे जेतेपद!

 • जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने आपल्याला विश्वातील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून का ओळखले जाते, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. रविवारी रात्री झालेल्या माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ग्रीकच्या स्टीफानोस त्सित्सिपासवर विजय मिळवून जोकोव्हिचने वर्षांतील दुसऱ्या, तर कारकीर्दीतील तिसऱ्या माद्रिद विजेतेपदाला गवसणी घातली.
 • जवळपास एक तास व ४० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सर्बियाच्या अग्रमानांकित जोकोव्हिचने त्सित्सिपासला ६-३, ६-४ अशी सहज धूळ चारली.

बर्टन्सने जेतेपदासह इतिहास घडवला!

 • नेदरलँड्सच्या किकी बर्टन्सने रोमानियाच्या सिमोना हॅलेपचा ६-४, ६-४ असा पराभव करून माद्रिद खुली टेनिस स्पर्धा जिंकण्याची किमया साधताना इतिहास घडवला. एकही सेट न गमावता विजेतेपदापर्यंत वाटचाल करणारी ती पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात अन्य पुरस्कार मिळवणारे महत्वाचे खेळाडू –

 • मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर – आंद्रे रसेल
 • सर्वोत्कृष्ट खेळपट्टी आणि मैदान – अनुक्रमे पंजाब व हैदराबाद
 • फेअरप्ले अवॉर्ड – सनराईजर्स हैदराबाद
 • परफेक्ट कॅच ऑफ सिझन – कायरन पोलार्ड
 • सुपर स्ट्राईकर – आंद्रे रसेल
 • स्टाईलिश प्लेअर ऑफ सिझन – लोकेश राहुल

हिल्या क्लस्टर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सुहास पेडणेकर :

 • राज्यातील पहिले क्लस्टर विद्यापीठ असलेल्या डॉ. होमी जहांगीर भाभा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा मान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना मिळाला आहे.
 • तर नुकतीच या कुलगुरूंची निवड प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. या कुलगुरूपदाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे.
 • राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान म्हणजेच रुसाच्या माध्यमातून चार महाविद्यालयांचे मिळून एक विद्यापीठ स्थापन केले जात आहे.
 • त्यानुसार, डॉ. होमी जहांगीर भाभा विद्यापीठ मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कुलगुरूपदाच्या नियुक्तीमुळे कामकाजाला गती मिळणार आहे.
 • डॉ. होमी भाभा विद्यापीठामध्ये शासकीय विज्ञान संस्था, मुंबई हे मुख्य कॉलेज आणि सिडनहॅम कॉलेज, एलफिन्स्टन कॉलेज व शासकीय अध्यापक महाविद्यालय या चार संस्थांचा समावेश आहे.

IPL2019 : मुंबईचा विजय

 • आयपीएलच्या १२ व्या सत्रातील अंतिम सामन्यामध्ये मुंबईने राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर चेन्नईला शेवटच्या चेंडूवर नमवित आयपीलच्या चषकावर आपले नाव कोरले. मुंबईने चौथ्यांदा आयपीएल जिंकली आहे.
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here